Home /News /career /

MPSC Group C Exam: उमेदवारांनो, परीक्षेसाठी अर्ज केलात ना? अर्ज करण्याची उद्याची शेवटची तारीख

MPSC Group C Exam: उमेदवारांनो, परीक्षेसाठी अर्ज केलात ना? अर्ज करण्याची उद्याची शेवटची तारीख

शेवटची तारीख 11 जानेवारी 2022 असणार आहे.

शेवटची तारीख 11 जानेवारी 2022 असणार आहे.

MPSC Group C परीक्षेसाठी नोंदणी (Application link for MPSC Group C Exam) करण्याची शेवटची तारीख 11 जानेवारी 2022 असणार आहे.

    मुंबई, 10 जानेवारी: महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे लवकरच ग्रुप C परीक्षा (MPSC Group C Exam) घेतली जाणार आहे. यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) उद्योग निरीक्षक (MPSC Industry Inspector), उपनिरीक्षक (MPSC Sub Inspector), तांत्रिक सहाय्यक (Technical Asst), टेक्स सहाय्यक, लिपिक (MPSC Clerk). टंकलेखक या पदांसाठी अर्ज मागवले आहेत. तसंच मराठी (Tax Assistant, Clerk-Typist, Marathi), लिपिक टंकलेखक इंग्रजी (Clerk-Typist, English). यासह इतर पदांसाठी रिक्त जागा काढण्यात आल्या आहेत. या पदभरसाठी होणाऱ्या परीक्षेसाठी अर्ज करण्याची सुरुवात 22 डिसेंबर 2021 रोजी करण्यात आली होती. अनेकांनी या परीक्षेसाठी अर्ज केले आहेत. जर तुम्ही अजूनपर्यंत या परीक्षांसाठी नोंदणी (How to Apply for MPSC Group C Exam) केली नसेल तर तुमच्यासाठी ही शेवटची संधी असणार आहे. MPSC Group C परीक्षेसाठी नोंदणी (Application link for MPSC Group C Exam) करण्याची शेवटची तारीख 11 जानेवारी 2022 असणार आहे. MPSC Group C अंतर्गत एकूण तब्बल 900 पदांची भरती केली जाणार आहे. अशा परिस्थितीत या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारा कोणताही उमेदवार या पदावर अर्ज करू शकतो. अर्ज करण्यासाठी, उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट mpsc.gov.in वर तपशीलवार सूचना वाचल्यानंतरच अर्ज करावा असं आयोगातर्फ सांगण्यात आलं आहे. Exam Tips: आता घरबसल्या करा बँकेच्या परीक्षांची तयारी; अशा पद्धतीनं करा स्टडी अर्ज करताना उमेदवारांनी सावधानता बाळगत संपूर्ण नोटिफिकेशन (Official Notification for MPSC Group C Exam) वाचूनच अर्ज करायचे आहेत. अर्ज करताना काहीही चूक झाल्यास किंवा फॉर्ममध्ये आढळल्यास उमेदवारांचा अर्ज नाकारला जाऊ शकतो. या पदांसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून ती 11 जानेवारी 2022 पर्यंत (last date of MPSC group C exam) चालणार आहे. अशा परिस्थितीत ज्या उमेदवारांना या पदासाठी अर्ज करायचा असेल त्यांच्याकडे फक्त शिल्लक आहे. आयोगाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार औद्योगिक निरीक्षक, उपनिरीक्षक 114, तांत्रिक सहाय्यक 14, कर सहाय्यक 117, लिपिक टंकलेखक मराठी 473, लिपिक टंकलेखक इंग्रजी 79 अशा 103 पदांवर भरती केली जाणार आहे. तसंच MPSC Group C पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षेच्या आधारे या पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाईल. तर, भरती प्रक्रियेशी संबंधित अधिक माहितीसाठी, उमेदवारांना अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. Golden Chance! पुण्यातील 'या' कंपनीत 10वी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी काही महत्त्वाच्या तारखा ऑनलाइन अर्ज सादर करण्याची सुरुवातीची तारीख - 22 डिसेंबर 2021 ऑनलाइन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख - 11 जानेवारी 2022 प्राथमिक परीक्षेची तारीख - 03 एप्रिल 2022 मुख्य परीक्षेच्या तारखा (एकत्रित पेपर I) - 06 ऑगस्ट 2022 लिपिक टायपिस्ट पेपर II साठी मुख्य परीक्षा: 13 ऑगस्ट 2022 उपनिरीक्षक पेपर II साठी मुख्य परीक्षा - 20 ऑगस्ट 2022 कर सहाय्यक पेपर II साठी मुख्य परीक्षा - 27 ऑगस्ट 2022 तांत्रिक सहाय्यक पेपर II साठी मुख्य परीक्षा - 10 ऑगस्ट 2022 उद्योग निरीक्षक पेपर II साठी मुख्य परीक्षा - 17 ऑगस्ट 2022
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Career opportunities, Jobs, Mpsc examination

    पुढील बातम्या