Home /News /career /

GATE स्कोर एक फायदे एक से एक; सरकारी नोकरीपासून परदेशात शिक्षणापर्यंत 'या' मिळतील संधी

GATE स्कोर एक फायदे एक से एक; सरकारी नोकरीपासून परदेशात शिक्षणापर्यंत 'या' मिळतील संधी

GATE स्कोर एक फायदे एक से एक

GATE स्कोर एक फायदे एक से एक

तुमचा GATE स्कोर हा तुम्हाला अनेक करण्याची संधी उपलब्ध करून देणारा आहे. आज आम्ही तुम्हाला GATE परीक्षा दिल्यानंतरच्या काही करिअर ऑप्शन्सबद्दल (Career After GATE) सांगणार आहोत.

  मुंबई, 02 ऑगस्ट: इंजिनिअरिंग करणारे बहुतांश विद्यार्थी ही डिग्री पूर्ण झाल्यानंतर GATE परीक्षा देतात. GATE परीक्षा पास केल्यानंतर अनेक ठिकाणी नोकरीच्या  आणि शिक्षणाच्या संधी उपल्बध होऊ शकतात. जर तुम्हीही GATE परीक्षा दिली असेल आणि तुम्हाला या बातमीच्या माध्मयातून सर्व माहिती मिळू शकणार आहे. तुमचा GATE स्कोर हा तुम्हाला अनेक करण्याची संधी उपलब्ध करून देणारा आहे. आज आम्ही तुम्हाला GATE परीक्षा दिल्यानंतरच्या काही करिअर ऑप्शन्सबद्दल (Career After GATE) सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया. प्रोफेसर होण्याची संधी GATE स्कोअरनंतर देशातीलच नव्हे तर परदेशातील अनेक अभियांत्रिकी महाविद्यालये आणि डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षणाच्या तत्काळ नियुक्त्यांसाठी उमेदवारी केली जाते. परदेशी विद्यापीठांमध्ये GATE च्या आधारे थेट भरती करता येते, तर भारतात तुम्हाला शिकवताना UGC NET परीक्षा उत्तीर्ण होण्याचीही सुविधा दिली जाते. ही नियुक्ती GATE नंतर काही वर्षांसाठी असली तरी, UGC-NET परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर ही नियुक्ती कायम असू शकते. IIT मध्ये प्रवेश हवाय? मग JEE देण्याची आवश्यकता नाही; 'या' कोर्समध्ये थेट प्रवेश
  संशोधन संस्थांमध्ये प्रवेश
  भारतामध्ये अनेक संशोधन संस्था आहेत, जसे की कौन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च, न्यूरोसायन्स रिसर्च इन्स्टिट्यूट आणि अॅग्रिकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूट इत्यादी आकर्षक शिष्यवृत्तीवर संशोधन करण्याची संधी देतात. परदेशात अभ्यासाची संधी बी.टेक नंतर पुढील शिक्षणासाठी शिष्यवृत्तीवर परदेशात जायचे असेल तर गेट स्कोअर उपयुक्त ठरेल. अनेक परदेशी विद्यापीठे गेट स्कोअरच्या आधारे कोर्सला प्रवेश देतात, आकर्षक शिष्यवृत्ती देतात. यामध्ये सिंगापूर आणि जर्मनीमधील अनेक विद्यापीठांचा समावेश आहे. सरकारी नोकरीची संधी तुम्ही बीएसएनएल, पॉवर ग्रीड आणि इलेक्ट्रिसिटी बोर्ड, ओएनजीसी, कोल इंडिया लिमिटेड, गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया, स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया, बिल्डिंग कन्स्ट्रक्शन यांसारख्या भारत सरकार आणि राज्य सरकारांच्या अंतर्गत कार्यरत विविध सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम (पीएसयू) शोधत असल्यास. कॉर्पोरेशन, फूड सप्लाय जर तुम्हाला कॉर्पोरेशनमध्ये थेट नियुक्ती हवी असेल, तर तुम्ही तुमचा GATE स्कोअर घेऊन या संस्थांमध्ये नोकरीसाठी अर्ज करू शकता. IBPS Recruitment 2022: ग्रॅज्युएट उमेदवारांच्या तब्बल 6432 जागांसाठी मोठी भरती
  परदेशी कंपन्यांमध्ये नोकरी
  गुगल, सिस्को, सीमेन सारख्या विविध विदेशी कंपन्या आणि महिंद्रा, मारुती, टाटा इत्यादी देशी कंपन्या GATE उत्तीर्ण विद्यार्थ्यांची भरती करतात. या कंपन्यांमध्ये अशा अर्जदारांना थेट मुलाखतीसाठी बोलावले जाते.
  Published by:Atharva Mahankal
  First published:

  Tags: Career, Career opportunities, Entrance Exams, Exam Fever 2022, Job, Job alert

  पुढील बातम्या