जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / Success Story: मेंटल हेल्थसाठी घेतला ब्रेक, IFS अनीशा तोमरने तिसऱ्या प्रयत्नात मारली मजल!

Success Story: मेंटल हेल्थसाठी घेतला ब्रेक, IFS अनीशा तोमरने तिसऱ्या प्रयत्नात मारली मजल!

IFS अनीशा तोमर

IFS अनीशा तोमर

शांत समुद्रात बोट चालवून तुम्ही कधीही कुशल खलाशी होऊ शकत नाही. लाटांचा सामना करणाऱ्याला कुशल नाविक म्हणतात.

  • -MIN READ New Delhi,Delhi
  • Last Updated :

नवी दिल्ली, 2 फेब्रुवारी : दरवर्षी सुमारे 10 लाखांवर उमेदवार यूपीएससी परीक्षेला बसतात. मात्र, त्यापैकी काही मोजकेच नागरी सेवेत आपले स्थान निर्माण करतात. देशातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक ही परीक्षा मानली जाते. IFS अनिशा तोमरने तिसऱ्या प्रयत्नात UPSC परीक्षा उत्तीर्ण केली होती. सरकारी नोकरीपर्यंतचा त्यांचा प्रवास खूप खडतर होता. दरम्यानच्या काळात त्या खूप आजारीही होती. जाणून घ्या, IFS अनिशा तोमरचा यशस्वी प्रवास. IFS अनिशा तोमर लष्करी कुटुंबातील आहे. त्यांचे वडील भारतीय लष्करात ब्रिगेडियर होते. यामुळे त्या देशभरात वेगवेगळ्या राज्यात राहिल्या आहेत. त्या लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होत्या. यूपीएससी परीक्षेत दोनदा नापास होऊनही अनिशा तोमर यांनी हार मानली नाही आणि सरकारी नोकरीच्या ध्येयावर त्या ठाम राहिल्या. IFS अनिशा तोमर यांनी 12वी नंतर पंजाब विद्यापीठातून B.Tech ची पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी पदवीच्या शिक्षणादरम्यानच यूपीएससी परीक्षेला बसण्याचा निर्णय घेतला होता. त्यांचा हा प्रवास अडचणींनी भरलेला आहे. ग्रॅज्युएशन पूर्ण होताच त्यांनी सरकारी नोकरीची तयारी सुरू केली. त्यासाठी त्यांनी यूपीएससीच्या अभ्यासक्रमानुसार अभ्यास साहित्य तपासायला सुरुवात केली. अनिशा तोमर यांनी UPSC परीक्षेत लोक प्रशासन हा पर्यायी विषय म्हणून निवडला होता. IFS अनिशा तोमर UPSC परीक्षेच्या दोन प्रयत्नांत नापास झाली होती. पहिल्याच प्रयत्नात त्यांना पूर्वपरीक्षाही पास करता आली नाही. त्याचवेळी दुसऱ्या प्रयत्नात प्री क्लिअर करून त्या मुख्य परीक्षेत पोहोचली. पण मेहनत करूनही त्यांची संधी केवळ 6 गुणांनी हुकली. मात्र, यानंतर यूपीएससी मुख्य परीक्षेत पोहोचल्याने त्यांचा आत्मविश्वास खूप वाढला होता. हेही वाचा -  स्वप्नांशी कोणतीही तडजोड नाहीच! नक्षली भागातील तरुणीची गरुडझेप, झाली IAS 2018 मध्ये UPSC मुख्य परीक्षेपूर्वी अनिशा तोमर उच्च रक्तदाबाची शिकार झाली होती. आजारातून सावरत त्यांनी मुख्य परीक्षा दिली. त्यात त्यांना कटऑफचे गुण अवघ्या 6 गुणांनी हुकले. त्यानंतर तिसऱ्या प्रयत्नात प्रिलिम्स क्लिअर केल्यानंतर त्यांनी मानसिक आरोग्यासाठी थोडा ब्रेक घेतला. त्याचा भविष्यात त्यांना खूप फायदा झाला. अनिशा तोमर यांनी UPSC परीक्षेच्या तिसऱ्या प्रयत्नात 94 वा क्रमांक मिळवला. अनिशा म्हणतात की, शांत समुद्रात बोट चालवून तुम्ही कधीही कुशल खलाशी होऊ शकत नाही. लाटांचा सामना करणाऱ्याला कुशल नाविक म्हणतात. त्यांनी प्रत्यक्षात हे करुन दाखवले. अनिशा तोमर या त्यांच्या चुकांमधून शिकण्यावर जोर देतात. यामुळे यशस्वी होण्याची हमी वाढते. यूपीएससीमध्ये यश मिळवण्यासाठी संयमासोबतच कठोर परिश्रमाचीही गरज आहे, असे त्यांचे मत आहे. ऐच्छिक विषयावर लक्ष केंद्रित करा आणि वेळ वाया घालवणारी प्रत्येक गोष्टीला दूर करा, असा सल्ला त्या देतात. ऐच्छिक विषयासोबतच त्यांनी निबंध लेखनावरही भर दिला आणि अगदी शेवटी सामान्य अध्ययनावर लक्ष केंद्रित केले. यासोबत मागील वर्षांतील टॉपर्सचे लेखन कौशल्य पाहून शैली त्यांनी स्वत:ची शैली सुधारली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात