Home /News /career /

WFH दरम्यान शॉर्ट्स घालून करा Meeting पण स्क्रीनवर दिसेल प्रोफेशनल Look; आली भन्नाट App

WFH दरम्यान शॉर्ट्स घालून करा Meeting पण स्क्रीनवर दिसेल प्रोफेशनल Look; आली भन्नाट App

स्क्रीनवर दिसेल प्रोफेशनल लुक

स्क्रीनवर दिसेल प्रोफेशनल लुक

तुम्ही घरात कुठल्याही कपड्यात असलात तरीही या अ‍ॅपमधून कॉल अटेंड केलात तर तुम्ही समोरच्याला प्रोफेशनल अटायरमध्ये दिसाल.

  मुंबई, 11 मे:   वर्क फ्रॉम होम (Work From Home) करणाऱ्यांसाठी रोज आवरून घरातच बसून मीटिंग अटेंड करणं त्रासाचं असतं. अनेकजण या त्रासाला कंटाळून ऑफिसला जाणंच पसंत करतात. अशांसाठी आता एक नवीन (Smart Phone App) अ‍ॅप मार्केटमध्ये आलं आहे. यात तुम्हाला हव्या तशा कपड्यांमध्ये तुम्ही मीटिंगसाठी बसलेले समोरच्याला दिसू शकाल. अगदी बरोब्बर वाचलंत तुम्ही. तुम्ही घरात कुठल्याही कपड्यात असलात तरीही या अ‍ॅपमधून कॉल अटेंड केलात तर तुम्ही समोरच्याला प्रोफेशनल अटायरमध्ये दिसाल. घरातून काम करण्याचा फायदा म्हणून तुम्ही झोपेतून उठून कामाला बसू शकता, पण लगेचच एखादी मीटिंग असेल, तर व्यवस्थित आवरल्याशिवाय लॅपटॉपसमोर बसणं शक्य नसतं. तासाभराच्या मीटिंगसाठी संपूर्ण टापटिप पोषाखात तयार होणं ज्यांना आवडत नाही, त्यांच्यासाठी एका जपानी कंपनीनं एक खास अ‍ॅप तयार केलं आहे. यामध्ये तुमचे घरातील कपडे सूटमध्ये बदलले जातील किंवा अगदी बेडवर बसूनही तुम्ही स्वतःला डिजिटल पद्धतीने पूर्ण कॉर्पोरेट लूक देऊ शकता. टोकियोमधील एका स्टार्टअप कंपनीनं EmbodyMe हे अ‍ॅप तयार केलं आहे. या अ‍ॅपचं बीटा व्हर्जन 2020 मध्येच लाँच झालं होतं, लवकरच हे अ‍ॅप मार्केटमध्ये येईल. हजारो विद्यार्थ्यांना मोठा फटका? व्हाईटहॅट जूनिअरच्या तब्बल 800 कर्मचाऱ्यांचा राजीनामा; हे आहे कारण घरातल्या कपड्यांमध्ये एकदम प्रोफेशनल लूक हे अ‍ॅप डाउनलोड केल्यानंतर त्यात स्वतःचा एक प्रोफेशनल लूकमधला (Professional Look) फोटो अपलोड करायचा. त्यानंतर अ‍ॅपची आर्टिफिशिअल इंटेलिजन्स टेक्नॉलॉजी त्या फोटोवरून तुमची एक पॉलिश्ड इमेज तयार करेल. त्यात तुम्हाला प्रोफेशनल लूकचे काही पर्याय दिले जातील. त्यातील तुम्हाला आवडणारा लूक तुम्ही निवडू शकता. यामुळे तुम्ही घरी कोणत्याही कपड्यांमध्ये असला, तरी बॉसला किंवा मीटिंगमध्ये बसलेल्यांना हव्या त्या प्रोफेशनल लूकमध्ये दिसू शकता. हे अ‍ॅप तुमच्या चेहऱ्यावरचे 50 हजार वेगवेगळे पॉइंट्स शोधतं. त्यामुळे तुमच्या आहे तशा चेहऱ्याच्या जवळ जाणारा लूक तयार होतो. हे अ‍ॅप झूम, ट्विच आणि यूट्यूबवरही काम करेल. तुमचे WhatsApp Chat तुमच्या नकळत वाचले जातात? लगेच बंद करा ही सेटिंग
  तंत्रज्ञानाची कमाल अशक्य वाटणाऱ्या अनेक गोष्टी सध्या तंत्रज्ञानाच्या विकासामुळे शक्य वाटू लागल्या आहेत. काही दिवसांपूर्वी एखाद्या व्हिडिओ किंवा फोटोतील उभ्या असलेल्या लोकांना स्क्रीनवरून गायब करण्याची कमाल आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या माध्यामातून (Artificial Intelligence ) करण्यात आली होती. नॉर्थइन्सर्न युनिव्हर्सिटी एमआयटीने, आयबीएमसोबत अशी एक शीट तयार केली होती, ज्याद्वारे फोटो किंवा व्हिडिओत उभ्या असलेल्या लोकांना अदृश्य करता आलं. या अ‍ॅपमध्येही आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा वापर केला आहे. या अ‍ॅपमध्ये एक्स्प्रेशन कॅमेराही आहे. यामुळे यूजरच्या स्क्रीनवरील चित्र किंवा व्यक्तिरेखा ही दुसरीकडून पाहणाऱ्या व्यक्तीला खरी वाटू शकते. म्हणजे यूजरची इमेज (User Image) स्क्रीनवर आहे, आणि ती व्यक्ती तिथं नाही अशी जराशी शंकाही समोरच्या व्यक्तीला येणार नाही.
  आता घरी बसून मीटिंग अटेंड करणं किंवा बॉससोबत चर्चा करणं तापदायक वाटणार नाही. तुम्हाला हव्या त्या लूकमध्ये मीटिंग अटेंड करण्याची सोय या अ‍ॅपमध्ये देण्यात आली आहे.
  First published:

  Tags: Career, Technology

  पुढील बातम्या