मुंबई, 12 डिसेंबर: महाराष्ट्रातील तरुणांसाठी आणखी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. राज्यात पोलीस पाठोपाठ तलाठी भरतीचा जीआरही प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यामुळे तलाठी होण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. तलाठी भरती 2022 चा जीआर प्रसिद्ध करण्यात आला आहे. यात तब्बल 3110 तलाठी आणि 511 मंडळ अधिकारी पदांना मान्यता देण्यात आली आहे. यासंबंधित जाहिरात ही डिसेंबर महिन्याच्या अखेरीस किंवा जानेवारी महिन्यात अपेक्षित आहे. त्यामुळे तरूणांसाठी नोकरीची नवी संधी होणार आहे. मात्र या भरतीसाठीच्या परीक्षेचा नेमका अभ्यासक्रम कसा असणार आहे याबद्दल अनेकांना माहिती नाहीये. म्हणूच आज आम्ही तुम्हाला महाराष्ट्र तलाठी भरतीचा संपूर्ण सिलॅबस सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया.
महाराष्ट्र तलाठी मातीच्या परिकसेत एकूण पाच विषयांवर प्रश्न विचारण्यात येणार आहेत. ते विषय खालीलप्रमाणे आहेत. चला तर जाणून घेऊया प्रत्येक विषयाचा संपूर्ण सिलॅबस.
Marathi Language (मराठी भाषा)
English Language (इंग्रजी भाषा)
General Knowledge (सामान्य ज्ञान)
Arithmetic / Mathematics (अंकगणित)
Reasoning /General intelligence (सामान्य बुद्धिमत्ता)
SBI Recruitment 2022: 'या' पदांसाठीच्या 55 Vacancy; अर्जाला अवघे काही तास शिल्लक; ही घ्या लिंक
Marathi Language (मराठी भाषा)
विषय | विषय |
समानार्थी शब्द | विशेषण |
विरुद्धार्थी शब्द | क्रियाविशेषण |
काळ व काळाचे प्रकार | विभक्ती |
शब्दांचे प्रकार, नाम | संधी व संधीचे प्रकार म्हणी |
सर्वनाम | वाक्प्रचार चे अर्थ व उपयोग |
क्रियापद | शब्दसमूहाबद्दल एक शब्द. |
English Language (इंग्रजी भाषा)
विषय | विषय |
Vocabulary | Symons & Anatomy |
Proverbs | Spot The Error |
Tense & Kinds Of Tense, | Verbal Comprehension Passage Etc |
Question Tag, Sentence, Structure | Spelling |
Use Proper Form Of Verb | One Word Substitution, Phrases. |
NHM Recruitment: ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी मोठी सुवर्णसंधी; 'या' पदांसाठी संपूर्ण राज्यभरात मेगाभरती
General Knowledge (सामान्य ज्ञान)
विषय | विषय |
महाराष्ट्राचा व भारताचा इतिहास (History of Maharashtra and India) | पंचायतराज व राज्यघटना (Panchayat Raj and Constitution) |
भारतीय संस्कृती (Indian culture) | भौतिकशास्त्र (Physics) |
रसायनशास्त्र (Chemistry) | जीवशास्त्र (Biology) |
महाराष्ट्रातील समाज सुधारकांचे कार्य (The work of social reformers in Maharashtra) | भारताच्या शेजारील देशांची माहिती (Information of neighboring countries of India) |
Arithmetic / Mathematics (अंकगणित)
विषय | विषय |
गणित – अंकगणित | काळ-काम-वेग संबंधित उदाहरणे |
बेरीज | सरासरी |
वजाबाकी | चलन |
गुणाकार | मापनाची परिणामी |
भागाकार | घड्याळ. |
Reasoning /General intelligence (सामान्य बुद्धिमत्ता)
विषय | विषय |
अंकमालिका | अक्षर |
अक्षर मलिका | आकृती |
वेगळा शब्द व अंक ओळखणे | वाक्यावरून निष्कर्ष |
समसंबंध – अंक | वेन आकृती. |
IT Jobs: 'ही' मोठी IT कंपनी तरुणांना देणार जॉबची मोठी संधी; लाखो रुपये देणार पगार
वर दिलेल्या अभ्यासक्रमावरच संपूर्ण भरती परीक्षा असणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी वरील सर्व विषयांचा अभ्यास करून येणं अपेक्षित आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Career, Career opportunities, Job alert, Jobs Exams, Maharashtra News