मराठी बातम्या /बातम्या /करिअर /10वी उत्तीर्णांनो, इलेक्ट्रिकलच नाही तर 'या' हटके क्षेत्रांमध्येही करू शकता ITI; मिळेल चांगली नोकरी

10वी उत्तीर्णांनो, इलेक्ट्रिकलच नाही तर 'या' हटके क्षेत्रांमध्येही करू शकता ITI; मिळेल चांगली नोकरी

ITI च्या अशाच काही हटके कोर्सेसबाबत माहिती

ITI च्या अशाच काही हटके कोर्सेसबाबत माहिती

आज आम्ही तुम्हाला ITI च्या अशाच काही हटके कोर्सेसबाबत माहिती देणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया.

मुंबई, 02 जानेवारी: देशात आजकालच्या काळात बहुतांश विद्यार्थी हे इंजिनिअरिंग (Career in Engineering) करतात. मात्र असेही काही विद्यार्थी असतात जे कुटुंबच्या परिस्थितीमुळे शिकू शकत नाहीत किंवा कमी मार्क्स मिळाल्यामुळे ज्यांना चांगल्या कॉलजेमध्ये प्रवेश मिळू शकत नाही. असे विद्यार्थी इतर क्षेत्रांकडे न जात ITI म्हणजेच औद्योगिक शिक्षणाचा (career in ITI) मार्ग स्वीकारतात. या महामारीच्या काळात अशा उमेदवारांना प्रचंड मागणी आहे. सरकारच्या मोठ्या कंपन्यांमध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून अशा उमेदवारांना जॉब्स (ITI Jobs) मिळतात. मात्र बहुतांश विद्यार्थी हे ITI म्हंटलं की मशिनिस्ट, इलेकट्रिशिअन, फिटर, मॅकेनिक असे कोर्सेस निवडतात. मात्र यांपेक्षा काही वागल्या क्षेत्रांमध्येही ITI (Top ITI branches) केलं जाऊ शकतं. ज्यामध्ये शिक्षण पूर्ण करून तुम्ही जॉब्सही करू शकता आणि स्वतःचा व्यवसायही सुरु करू शकता. आज आम्ही तुम्हाला ITI च्या अशाच काही हटके कोर्सेसबाबत माहिती देणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया.

प्लंबर ट्रेडमध्ये ITI    

2 ते 3 वर्षांच्या या प्लंबर कोर्समध्ये तुम्हाला प्लंबिंग (ITI in Plumbing) तंत्रज्ञानाची माहिती मिळते, इथे तुम्हाला अनेक प्रकारची माहिती मिळते जी तुम्हाला इतर कोठेही मिळत नाही. आयटीआयच्या प्रत्येक अभ्यासक्रमाप्रमाणे हा अभ्यासक्रमही खूप महत्त्वाचा आहे. यामध्येही रोजगाराच्या भरपूर संधी आहेत. हा कोर्स केल्यानंतर तुम्हाला शासनाच्या पाटबंधारे विभाग, कालवा प्रकल्प इत्यादी अनेक खात्यांमध्ये काम करण्याची संधी मिळते. तसंच तुम्ही स्वतःचा प्लम्बिंगचा व्यवसाय सुरु करू शकता.

GATE Exam Tips: आता एका प्रयत्नात क्रॅक होणार GATE परीक्षा; फॉलो करा या IMP Tips

कॅनिक कॉम्प्युटर हार्डवेअरमध्ये ITI

टेक्नॉलॉजीशी संबंधित हा कोर्स तुम्हाला मशिनसोबत कसे काम करायचे हे शिकवतो, तसेच या कोर्समध्ये तुम्ही कॉम्प्युटर आणि त्याचे इतर भाग (ITI in Computer Hardware) दुरुस्त करायला शिकता. हा एक तांत्रिक अभ्यासक्रम आहे, जर तुम्हाला या क्षेत्रात रस असेल तर तुम्ही त्यात प्रवेश घ्यावा. या अभ्यासक्रम कालावधी 2 वर्षे ते 3 वर्षे इतका असतो. या क्षेत्रात रोजगाराच्या भरपूर संधी आहेत आणि तुम्हाला खूप चांगला पगारही मिळू शकतो. तसंच तुम्ही स्वतःचा कम्प्युटर रिपेअरिंगचा व्यवसायही सुरु करू शकता.

रेडिओ आणि दूरदर्शन मेकॅनिकमध्ये ITI

दहावी पास विद्यार्थ्यासाठी हा सर्वोत्तम पर्याय आहे, हा कोर्स दोन वर्षांचा आहे, ज्यामध्ये टीव्ही आणि रेडिओ किंवा इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे (ITI in Radio and TV mechanic) दुरुस्त करणे शिकवले जाते. कोणत्या विषयात आयटीआय करावे. तुम्ही तुमचे स्वतःचे दुकान उघडू शकता किंवा कुठेही नोकरी करू शकता. तसंच तुम्ही रेडिओ आणि TV दुरुस्तीचे कामही करू शकता.

तुम्हीही रात्री उशिरापर्यंत जागून अभ्यास करता? मग जाणून घ्या फायदे आणि तोटे

इंटिरिअर डेकोरेशन आणि डिझायनिंगमधील ITI

आयटीआयचा हा कोर्स तुम्हाला इंटीरियर डेकोरेशन (ITI in Interior Decoration) आणि डिझायनिंग अधिक चांगल्या पद्धतीने शिकवेल जो एक चांगला व्यवसाय असू शकतो. हा कोर्स विशेषतः डेकोरेशन आवडणाऱ्या मुलामुलींसाठी आहे. या क्षेत्रात आयटीआय केल्यानंतर, तुम्ही कोणत्याही मोठ्या इंटीरियर डेकोरेटरमध्ये सहाय्यक म्हणून काम करू शकता. वेळ आणि अनुभवानंतर, तुम्ही स्वतःचे काम सुरू करू शकता.

First published:

Tags: Career opportunities, Tips, जॉब