मराठी बातम्या /बातम्या /करिअर /Engineers Jobs: पाटबंधारे विभाग धुळे इथे इंजिनिअर्ससाठी नोकरीची सुवर्णसंधी; या पत्त्यावर लगेच करा अप्लाय

Engineers Jobs: पाटबंधारे विभाग धुळे इथे इंजिनिअर्ससाठी नोकरीची सुवर्णसंधी; या पत्त्यावर लगेच करा अप्लाय

पाटबंधारे विभाग धुळे भरती

पाटबंधारे विभाग धुळे भरती

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 डिसेंबर 2021 असणार आहे.

धुळे , 01 डिसेंबर: पाटबंधारे विभाग धुळे (Dhule Irrigation Department) इथे लवकरच इंजिनिअर्सच्या (Engineers jobs in Irrigation Department ) काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Dhule Patbandhare Vibhag Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. कनिष्ठ अभियंता / शाखा अभियंता / सहाय्यक अभियंता वर्ग 2 (स्थापत्य) या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 डिसेंबर 2021 असणार आहे.

या जागांसाठी भरती

कनिष्ठ अभियंता / शाखा अभियंता / सहाय्यक अभियंता वर्ग 2 (r. Engineer / Branch engineer / Assistant Engineer Class 2 (Civil)) - एकूण जागा 14

शैक्षणिक पात्रता

कनिष्ठ अभियंता / शाखा अभियंता / सहाय्यक अभियंता वर्ग 2 (Jr. Engineer / Branch engineer / Assistant Engineer Class 2 (Civil)) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी सिव्हिल इंजिनिअरिंगमधील पदवी पूर्ण केली असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

सेवानिवृत्त उपविभागीय अभियंता किंवा उपविभागीय अधिकारी म्हणून निवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांनाही या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे.

उमेदवारांना किमान तीन वर्षांचा अनुभव असणं आव्श्त्याक आहे.

तसंच उमेदवारांनी पात्रतेचे सर्व निकष पूर्ण केले असणं आवश्यक आहे.

TISS Recruitment: टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस मुंबईत देणार Jobs

काही महत्त्वाच्या सूचना

करार पध्दतीने नियुक्ती देण्यात आल्यामुळे संबंधितास शासनाच्या कोणत्याही विभागात/संवर्गात सेवा समावेशनाचे /सामावून घेण्याचे वा नियमित सेवेचे इतर कोणतेही लाभ मिळण्याचा अधिकार/हक्क नसेल.

सदर नेमणूक जास्तीत जास्त अकरा महिन्यासाठीच राहील. त्यापेक्षा जास्त कालावधी वाढविण्याची आवश्यकता भासल्यास संबंधीतांचे कामकाज व आवश्यकता पाहून नियुक्‍ती अधिकारी तसा निर्णय घेऊ शकतात.

करारपध्दतीवर नियुक्ती करण्यात येणा-या (व्यक्‍ती) अधिकारी त्यांच्या वयाच्या ६५ व्या वर्षापर्यंतच कार्यरत राहु शकतील.

अर्ज करणा-या सेवानिवृत्त अधिकारी / कर्मचारी यांनी त्यांची शारीरीक, मानसिक वा आरोग्याच्या दृष्टीने सक्षम असल्याबाबत जिल्हा शल्यचिकीत्सक अधिका-याचे मुळ प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील.

करार पध्दतीने नियुक्‍त झालेल्या अर्जदारास नेमूणक दिलेली कामे पूर्ण करण्याची जबाबदारी संबधीत व्यक्‍तीची राहील व तसे बंधपत्र / हमीपत्र अटी व शर्ती संबधीत उमेदवाराला मान्य आहेत या बाबत बंधपत्र उमेदवारास रु.100/-च्या स्टॅम्पपेपरवर देणे बंधनकारक राहील.

अर्ज करणा-या सेवानिवृत्त अधिकारी / कर्मचा-या विरुध्द कोणत्याही प्रकारची विभागीय चौकशी व न्यायालयीन प्रकरण नसावे याबाबत अर्जदारांनी ज्या कार्यालयातुन सेवानिवृत्त झाले आहे, त्यासंबंधीत कार्यालयाकडुन तसे प्रमाणपत्र प्राप्त करुन सादर करणे बंधनकारक आहे.

नियुक्ती प्राधिकारी यांना विशेष परिस्थितीत कोणत्याही वेळी करार पध्दतीवरील सेवा समाप्त करण्याचे च अधिकार राहतील. ाहताल. त्याबाबतची कोणतीही ॥ही तक्रार ग्राहय धरली ली जाणार नाही.

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

MH Government Jobs: राज्याच्या पाणीपुरवठा विभागात 'या' पदांसाठी Jobs

अर्ज करण्यासाठीचा पत्ता

अधीक्षक अभियंता, धुळे पयबंधारे प्रकल्प मंडळ, सिंचन भवन, साकी रोड, धुळे

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 08 डिसेंबर 2021

JOB TITLEDhule Patbandhare Vibhag Recruitment 2021
या जागांसाठी भरतीकनिष्ठ अभियंता / शाखा अभियंता / सहाय्यक अभियंता वर्ग 2 (r. Engineer / Branch engineer / Assistant Engineer Class 2 (Civil)) - एकूण जागा 14
शैक्षणिक पात्रताया पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी सिव्हिल इंजिनिअरिंगमधील पदवी पूर्ण केली असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. सेवानिवृत्त उपविभागीय अभियंता किंवा उपविभागीय अधिकारी म्हणून निवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांनाही या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. उमेदवारांना किमान तीन वर्षांचा अनुभव असणं आव्श्त्याक आहे. तसंच उमेदवारांनी पात्रतेचे सर्व निकष पूर्ण केले असणं आवश्यक आहे.
ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
अर्ज करण्यासाठीचा पत्ताअधीक्षक अभियंता, धुळे पयबंधारे प्रकल्प मंडळ, सिंचन भवन, साकी रोड, धुळे

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://wrd.maharashtra.gov.in/या लिंकवर क्लिक करा

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

First published:
top videos

    Tags: Dhule, जॉब