मुंबई, 02 जानेवारी: भारतात बारावीनंतर (Engineering after 12th) किंवा इंजिनिअरिंगच्या डिप्लोमानंतर
(Diploma in engineering) अनेक विद्यार्थी इंजिनिअरिंगकडे वळतात. नक्की कोणत्या ब्रांचमध्ये
(Best branch in engineering) प्रवेश घ्यावा यावरून त्यांच्या मनात संभ्रम निर्माण होतो. त्यात जवळपास सर्वच खासगी कॉलेजेसमध्ये कम्प्युटर
(Computer), मेकॅनिकल (Mechanical), सिव्हिल (Civil), इलेक्ट्रिकल (Electrical), इलेक्ट्रॉनिक्स (Electronics) अशा काही ब्रांचेस असतात. वर्षभरात या सर्व ब्रांचेसमधून लाखो विद्यार्थी इंजिनिअर होतात. मात्र त्यानंतर जॉब्सच्या
(Jobs in Engineering) कमतरतेमुळे त्यांना जॉब मिळू शकत नाही. असं प्रत्येकाच्याच बाबतीत होईल असं नाही. मात्र तुम्हाला माहिती आहे का या ब्रांचेसशिवाय अजून काही ब्रांचेस
(Rear Branches in Engineering) आहेत. ज्याबद्दल खूप कमी विद्यार्थ्यांना माहिती आहे. या ब्रांचेसमधून इंजिनिअरिंग केल्यास यश मिळू शकतं आणि पगारही. अर्थात यातील काही ब्रांचेस भारतात उपलब्ध आहेत तर काही परदेशात. चला तर मग जाणून घेऊया.
Ceramic Engineering (सिरॅमिक इंजिनिअरिंग)
सिरेमिक इंजिनिअरिंग म्हणजेच अजैविक, धातू (Metals) नसलेल्या पदार्थांपासून वस्तू तयार करण्याचं विज्ञान आणि तंत्रज्ञान (Science and technology). यामध्ये काही अधातू पदार्थांपासून वस्तू बनवण्याबाबत शिक्षण घेता येईल. हे इंजिअरिंगची वेगळी ब्रांच असल्यामुळे विद्यार्थ्यांचा कल कमी असतो.
Exam Tips: कोणत्याही परीक्षेत झटपट पास व्हायचंय? मग या गोष्टींकडे द्या लक्ष
Earthquake Engineering (अर्थक्वेक इंजिनीअरिंग)
या इंजिनिअरिंगच्या ब्रान्चबद्दल तुम्ही नक्कीच ऐकलं नसेल. भूकंपांपासून (Earthquake) समाज, निसर्ग आणि मानवनिर्मित वातावरणाचं रक्षण व्हावं. तसंच भूकंप होण्यापासून सामाजिक,आर्थिक पातळीवर संरक्षण कसं करावं याबाबत हे इंजिनिअरिंग आहे.
मरीन इंजिनिअरिंग (Marine Engineering)
बोटी, जहाज, तेलांचे तेल आणि इतर कोणत्याही सागरी जहाजांबाबत (Ships in ocean) संशोधन तसंच अध्ययन करणे म्हणजे मारिन इंजिनिअरिंग. यात समुद्रातील सर्व व्यवसाय आणि जहाजाच्या आतमधील प्रणालीबाबत माहिती मिळते.
पेट्रोलियम इंजिनिअरिंग (Petroleum Engineering)
पेट्रोलियम इंजिनिअरिंग एक क्षेत्र आहे जे हायड्रोकार्बनच्या (Hydrocarbon) उत्पादनाशी संबंधित उपक्रमांशी संबंधित आहे. ज्यामध्ये कच्चं तेल (Raw Oil) किंवा नैसर्गिक वायू (Natural Gas) याबाबत सखोल अभ्यास केला जाऊ शकतो.
Exam Tips: कोणत्याही परीक्षेत झटपट पास व्हायचंय? मग या गोष्टींकडे द्या लक्ष
एरोस्पेस इंजिनिअरिंग (Aerospace Engineering)
यामध्ये विमान (Aircraft) , अवकाशयान (Spacecraft) इत्यादी एरोस्पेस (Aerospace system) सिस्टमच्या काही भागांचा सखोल अभ्यास असतो. तसंच विमानाच्या आणि अवकाशयानाच्या सर्व बाबी यात शिकवण्यात येतात. हे इंजिनिअरींग केल्यानंतर एरोस्पेस कंपन्यांमध्ये गलेलठ्ठ पगाराची नोकरी मिळू शकते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.