जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / FCI Non executive Recruitment: अभ्यासाला लागा; परीक्षेच्या तारखा झाल्या जारी; आताच करा चेक

FCI Non executive Recruitment: अभ्यासाला लागा; परीक्षेच्या तारखा झाल्या जारी; आताच करा चेक

परीक्षेच्या तारखा झाल्या जारी

परीक्षेच्या तारखा झाल्या जारी

अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे प्रवेशपत्र परीक्षेच्या काही दिवस आधी जारी केले जाईल. उमेदवार ऑफिशिअल वेबसाइटवरून प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 13 डिसेंबर: फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मधील FCI Non executive पदांवरील रिक्त जागांसाठी एक महत्त्वपूर्ण अधिसूचना जारी केली आहे. जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, FCI नॉन एक्झिक्युटिव्ह भर्ती परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. या रिक्त पदासाठी परीक्षा जानेवारी 2023 मध्ये घेतली जाईल. अशा परिस्थितीत, ज्या उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज केला आहे, ते FCI Recruitment, recruitmentfci.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन परीक्षेचा तपशील पाहू शकतात. फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, सहाय्यक श्रेणी भरती परीक्षा 01 जानेवारी 2023 ते 29 जानेवारी 2023 या कालावधीत घेतली जाईल. जारी केलेल्या या रिक्त पदांद्वारे एकूण 5043 पदांची भरती केली जाईल. यामध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे प्रवेशपत्र परीक्षेच्या काही दिवस आधी जारी केले जाईल. उमेदवार ऑफिशिअल वेबसाइटवरून प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात. जगात मंदी आणि भारतात सुवर्णसंधी! ‘मॅकडोनाल्ड्स इंडिया’मध्ये लवकरच होणार बंपर पदभरती FCI Non Executive Admit Card असे डाउनलोड करा प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी, प्रथम अधिकृत वेबसाइट recruitmentfci.in ला भेट द्यावी लागेल. वेबसाइटच्या होम पेजवर सध्याच्या भरतीवर क्लिक करा. आता FCI श्रेणी I नॉन एक्झिक्युटिव्ह कनिष्ठ अभियंता, लघुलेखक, सहाय्यक श्रेणी III भर्ती 2022 परीक्षेच्या लिंकवर जा. येथे प्रवेशपत्र जारी केल्यानंतर, प्रवेशपत्र डाउनलोड करा या लिंकवर क्लिक करा. आता उमेदवारांना त्यांचा अर्ज क्रमांक आणि पासवर्ड टाकावा लागेल. सबमिशन केल्यावर, प्रवेशपत्र स्क्रीनवर उघडेल. प्रवेशपत्र डाउनलोड करा आणि पुढील वापरासाठी प्रिंट आउट घ्या. एक चूक आणि संपूर्ण करिअर उद्ध्वस्त; पोलीस भरतीसाठी ‘ते’ इंजेक्शन घेण्याचा विचारही करू नका; अन्यथा… या रिक्त पदासाठी परीक्षा 01 जानेवारी 2023 ते 29 जानेवारी 2023 या कालावधीत घेण्यात येईल. या परीक्षेला बसण्यापूर्वी, उमेदवारांनी वेबसाइटला भेट द्यावी आणि परीक्षेचा नमुना आणि अभ्यासक्रमाचा तपशील पाहावा. Maharashtra Talathi Bharti: सरकारी नोकरी हवीये ना? मग आतापासुनच लागा तयारीला; हा घ्या संपूर्ण Syllabus या पदांवर भरती केली जाणार आहे FCI भरतीद्वारे जारी केलेल्या या रिक्त पदांद्वारे एकूण 5043 पदांची भरती केली जाईल. यामध्ये कनिष्ठ अभियंता स्थापत्य पदाच्या 48, कनिष्ठ अभियंता मेकॅनिकलच्या 15 पदे, स्टेनोग्राफरच्या 73 पदे, सहाय्यक श्रेणी 2 च्या 948 पदांवर भरती होणार आहे. याशिवाय सहाय्यक श्रेणी खात्याच्या 406 पदांवर, सहाय्यक श्रेणी तांत्रिकच्या 1406 पदे, सहाय्यक श्रेणी डेपोच्या 2054 पदे आणि सहायक श्रेणी हिंदीच्या 93 पदांवर भरती केली जाणार आहे. या पदांवर निवडलेल्या उमेदवारांना 28,200 ते 34,000 रुपये प्रति महिना वेतन दिले जाईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात