मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

ट्विटर, इन्स्टानंतर आता मेटाचा दणका! तब्बल 11,000 हून अधिक कर्मचाऱ्यांना एका क्षणात काढलं

ट्विटर, इन्स्टानंतर आता मेटाचा दणका! तब्बल 11,000 हून अधिक कर्मचाऱ्यांना एका क्षणात काढलं

ट्विटर, इन्स्टानंतर आता मेटाचा दणका! तब्बल 11,000 हून अधिक कर्मचाऱ्यांना एका क्षणात काढलं

ट्विटर, इन्स्टानंतर आता मेटाचा दणका! तब्बल 11,000 हून अधिक कर्मचाऱ्यांना एका क्षणात काढलं

फेसबुकची मातृ कंपनी मेटाने 11,000 हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढले आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Suraj Sakunde

मुंबई, 9 नोव्हेंबर: ट्विटर, इंस्टाग्राम आणि फेसबुकसारख्या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचं धाबं दणाणलं आहे. गेल्या काही दिवसांपासून या कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात कपात सुरु आहे. एलन मस्क यांनी ट्विटर खरेदी केल्यानंतर ट्विटरच्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यांसह मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची कपात केली होती. ट्विटरनंतर इन्स्टाग्रामनंही कर्मचाऱ्यांची कपात केली होती. कर्मचारी कपात करणाऱ्या कंपन्यांमध्ये आता फेसबुकची पेरेंट कंपनी असेलेल्या मेटाचीही समावेश होणार आहे. 'द वॉल स्ट्रीट जर्नल'मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, मेटानं हजारो कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याची तयारी केली आहे.

मेटानं 11,000हून अधिक कर्मचाऱ्यांना काढून टाकलं:

11,000हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं आहे. फेसबुकची मूळ कंपनी मेटा प्लॅटफॉर्म्स इंक. या प्रकरणाशी संबंधित असलेल्या लोकांच्या म्हणण्यानुसार बुधवारी आपल्या कंपनीतील कामगारांना मोठ्या प्रमाणावर काढून टाकण्याची योजना आखत आहे. कंपनीच्या महसुलात घट झाल्यानंतर सोशल मीडिया कंपनीनं ही कारवाई केली आहे. मेटाचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी आज एका ब्लॉग पोस्टमध्ये सांगितलं की मी मेटाच्या इतिहासातील काही सर्वात कठीण बदल शेअर करत आहे. मी माझ्या टीमचा आकार सुमारे 13 टक्क्यांनी कमी करण्याचा आणि आमच्या 11,000 हून अधिक प्रतिभावान कर्मचाऱ्यांना कंपनीमधून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

मेटाचे संस्थापक मार्क झुकरबर्ग म्हणाले की, "आम्ही खर्चात कपात करून आणि  Q1 च्या माध्यमातून अधिक कार्यक्षम कंपनी बनण्यासाठी आम्ही महत्त्वाची पावलं उचलत आहोत."  त्यामुळं मोठ्या प्रमाणात बजेट कपातीची तयारी सुरू आहे. विशेष म्हणजे डिजिटल जाहिरातींच्या कमाईत तीव्र मंदीमुळे कंपनीला हे पाऊल उचलावे लागले आहे.

हेही वाचा : ट्विटर डिलनंतर एलन मस्क यांना दुसरा दणका, शेअर्स विकण्याची आली वेळ?

मेटानं कर्मचारी कपातीचा निर्णय का घेतला?

कंपनीच्या 18 वर्षांच्या इतिहासातील ही सर्वांत मोठी कर्माचारी कपात असेल. ट्विटरमध्ये जितकी कर्मचारी कपात झाली किंवा होणार आहे, त्यापेक्षा कितीतरी जास्त कर्मचारी मेटामधून कमी केले जातील. मेटाच्या कर्मचारी कपातीमागे पाच मोठी कारणं असल्याचं सांगितलं जात आहे.

गेल्या तिमाहीत मेटाची व्हर्च्युअल रिअॅलिटी कंपनी असलेल्या 'रिअॅलिटी लॅब'ला 3.7 बिलियन डॉलर्सचं नुकसान सोसावं लागलं आहे. कर्मचारी कपातीचं हे सर्वात मोठं कारण समजल जात आहे. मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांच्या संपत्तीत झालेली प्रचंड घसरणसुद्धा कर्मचारी कपातीस कारणीभूत ठरली आहे. 2022च्या सुरुवातीपासून झुकरबर्गच्या वैयक्तिक संपत्तीत सातत्यानं घट होत आहे.

झुकेरबर्गचा मेटामध्ये 13 टक्के हिस्सा आहे. जाहिरातींमधून मेटाला मिळणाऱ्या उत्पन्नात घट झाली आहे. मेटानं लावलेल्या अंदाजानुसार, 2022 मध्ये जाहिरात महसुलात कंपनीला 10 बिलियन डॉलर्सचं नुकसान होऊ शकतं. कंपनीनं प्रायव्हसी नियमांमध्ये बदल केल्यामुळे ही घसरण पाहायला मिळत आहे.

First published:

Tags: Facebook