मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

Work Place मध्ये चांगलं इम्प्रेशनन पडायला हवंय? नियमित करा या 4 गोष्टी

Work Place मध्ये चांगलं इम्प्रेशनन पडायला हवंय? नियमित करा या 4 गोष्टी

बदलेली लाइफस्टाइल आणि बिझी शेड्यूल मुळेही Infertilityच्या समस्या वाढायला लागली आहे.

बदलेली लाइफस्टाइल आणि बिझी शेड्यूल मुळेही Infertilityच्या समस्या वाढायला लागली आहे.

तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमची क्षमता आणि कौशल्य कंपनीच्या यशासाठी जेवढं महत्वाचं आहे तेवढंच तुमची लोकांवर चांगली छाप पडणंसुद्धा गरजेचं आहे

  • Published by:  news18 desk

नवी दिल्ली, 25 फेब्रुवारी: प्रत्येक कंपनीच्या यशामध्ये तिच्या कामगारांचं खूप महत्वपूर्ण योगदान असत. कामगारांची क्षमता आणि कौशल्य या दोनच गोष्टी कंपनीच्या यशासाठी खूप जास्त महत्वपूर्ण असतात. त्याचबरोबर कामाच्या ठिकाणी (Work Place) तुमची वर्तवणूक (Attitude) ही देखील तितकीच महत्वाची असते. जर कामाच्या ठिकाणी तुमची वागणूक ही चांगली असेल तर त्याचा कामावर सुद्धा चांगला प्रभाव पडतो. कामाच्या ठिकाणी शांततापूर्ण वातावरण असेल तर तुमचं काम देखील व्यवस्थीत होत आणि कामात मन सुद्धा चांगलं लागतं. यामुळे तुमच्या सहकाऱ्यांना सुद्धा सकारात्मक दृष्टीकोन मिळण्यास मदत होऊ शकते.

कामाच्या ठिकाणी या 4 टिप्स तुमचं प्रोफेशनल लाइफ जास्त अधिक चांगलं बनवू शकतात.

1) सकारात्मक दृष्टिकोन ( Positive Attitude )

तुमच्या मैत्रीपूर्ण वागण्यामुळे तुम्ही तुमच्या सर्व सहकाऱ्यांसोबत एक चांगली बॉन्डींग बनवू शकता. त्यांच्याशी चांगले रहा, मैत्री करा. तुम्ही सर्वांनाच खुष ठेवू शकत नाही ही जरी वस्तुस्थिती असली तरी लोकांशी वागताना एक सीमा निश्चित करून घ्या आणि शक्यतो मतभेद टाळा. प्रत्येकाशी आदरपूर्वक बोलण्याची सवय ठेवा.

2) कामात उत्साह महत्त्वाचा:

कामाच्या ठिकाणी कामाप्रती तुमचा असलेला उत्साह सकारात्मक उर्जा पसरवण्याच काम करतो. अश्याने इतर लोक देखील सकारात्मक उर्जेने कामाला लागतात. प्रत्येक वेळी काम करताना काहीतरी नवीन शिकणं हे तुम्हाला इतरांपासून वेगळ बनवत. प्रत्येक आव्हान एक संधी आहे आणि त्याला कसं सामोर जाव हे प्रत्येकाला तुमच्या कामामधून शिकवा.

अवश्य वाचा -  तुमचं कार्टं काही केल्या TV समोरून हटेना; हा VIDEO पाहा मिळेल आयडिया

3) कामाप्रती प्रामाणिकपणा:

कंपनीच्या प्रत्येक कर्मचार्‍याची वचनबद्धता महत्त्वाची आहे. प्रत्येक व्यक्ती त्याच्या जबाबदारीनुसार काम करण्याचा दृढनिश्चय करतो. या गोष्टी कंपनीच्या प्रगती आणि विकासात योगदान देत असतात. लोक जेव्हा  उद्दीष्टांसाठी प्रामाणिकपणे एकत्र काम करतात तेव्हाचं कंपनी यशस्वी होऊ शकते.

4) बॉडी लँग्वेज तुम्हाला ठरवेल वेगळं:

एखाद्या व्यक्तीच्या हावभावावरून त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्त्व समजून येऊ शकत. आपण ज्या पद्धतीने बोलतो, हात झटकत असतो तो आपल्या व्यक्तिमत्त्वाचा एक भाग आहे. म्हणूनच, आपल्या शरीराच्या भाषेवरून हे कधीही दर्शवू नये की आपण भारी मनाने काही काम करत आहात. कामाच्या ठिकाणी तुम्ही जेवढे कान्फिडेंट दिसुन याल तेवढाच लोकांवर तुमचा चांगला प्रभाव पडेल.

First published:

Tags: Lifestyle, Positive thinking, Success