Home /News /career /

Exam Tips: आता स्पर्धा परीक्षांमध्ये GK होईल सहज Crack; 'या' ट्रिक्स वापरून करा अभ्यास

Exam Tips: आता स्पर्धा परीक्षांमध्ये GK होईल सहज Crack; 'या' ट्रिक्स वापरून करा अभ्यास

जनरल नॉलेजचा अभ्यास कशा पद्धतीनं करावा जाणून घ्या

जनरल नॉलेजचा अभ्यास कशा पद्धतीनं करावा जाणून घ्या

आज आम्ही तुम्हाला जनरल नॉलेजचा (GK study tips) अभ्यास कशा पद्धतीनं करावा हे सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया.

    मुंबई, 04 जानेवारी: आजकाल जगभरात नोकरीसाठी (latest jobs) स्पर्धा वाढली आहे. कोणतीही कंपनी (Private Company jobs) असो की सरकारी संस्था (Government jobs) पदभरतीच्या वेळी परीक्षा घेण्यात येते. त्यासाठी कंपनीत असलेल्या पोस्टनुसार प्रश्न विचारले जातात. त्यात जर सरकारी नोकरी (Latest Government Jobs) असेल तर त्यात गणित (Maths), विज्ञान (Science), मेंटल स्किल्स (Mental Skills) बरोबरच सामान्य ज्ञानाबद्दलही (how to prepare for General Knowledge) प्रश्न विचारले जातात. मात्र अनेकदा विद्यार्थी इतर विषयांत चांगले गुण मिळवूनही सामान्य ज्ञानात मार्क्स मिळवू शकत नाहीत. याचं प्रमुख कारण म्हणजे चुकीच्या पद्धतीनं केलेला अभ्यास आणि ज्ञानाची कमतरता. मात्र आता चिंता करू नका. स्पर्धा परीक्षा (Competitive Exam) असो की नोकरीची परीक्षा आज आम्ही तुम्हाला जनरल नॉलेजचा (GK study tips) अभ्यास कशा पद्धतीनं करावा हे सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया. GK आतंरराष्ट्रीय न्यूज पेपर वाचणं आवश्यक    जगभरात हजारो प्रादेशिक वृत्तपत्र आहेत पण यामध्ये केवळ त्याच्या सभोवतालच्या घटनांशी संबंधित बातम्या आढळतात जे पुरेसं नाही. म्हणून GK वाढवण्यासाठी इंग्रजी आंतरराष्ट्रीय GK न्यूज पेपर (International News Paper) वाचणं आवश्यक आहे. हे वृत्तपत्र दररोज 1 तास वाचलं पाहिजे. यामुळे नक्कीच तुमचं GK वाढण्यास मदत होईल. विद्यार्थ्यांनो, आता 'या' हटके ब्रांचेसमध्ये करा Engineering; मिळेल भरघोस पगार दररोज इंग्रजी बातम्या ऐका दररोज किमान अर्धा तास इंग्रजी बातम्या ऐका. दररोज इंग्रजी बातम्या ऐकल्यामुळे आपल्या GK मध्ये सुधारणा होईल. तुमची स्मरणशक्ती देखील सुधारेल. तुम्ही कोणत्याही चॅनेल किंवा रेडिओवरील बातम्या ऐकू शकता कारण हा बातम्यांचा सर्वोत्तम स्रोत आहेत. Quiz आणि GK टेस्ट द्या वृत्तपत्र किंवा वेबद्वारे दरमहा किमान एक GK टेस्ट द्या. बरेच क्विझ आणि GK गेम्स या स्वरुपात देखील उपलब्ध आहेत जे खेळत असताना आपण बऱ्याच गोष्टी शिकु शकतो. 10वी उत्तीर्णांनो, इलेक्ट्रिकलच नाही तर 'या' हटके क्षेत्रांमध्येही करू शकता ITI GK चं पुस्तक वाचा आपले ज्ञान विस्तृत करण्याचा एक चांगला मार्ग म्हणजे वाचन. GK वाढवण्यासाठी आपण विविध विषयांवरील पुस्तकं वाचन महत्त्वाचं आहे. बुक्स स्टोअरमध्ये हजारो GK पुस्तकं (GK books) उपलब्ध असतात इथून तुम्ही आवडीपैकी कोणतंही एक निवडू शकता आणि सामान्य ज्ञानाचं पुस्तक वाचण्यास सुरुवात करू शकता.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Career opportunities, Exam, Jobs

    पुढील बातम्या