नवी दि्ल्ली, 24 एप्रिल : भारतीय रेल्वेत नोकरीसाठी (Indian Railway Recruitment) भरती सुरु असेल तर लाखो तरुण त्यासाठी लगेच अर्ज करतात. कारण रेल्वेसारखी सरकारी नोकरी (Government Job) कोणाला आवडणार नाही. मात्र या सरकारी नोकरीच्या जाळ्यात अडकून अनेकांची फसवणूक होते, हेही लक्षात घेणे आवश्यक आहे. दरम्यान, रेल्वेत नोकरी मिळवण्यासाठी असेच एक पत्र सोशल मीडियावर व्हायरल (Social Media Viral) होत आहे. हे पत्र खरे की बनावट असा प्रश्न उपस्थित होत आहे. पत्रात काय लिहिले आहे? हे पत्र एका अधिसूचनेसारखे आहे, ज्यामध्ये 30 मार्च रोजी दिल्लीत रेल्वे मंत्री आणि रेल्वे अध्यक्षांच्या बैठकीनुसार रेल्वेत नोकरीसाठी जागा निघाल्याचे म्हटले आहे. या नोकर्या तांत्रिक आणि गैर-तांत्रिक कर्मचार्यांसाठी काढल्या जातात. एकूण पदांची संख्या सुमारे 2800 आहे. सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या जागी नवीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाईल, असे सांगण्यात आले. GST Slab: महागाईचा बोजा आणखी वाढणार;143 वस्तूंच्या किमती वाढवण्याची शक्यता, GST काऊन्सिलची शिफारस रेल्वेने दिलं स्पष्टीकरण भारतीय रेल्वेने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून स्पष्ट केले आहे की हे पत्र किंवा नोकरीची सूचना पूर्णपणे बनावट आहे. यासोबतच तरुणांनी अशा फसवणुकीत पडू नये, असे आवाहनही रेल्वेने लोकांना केले आहे. रेल्वेने म्हटले आहे की कोणत्याही रिक्त जागांबद्दल जाणून घेण्यासाठी फक्त रेल्वे बोर्डाच्या वेबसाइटला rrbbnc.gov.in भेट द्या.
A fake letter of recruitment is being circulated by miscreants. Candidates are cautioned to not fall prey to such fraud. Refer to RRB website ONLY for all recruitment related information https://t.co/G6kO0Y4xoM#dontfallpreytofakenews@KarnatakaVarthe .@RailMinIndia pic.twitter.com/VQhns1DJoG
— South Western Railway (@SWRRLY) April 24, 2022
कर्ज घेणे चांगलंही आणि वाईटही; तज्ज्ञांचं मत वाचा, कर्जबाजारी होण्यापासून नक्की वाचाल अनेकदा अशा फसवणुकीच्या घटना घडतात फसवणूक करणारे, अशा रिक्त पदांची बनावट पत्रे व्हायरल करून लोकांकडून फॉर्म फी वसूल करतात. रेल्वेच्या नावावर नोकऱ्या देण्याचा एक मोठा फायदा म्हणजे अनेक लोक नोकरीसाठी अर्ज करतात. समजा त्याने एका व्यक्तीकडून फक्त 100 रुपये फी घेतली आणि 1 लाख लोकांनी अर्ज केला, तर या ठगांना 1 कोटी रुपयांची मोठी कमाई होते. अशा परिस्थितीत तुम्हीही अशा फसवणुकीपासून दूर राहण्याची गरज आहे.