मराठी बातम्या /बातम्या /करिअर /Government Exam Tips: आता तुमची सरकारी नोकरी पक्की; फक्त परीक्षा देताना फॉलो करा Tips

Government Exam Tips: आता तुमची सरकारी नोकरी पक्की; फक्त परीक्षा देताना फॉलो करा Tips

प्रतीकात्मक फोटो

प्रतीकात्मक फोटो

आज आम्ही तुम्हाला सरकारी नोकरीच्या परीक्षांसाठी (Government exams preparation tips) तयारी कशी करायची आणि योजना कशी करायची याबद्दल टिप्स (How to prepare for government exams) देणार आहोत.

मुंबई, 04 डिसेंबर: देशात आजकालच्या तरुणांमध्ये सरकारी नोकरीची (Government exam) प्रचंड क्रेझ आहे. प्रत्येकाला सरकारी नोकरी हवी आहे. मात्र आता सरकारी नोकरी मिळवणं प्रचंड कठीण झालं आहे. सरकारी नोकरी (How to get Government jobs) मिळवण्यासाठी प्रचंड मेहनत, जिद्द आणि टॅलेन्टची गरज असते. त्यात अगदी काही जागांसाठी शेकडो उमेदवार अर्ज करत असतात. त्यामुळे आधी परीक्षा घेण्यात येते आणि त्यानंतर नियुक्ती करण्यात येते. जर या परीक्षेची (How to prepare for Government exams) तयारी पुरेशी झाली नाही तर तुम्ही सरकारी घेऊ शकत नाही. मात्र आज आम्ही तुम्हाला सरकारी नोकरीच्या परीक्षांसाठी (Government exams preparation tips) तयारी कशी करायची आणि योजना कशी करायची याबद्दल टिप्स (How to prepare for government exams) देणार आहोत. चला तर मग जाणून घेउया.

वाईट Communication Skills मुळे येतंय अपयश? चिंता नको. या टिप्स करा फॉलो

लिखाणाची सवय करा

परीक्षा हॉलमधील प्रत्येक गोष्ट महत्त्वाची असते, त्यामुळे तुमची तयारी अर्धवट नसून पूर्ण असावी. दिवसातून किमान अडीच तास लिहिण्याचा सराव करा. अनेक वेळा लेखनाचा सराव नसल्यामुळे विद्यार्थ्यांना तीन तासांत सर्व उत्तरे लिहिता येत नाहीत. केवळ वाचन आणि पाठ करून आणि मन पुनरावृत्ती करून लक्षात ठेवण्याच्या पद्धतीवर कधीही अवलंबून राहू नका. म्हणूनच प्रत्येक उत्तर लिहून बघा.

तुमचा एनर्जी टाइम ओळख

जर तुम्हाला बरोबर अभ्यास करायचा असेल, तर तुम्ही सर्वात उत्साही आणि हलक्या मूडमध्ये असताना वेळ ओळखा. अनेक विद्यार्थ्यांना सकाळी लवकर, काहींना रात्री उशिरा कठीण गोष्टींचा अभ्यास करायला आवडतो. तुम्ही तुमचा वेळ ओळखा आणि एनर्जी टाईममध्ये कठीण विषयांचा अभ्यास करा. यामुळे तुमचे काम खूप सोपे होईल.

सर्व विषयांना योग्य वेळ द्या

सुरुवातीपासूनच सर्व विषयांना योग्य वेळ द्या. वर्गाच्या अभ्यासादरम्यान तुम्ही तयार केलेल्या वेगवेगळ्या विषयांच्या नोट्स वाचत राहा. नियमितपणे अभ्यासक्रमाची उजळणी करत रहा. जर तुम्ही सर्व विषयांना योग्य वेळ द्याल तर तुम्हाला परीक्षेदरम्यान काहीही अवघड जाणार नाही.

क्या बात है! आता तुमची आणि छंदच ठरतील वरदान; आवड जपून करा Career

रुटीन योग्यपणे ठरवा

सकाळी 5 वाजता उठणे आणि रात्री 11 वाजता झोपणे. या दरम्यान त्यांना ना खेळण्यासाठी वेळ मिळतो ना मनोरंजनासाठी, ना खाण्यापिण्यासाठी योग्य वेळ. परिणामी पहिल्याच दिवशी हा दिनक्रम कोलमडतो. नेहमी योग्य वाचन दिनचर्या बनवा आणि त्याचे काटेकोरपणे पालन करा. या दिनचर्येत विश्रांती आणि खाण्यापिण्याची पूर्ण काळजी घेतली पाहिजे.

First published:
top videos

    Tags: Career, Government, जॉब