मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

क्या बात है! आता तुमची आणि छंदच ठरतील तुमच्यासाठी वरदान; अशा पद्धतीनं आवड जपून कमवा भरघोस पैसे

क्या बात है! आता तुमची आणि छंदच ठरतील तुमच्यासाठी वरदान; अशा पद्धतीनं आवड जपून कमवा भरघोस पैसे

चला तर मग पॅशनला प्रोफेशन बनवण्याच्या टिप्स जाणून घेऊया.

चला तर मग पॅशनला प्रोफेशन बनवण्याच्या टिप्स जाणून घेऊया.

तुमची इच्छा असेल तर तुम्ही तुमची आवड म्हणजेच छंद देखील व्यवसायात (How to convert passion into income source) बदलू शकता

  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 03 डिसेंबर: आजकालच्या काळात तुमची आवड (How to continue Passion) आणि तुम्ही करत असलेलं काम यामध्ये बरीच तफावत आढळते. तुमची आवड नेहमीच तुमच्यासाठी महत्त्वाची असते मात्र जेव्हा पैसे कमवण्याची (How to earn money smartly) गोष्ट समोर येते तेव्हा आवड जपून पैसे कमवण्यात आपण नेहमीच अपयशी ठरतो. पण आज आम्ही तुम्हाला म्हंटलं की तुमच्या आवडीला, छंदांना (How to maintain Hobbies with job) जपून तुम्ही भरघोस पैसे (earn money with hobby) कमवू शकता. कदाचित विश्वास बसणार नाही. मात्र हे खरं आहे. अनेक वेळा कुटुंबाचा किंवा समाजाचा दबाव आपल्याला आपल्या आवडीचा करिअर पर्याय निवडण्याचं स्वातंत्र्य देत नाही. पण तुमची इच्छा असेल तर तुम्ही तुमची आवड म्हणजेच छंद देखील व्यवसायात (How to convert passion into income source) बदलू शकता. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तुम्ही यातून चांगलं उत्पन्न देखील मिळवू शकता. चला तर मग जाणून घेउया काही करिअर टिप्स (Career Tips for earning money).

तुम्हाला फोटोग्राफी (career in Photography), नृत्य (Career in Dance), संगीत (career in Music), लेखन (career in Writing), गायन (Career in Singing) किंवा स्वयंपाक (Career in Cooking) यासारख्या छंदांमध्ये स्वारस्य असल्यास तर आता तुम्ही हे तुमचे करिअर (How to convert profession into passion) बनवू शकता. हे तुम्हाला चांगले उत्पन्न देखील देईल (Money Earning Tips). चला तर मग पॅशनला प्रोफेशन बनवण्याच्या टिप्स जाणून घेऊया.

Career Tips: तुम्हाला करिअरच्या सुरुवातीलाच यश मिळवायचं? मग वाचा या Tips

सुरुवातीला करा रिसर्च

तुमच्या छंदाचे प्रोफेशनमध्ये रूपांतर करण्यासाठी संशोधन (How To Convert Passion Into Profession) करणे अत्यंत आवश्यक आहे. तुम्हाला तुमच्या छंदाशी संबंधित सर्व काही माहित असले पाहिजे. तुमचा छंद पूर्णवेळ करिअर करू शकतो की नाही, त्यात नोकऱ्या आणि करिअरच्या संधी काय आहेत, त्या क्षेत्रात किती लोक काम करत आहेत आणि त्यासाठी किती अनुभव आवश्यक आहे, हे तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे.

योग्य मार्गदर्शन घ्या

कोणीही स्वत: त्याच्या कामाचा न्याय करू शकत नाही आणि तुमचे कुटुंब किंवा मित्रही यात तुम्हाला मदत करू शकत नाहीत. कोणतेही काम सुरू करण्यापूर्वी योग्य मार्गदर्शन आवश्यक असते. एक अनुभवी व्यावसायिक आपल्याला यामध्ये मदत करू शकतो. काम सुरू करण्यापूर्वी तुमच्या छंदाबद्दल तुमच्या गुरूकडून योग्य प्रतिक्रिया घ्यायला विसरू नका.

शून्यातून निर्माण करा विश्व

करिअर बदलत असताना, तुम्हाला खालच्या स्तरावर सुरुवात करावी लागेल. याक्षणी तुम्ही तुमच्या नोकरीत वरिष्ठ पातळीवर असाल, परंतु तरीही, नवीन करिअरमध्ये, तुम्हाला सुरुवातीपासून सर्वकाही सुरू करावे लागेल. साठी तयार व्हा.

Online Upskilling courses: करिअरची नवी सुरुवात करताय? मग हे कोर्सेस कराच

 Skills असणं महत्त्वाचं

काही कौशल्ये प्रत्येक क्षेत्रात उपयोगी पडतात. जर तुम्ही एखाद्या कंपनीच्या सेल्स विभागात काम करत असाल आणि तुम्हाला पेंटिंगमध्ये करिअर करायचे असेल तर तुमचे मार्केटिंग कौशल्य इथेही कामी येईल. त्यामुळे तुमच्या नवीन करिअरमध्ये सर्व कौशल्यांचा वापर करा हे ध्यानात ठेवा.

First published:

Tags: Career opportunities