• Home
  • »
  • News
  • »
  • career
  • »
  • GMC Recruitment: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया इथे 1,10,000 रुपये पगाराची नोकरी; या पत्त्यावर करा अर्ज

GMC Recruitment: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया इथे 1,10,000 रुपये पगाराची नोकरी; या पत्त्यावर करा अर्ज

सहायक प्राध्यापक, ज्येष्ठ रहिवासी या पदांसाठी ही भरती (Professors Jobs in Maharashtra) असणार आहे.

  • Share this:
    गोंदिया, 23 नोव्हेंबर: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय गोंदिया (Government Medical College and Hospital Gondia) इथे लवकरच काही पदांच्या 19 जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (GMC Gondia Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. सहायक प्राध्यापक, ज्येष्ठ रहिवासी या पदांसाठी ही भरती (Professors Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 नोव्हेंबर 2021 असणार आहे. या जागांसाठी भरती सहायक प्राध्यापक (Assistant Professor) - एकूण जागा 12 ज्येष्ठ रहिवासी (Senior Resident) - एकूण जागा 7 शैक्षणिक पात्रता सहायक प्राध्यापक (Assistant Professor) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी[पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी पदाशी संबंधित विशयनमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. ज्येष्ठ रहिवासी (Senior Resident) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून MD किंवा MS पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये नोंदणी केली असणं आवश्यक आहे. GMC मधील बंधपत्रित उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे. ZP Nanded Recruitment: जिल्हा परिषद नांदेड इथे विविध वैद्यकीय पदांसाठी भरती इतका मिळणार पगार सहायक प्राध्यापक (Assistant Professor) - 1,10,000/- रुपये ज्येष्ठ रहिवासी (Senior Resident) - पात्रतेनुसार पगार देण्यात येईल. कामाचा कालावधी सहायक प्राध्यापक (Assistant Professor) - या पदांसाठी भरती ही 120 दिवसांच्या कालावधीसाठी असणार आहे. ज्येष्ठ रहिवासी (Senior Resident) - या पदांसाठी भरती ही 6 महिन्यांच्या कालावधीसाठी असणार आहे. वयोमर्यादा सहायक प्राध्यापक (Assistant Professor) - खुलावर्ग - वयवर्षे 38 पर्यंत तर मागासवर्ग - वयवर्षे 43 पर्यंत. ज्येष्ठ रहिवासी (Senior Resident) - वयवर्षे 45 पर्यंत. ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो IISER Recruitment: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन पुणे इथे भरती अर्ज पाठवण्याचा पत्ता आस्थपना १ व २ अधिष्ठाता यांचे कार्यालय शा. वै. म. गोंदिया ( के.टी. एस. रुग्णालय परिसर). अर्ज करण्याची शेवटची तारीख - 26 नोव्हेंबर 2021
    JOB TITLE GMC Gondia Recruitment 2021
    या जागांसाठी भरती सहायक प्राध्यापक (Assistant Professor) - एकूण जागा 12 ज्येष्ठ रहिवासी (Senior Resident) - एकूण जागा 7
    शैक्षणिक पात्रता सहायक प्राध्यापक (Assistant Professor) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी[पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी पदाशी संबंधित विशयनमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. ज्येष्ठ रहिवासी (Senior Resident) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून MD किंवा MS पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये नोंदणी केली असणं आवश्यक आहे. GMC मधील बंधपत्रित उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे.
    इतका मिळणार पगार सहायक प्राध्यापक (Assistant Professor) - 1,10,000/- रुपये ज्येष्ठ रहिवासी (Senior Resident) - पात्रतेनुसार पगार देण्यात येईल.
    कामाचा कालावधी सहायक प्राध्यापक (Assistant Professor) - या पदांसाठी भरती ही 120 दिवस. ज्येष्ठ रहिवासी (Senior Resident) - या पदांसाठी भरती ही 6 महिने.
    वयोमर्यादा सहायक प्राध्यापक (Assistant Professor) - खुलावर्ग - वयवर्षे 38 पर्यंत तर मागासवर्ग - वयवर्षे 43 पर्यंत. ज्येष्ठ रहिवासी (Senior Resident) - वयवर्षे 45 पर्यंत.
    सहायक प्राध्यापक पदांसाठी सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. ज्येष्ठ रहिवासी पदांसाठी सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी http://www.gmcgondia.in/ या लिंकवर क्लिक करा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.
    Published by:Atharva Mahankal
    First published: