जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / 10th, 12th Exam Tips: विद्यार्थ्यांनो, बोर्डाच्या परीक्षांसाठी नेमका कसा करावा अभ्यास? वाचा या महत्त्वाच्या टिप्स आणि व्हा यशस्वी

10th, 12th Exam Tips: विद्यार्थ्यांनो, बोर्डाच्या परीक्षांसाठी नेमका कसा करावा अभ्यास? वाचा या महत्त्वाच्या टिप्स आणि व्हा यशस्वी

5. स्टडी रूममध्ये अभ्यास करताना हे ध्यानात ठेवावे की, तुमचा चेहरा पूर्व किंवा उत्तर दिशेला असावा.

5. स्टडी रूममध्ये अभ्यास करताना हे ध्यानात ठेवावे की, तुमचा चेहरा पूर्व किंवा उत्तर दिशेला असावा.

आज आम्ही तुम्हाला अभ्यास करण्याच्या काही उत्तम सवयी काही टिप्स देणार आहोत ज्यामुळे तुम्ही बोर्डाच्या परीक्षांसाठी चांगल्या पद्धतीनं अभ्यास करू शकाल

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 03 मार्च: पहिल्या वर्गापासून तर दहावीआणि बारावीच्या च्या बोर्डाच्या परीक्षेपर्यंत (10th 12th Board Exams) एक गोष्ट तुम्हाला सातत्यानं करावी लागते ती म्हणजे अभ्यास (Study for board Exams). अभ्यास केला नाहीस तर पास होणार नाहीस असं मोठी माणसं नेहमी म्हणत असतात. मात्र अभ्यास नक्की कसा करावा? (How to do study for board exams) कुठे करावा? आणि कोणत्या पद्धतीनं करावा? या काही प्रश्नांची उत्तरं अनेकांना माहितीच नसतात. त्यामुळे बोर्डाची परीक्षा तोंडावर आली की अशा विद्यार्थ्यांची तारांबळ उडते. पण आता अजिबात काळजी करू नका. आज आम्ही तुम्हाला अभ्यास करण्याच्या काही उत्तम (Ways to do study) सवयी काही टिप्स देणार आहोत ज्यामुळे तुम्ही बोर्डाच्या परीक्षांसाठी चांगल्या पद्धतीनं अभ्यास (Preparation Tips for 10th 12th Board Exams) करू शकाल. चला तर मग जाणून घेऊया. अशी करा अभ्यासाला सुरुवात अभ्यास करण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे अभ्यासाची जागा. तज्ज्ञांच्या मते विद्यार्थ्यांनी घरात अभ्यासाची जागा ठरवून घ्यावी. रोज एकाच ठिकाणी अभ्यासाला बसण्याची सवय ठेवावी. स्वतंत्र खोली असल्यास उत्तमच किंवा घरातील एक विशिष्ट कोपरा निवडावा. एकाच ठिकाणी रोज अभ्यासाला बसल्याने त्या ठिकाणी गेल्यानंतर मन आपोआप अभ्यासासाठी तयार होतं. तसंच अभ्यासाला बसताना गादीवर लोळून अभ्यास करू नये. टेबल खुर्चीवर बसून अभ्यास केल्यास प्रश्नांची उत्तरं अधिक काळ स्मरणात राहतील. विद्यार्थ्यांनो, परीक्षेदरम्यान गॅजेट्समुळे होऊ शकतं नुकसान; असे राहा दूर एका विषयाला किमान एक तास आपण वाचलेली कुठलीही उत्तरं आपल्या दीर्घकाळ स्मरणात राहण्यासाठी सुरुवातीची 10 मिनिटे महत्वाची आहेत. आपले मन त्या अभ्यासघटकाशी समरस व्हायला किमान दहा मिनिटे लागतात. त्यानंतर आपण त्या विषयाच्या अंतरंगात प्रवेश करतो. त्या विषयाशी संबंधित सर्व गोष्टी आपल्याला आठवू लागतात. त्यानंतर आपण त्या विषयाशी समरस होऊन तो आत्मसात करू शकतो. तुमचा मेंदू जोपर्यंत त्या विषयावर प्रभुत्व मिळवत नाही तोपर्यंत तुमच्या स्मरणात तो विषय राहत नाही. त्यामुळे एका विषयाला किमान एक तास द्या. आहाराकडे लक्ष द्या अभ्यासाच्या दिवसांमध्ये अनेक विद्यार्थ्यांना दीर्घकाळ एकाच जागी बसून अभ्यास करण्याची सवय असते. म्हणूनच आहाराकडे लक्ष देणे महत्वाचे आहे. अभ्यास सुरू करण्याच्या आधी अतिशय गोड, अतिशय मसालेदार किंवा अतिस्निग्ध पदार्थ आहारात टाळावेत. अशा पदार्थांमुळे ग्लानी येण्याची शक्यता असते. तसेच शरीराच्या स्वच्छतेकडे लक्ष द्यावे. कपडे स्वच्छ, नेटके व सैलसर असावेत. नखे कापलेली असावीत. दुर्गंधी, खाज, आग होणे यामुळे एकाग्रता साधण्यात अडचणी येतात. Exams Tips: तुम्हीही स्पर्धा परीक्षांची तयारी करत असाल तर ही पुस्तकं येतील कामी मन स्थिर ठेवा अभ्यासला बसताना तुमची सर्व कामे आटोपून अभ्यासाला बसा. अभ्यास करताना शरीर शक्यतोवर स्थिर ठेवावे, चुळबुळ करु नये. पेन किंवा पेन्सील चावणे, केस खाजवणे, विनाकारण इकडेतिकडे बघणे, वेडेवाकडे बसणे अशा गोष्टी टाळाव्यात. तसंच तुमचं मन आणि बुद्धी अभ्यासावर केंद्रित करा. अभ्यासाच्या वेळी कोणताही इतर विचार करू नका. शरीर आणि मन स्थिर असल्यास तुम्हाला अभ्यासात गोडी निर्माण होईल. तसंच तुमची स्मरणशक्तीही उत्तम राहण्यास मदत होईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात