मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

हजारो विद्यार्थ्यांना मोठा फटका? व्हाईटहॅट जूनिअरच्या तब्बल 800 कर्मचाऱ्यांचा राजीनामा; हे आहे कारण

हजारो विद्यार्थ्यांना मोठा फटका? व्हाईटहॅट जूनिअरच्या तब्बल 800 कर्मचाऱ्यांचा राजीनामा; हे आहे कारण

WhiteHat Jr Classes मोठं नुकसान झालं आहे.

WhiteHat Jr Classes मोठं नुकसान झालं आहे.

कंपनीनं वर्क फ्रॉम होम अचानक बंद करून ऑफिसमध्ये बोलवल्यामुळे या कंपनीच्या तब्बल 800 कर्मचाऱ्यांनी (800 employees resigns from WhiteHat Junior) गेल्या दोन महिन्यांमध्ये राजीनामे दिले आहेत

  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 11 मे: गेल्या दोन वर्षांपासून कोरोनानं संपूर्ण जगभरात हाहाकार माजवला आहे. अनेकांनी यामुळे आपले प्राण गमावले आहेत. भारतातही तिसरी लाट येऊन गेली आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून राज्यातही कोरोना पूर्णपणे नाहीसा झाला आहे असं चित्रं आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील कोरोनचे सर्व निर्बंध हटवण्यात आले आहेत. गेल्या काही महिन्यांमध्ये काही शाळा आणि कॉलेजेसही ऑफलाईन  पद्धतीनं सुरु झाले आहेत. तसंच वर्क फ्रॉम होम सुरू असलेल्या कर्मचाऱ्यांना सुद्धा ऑफिसमध्ये (work From Office) बोलावण्यात येत आहे. हळहळू भारतातील सर्व कंपन्या कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये बोलवत आहेत. मात्र याचमुळे भारतातील एका नामांकित कंपनीचं (WhiteHat Jr Classes) मोठं नुकसान झालं आहे.

व्हाईटहॅट ज्युनियर (WhiteHat Junior) या कंपनीचं नाव तुम्ही ऐकलंच असेल. हल्ली लहान मुलांना कोडिंग शिकण्यासाठी एक व्यासपीठ जे BYJU’S ने विकत घेतले होते, त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना एका महिन्याच्या आत ऑफिसमध्ये परत येण्यास सांगितले. घरून काम संपवण्याचे धोरण 18 मार्च रोजी कंपनीने ईमेद्वारे जाहीर केलं होतं. ज्यात Work फ्रॉम होम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना 18 एप्रिलपर्यंत कार्यालयात परत येण्यास सांगितलं होतं. मात्र हेच कारण ठरलं वादाचं.

विद्यार्थ्यांनो, Engineering च्या 'या' स्ट्रीम्सबद्दल ऐकलंय का? करिअर होईल उत्तम

कंपनीनं वर्क फ्रॉम होम अचानक बंद करून ऑफिसमध्ये बोलवल्यामुळे या कंपनीच्या तब्बल 800 कर्मचाऱ्यांनी (800 employees resigns from WhiteHat Junior) गेल्या दोन महिन्यांमध्ये राजीनामे दिले आहेत. सेल्स, कोडिंग आणि मॅथ टीमच्या पूर्णवेळ कर्मचाऱ्यांकडून राजीनामे आले आहेत. येत्या काही महिन्यांत आणखी कर्मचारी त्यांचे राजीनामे देतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

काय आहे कर्मचाऱ्यांचं म्हणणं

राजीनामा दिलेल्या कर्मचार्‍यांपैकी एका कर्मचार्‍याने Inc42 ला सांगितले की एका महिन्याचा कालावधी स्थान बदलण्यासाठी पुरेसा नाही. “काहींना मुले आहेत, काहींना वृद्ध आणि आजारी पालक आहेत, तर इतरांवर इतर जबाबदाऱ्या आहेत. इतक्या कमी कालावधीत कर्मचाऱ्यांना परत बोलावणे योग्य नाही,” असे व्हाईटहॅट ज्युनियरचे माजी कर्मचारी म्हणाले.

सावधान! सतत नोकरी बदलणं तुमच्या करिअरसाठी ठरू शकतं धोकादायक; 'हे' होईल नुकसान

कंपनी म्हणते....

"आमच्या बॅक-टू-वर्क ड्राईव्हचा एक भाग म्हणून, आमच्या बहुतेक सेल्स आणि सपोर्ट कर्मचार्‍यांना 18 एप्रिलपासून गुडगाव आणि मुंबई कार्यालयात रिपोर्ट करण्यास सांगितले गेले आहे. आम्ही वैद्यकीय आणि वैयक्तिक गरजांसाठी अपवाद असल्यास रिलोकेशन दिले आहे." व्हाईटहॅट जूनियरनं म्हंटलं आहे.

First published:

Tags: Career, Career opportunities, Job, Resignation