मुंबई 26 फेब्रुवारी : शिक्षणमंत्री (Minister of Education) डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांनी नवोदय विद्यालय कार्यकारिणीची चाळीसावी बैठक घेतली. यात शिक्षण व्यवस्थेबद्दलचे काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यात ईशान्य, हिमालयीन विभाग आणि जम्मू काश्मीरसाठी विशेष भरती मोहिम तसंच नववी नंतरच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत गोळ्या यासारख्या गोष्टींचा समावेश आहे. बैठकीत आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. तो म्हणजेच इयत्ता 6 ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थांना आता मोफत पाठ्यपुस्तकं (Free text books) उपलब्ध करुन दिली जाणार आहेत. ही नवीन शैक्षणिक धोरणे पुढील वर्षीपासून राबवण्यात येणार आहेत.
याशिवाय अभियांत्रिकी क्षेत्रातील भरती नियमातही सुधारणा करण्यात येणार आहे.
Free text books to be provided to students from class 6 -12. New transfer policy to be implemented from next year & recruitment rules for engineering cadre to be revised, CSR funds to be mobilized to improve hostels & schools, alumni will be requested to adopt schools.
— Ministry of Education (@EduMinOfIndia) February 25, 2021
वसतिगृहे आणि शाळांच्या सुधारणांसाठी सीएसआर (CSR) निधी जमा करावा लागेल तसंच माजी विद्यार्थ्यांना शाळेसाठीच्या सोयीसुविधा तसंच इतर गरजांकडं लक्ष देण्याची विनंती केली जाईल. केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनीही या बैठकीला हजेरी लावली होती. यावेळी शांळांमधील पायाभूत सुविधांमध्ये प्राधान्यानं सुधारणा होणं गरजेचं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. सोबतच कोरोनाच्या दृष्टीनं योग्य ती खबरदारी घेणं आणि डिजीटल शिक्षणाचा प्रसार करुन याच्या गुणवत्तेकडे लक्ष देणं गरजेचं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.