• Home
  • »
  • News
  • »
  • career
  • »
  • GMC Solapur Recruitment: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सोलापूर इथे नोकरीची मोठी संधी; 'या' उमेदवारांना मिळणार प्राधान्य

GMC Solapur Recruitment: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सोलापूर इथे नोकरीची मोठी संधी; 'या' उमेदवारांना मिळणार प्राधान्य

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 23 सप्टेंबर 2021 असणार आहे.

  • Share this:
    सोलापूर, 21 सप्टेंबर: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सोलापूर (Dr. Vaishampayan Smriti Government Medical College Solapur) इथे लवकरच काही पदांसाठी पदभरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (GMC Solapur Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. वैद्यकीय अधिकारी या पदांसाठी ही भरती (Solapur Government College Recruitment 2021) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 23 सप्टेंबर 2021 असणार आहे. या पदांसाठी भरती वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) - एकूण जागा 03 GMC Solapur Recruitment 2021
    GMC Solapur Recruitment 2021
    शैक्षणिक पात्रता आणि अनुभव वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) - या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी क्लिनिकल विषय पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी एकापेक्षा अधिक विषयांमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलं असेल तर अशा उमेदवारांसाठी मेरिट लिस्ट लावण्यात येणार आहे. जर मुलाखतीच्या वेळी कोणताही पदव्युत्तर शिक्षण घेतलेला उमेदवार प्राप्त झाला नाही तर अशावेळी MBBS उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे. हे वाचा - शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर इथे 40,000 रुपये पगाराची नोकरी; लगेच करा अर्ज या उमेदवारांना मिळणार प्राधान्य उमेदवारांनी पदवी किंवा पदव्युत्तर पदवी ही शासकीय महाविद्यालय सोलापूर इथून प्राप्त केली असेल तर अशा उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल. उमेदवारांनी पदवी किंवा पदव्युत्तर पदवी महाराष्ट्रातील कोणत्याही शासकीय महाविद्यालयातून केली असेल तर अशा उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल. अशी होणार निवड थेट मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. मुलाखतीवेळी उमेदवारांची प्रतीक्षा यादी तयार करण्यात येणार आहे आणि त्यानंतर उमेदवारांना पुढच्या सर्व मुलाखतींसाठी उपस्थित राहावं लागेल. मुलाखतीचा पत्ता श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय, सोलापूर. हे वाचा - AIIMS Recruitment: AIIMS नागपुर इथे नोकरीची सुवर्णसंधी; 67,700 रुपये पगार मुलाखतीची तारीख - 23 सप्टेंबर 2021
    JOB TITLE  GMC Solapur Recruitment 2021
    या पदांसाठी भरती  वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) - एकूण जागा 03
    शैक्षणिक पात्रता  क्लिनिकल विषय पदव्युत्तर शिक्षण
    या उमेदवारांना प्राधान्य  पदव्युत्तर पदवी ही शासकीय महाविद्यालय सोलापूर इथून प्राप्त केली असेल तर प्राधान्य
    अशी होणार निवड  थेट मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड
    मुलाखतीचा पत्ता श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय, सोलापूर.
    मुलाखतीची तारीख  23 सप्टेंबर 2021
    सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://vmgmc.edu.in/ या लिंकवर क्लिक करा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.
    Published by:Atharva Mahankal
    First published: