मराठी बातम्या /बातम्या /करिअर /एक चूक आणि संपूर्ण करिअर उद्ध्वस्त; पोलीस भरतीसाठी 'ते' इंजेक्शन घेण्याचा विचारही करू नका; अन्यथा...

एक चूक आणि संपूर्ण करिअर उद्ध्वस्त; पोलीस भरतीसाठी 'ते' इंजेक्शन घेण्याचा विचारही करू नका; अन्यथा...

'ते' इंजेक्शन घेण्याचा विचारही करू नका

'ते' इंजेक्शन घेण्याचा विचारही करू नका

तुम्हीही महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी शारीरिक परीक्षा देणार असाल तर स्टेरॉईड घेण्याचा विचार चुकूनही करू नका. यामुळे तुमचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 13 डिसेंबर: सध्या संपूर्ण देशभरात तरुणांसाठी भरती सुरु आहेत. केंद्र सरकार कडून सैन्यात सामील होण्यासाठी अग्निविरांची भरती सुरु आहे तर महाराष्ट्रात पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मात्र कोल्हापुरात सुरू असलेल्या अग्निवीर भरतीमध्ये एक धकाकदायक प्रकार समोर आला होता. भारतीसाठी अंगी जोश येण्यासाठी इथल्या काही तरुणांनी स्टेरॉईड घेतल्याचीमाहिती समोर आली होती. असाच काही प्रकार आता महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये होतोय की काय अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. पण तुम्हीही महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी शारीरिक परीक्षा देणार असाल तर स्टेरॉईड घेण्याचा विचार चुकूनही करू नका. यामुळे तुमचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं.

सामान्यतः खेळाडू किंवा धावपटू स्वतःची एनर्जी टिकवून ठेवण्यासाठी किंवा अतिरिक्त एनर्जीसाठी स्टेरॉईड घेतात. तसंच काही रोगांवरही स्टेरॉईड उपयोगी आहे. मात्र खेळांमध्ये डोपिंग किंवा स्टेरॉईड किंवा ड्रग्स घेणं हा दंडनीय गुन्हा आहे. भारत सरकारच्या नॅशनल अँटी डोपिंग एजन्सीकडून खेळाडूंवर या अंतर्गत कारवाई करण्यात येते.

Maharashtra Talathi Bharti: सरकारी नोकरी हवीये ना? मग आतापासुनच लागा तयारीला; हा घ्या संपूर्ण Syllabus

अग्निवीर भरती किंवा पोलीस भरतीच्या चाचण्यांमध्ये उमेदवारांना अनेक किलोमीटर्स धावण्याची टेस्ट द्यावी लागते. तसंच इतरही काही शहरीक टेस्ट द्याव्या लागतात. या सर्व टेस्टमध्ये जोश टिकून राहावा यासाठी स्टेरॉईड घेण्यात येतात. पण एकदा घेतलेलं स्टेरॉईड तुमचं संपूर्ण करिअर खराब करू शकतं.

एका क्षणात संपेल संपूर्ण करिअर

समजा स्टेरॉईड घेऊन अति जोश निर्माण करण्यासाठी तुम्ही पोलीस भरतीच्या शारीरिक चाचणीला गेलात तर तुम्हाला गंभीर आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

तसंच भरतीदरम्यान तुम्ही कोणत्याही अमली पदार्थांचं सेवन केलेले आढळून आले तर तुमच्यावर त्याच क्षणी कठोर कारवाई केली जाऊ शकते.

कायद्यानुसार तुमच्यावर पाच ते सात वर्षांचं बंदी घालण्यात येऊ शकते.

तसंच ड्रग्स किंवा स्टेरॉईडचं सेवन केलं असल्यास तुमच्यावर संपूर्ण आयुष्यभर बंदी घालण्यात येऊ शकते.

IIPS Recruitment: थेट अधिकारी पदांवर नोकरीची सुवर्णसंधी; मुंबईत इथे होतेय बंपर पदभरती

स्टेरॉईडचे शरीरावर होणारे परिणाम

अपचन किंवा छातीत जळजळ

वाढलेली भूक, ज्यामुळे वजन वाढू शकते

झोपण्यात अडचण

मनःस्थिती आणि वर्तनात बदल, जसे की चिडचिड किंवा चिंता वाटणे

संसर्गाचा वाढलेला धोका – विशेषत: कांजिण्या, शिंगल्स आणि गोवर

उच्च रक्त शर्करा किंवा मधुमेह

हाडे कमकुवत होणे (ऑस्टिओपोरोसिस)

उच्च रक्तदाब

सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला स्टेरॉईड घेतल्यानंतर हार्ट अटॅकचाहे धोका असू शकतो.

आहात कुठे? तब्बल 95,000 रुपये सॅलरीची नोकरी अन् अर्जासाठी अवघे 4 दिवस शिल्लक; इथे बंपर भरती

त्यामुळे अग्निवीर भारीमध्ये जो गैरप्रकार झाला तो पोलीस भरतीच्या शारीरिक चाचणीमध्ये होणार नाही हीच अपेक्षा सर्वजण बाळगून आहेत. तसंच स्टेरॉईड घेतल्यामुळे तुमचं संपूर्ण करिअर उद्ध्वस्त होऊ शकतं. त्यामुळे असा कुठलाही गैरव्यवहार करण्याआधी स्वतःच्या करिअरचा नक्की विचार करा.

First published:

Tags: Career, Career opportunities, Drugs, Maharashtra News, Mumbai police