मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

TCS Online Course: तरुण प्रोफेशनल्सना Job Ready बनवण्यासाठी TCS चा Free Online Course; असं करा रजिस्टर

TCS Online Course: तरुण प्रोफेशनल्सना Job Ready बनवण्यासाठी TCS चा Free Online Course; असं करा रजिस्टर

जाणून घेऊया याबद्दलच्या डिटेल्स

जाणून घेऊया याबद्दलच्या डिटेल्स

कोर्सला प्रवेश घेण्यासाठी कोणतीही अट घालण्यात आलेली नाही, अशी माहिती कंपनीच्या वेबसाइटवर दिली आहे.

मुंबई, 17 नोव्हेंबर:  कोणत्याही प्रकारची चांगली नोकरी मिळण्यासाठी पदवीधर असणं अत्यावश्यक असतं. मोठमोठ्या शिक्षणसंस्थांमध्ये अनेकांची कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये म्हणजेच प्रत्यक्ष पदवी हातात पडण्याआधीच एखाद्या कंपनीत नोकरीसाठी निवड होते. नोकरीसाठी शैक्षणिक पात्रता अत्यावश्यक असली, तरी केवळ तेवढंच पुरेसं होत नाही. त्यासाठीची काही कौशल्यंही असणं आवश्यक असतं. म्हणूनच फ्रेशर्सना पटकन नोकरी मिळत नाही किंवा मिळालीच तर पगार तुलनेने कमी असू शकतो. नोकरीसाठी आवश्यक असलेल्या कौशल्यांचं प्रशिक्षण फ्रेशर्सना देण्यासाठी आता टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (Tata Consultancy Services - TCS) कंपनीने पुढाकार घेतला आहे. त्या कंपनीने 15 दिवसांचा मोफत ऑनलाइन कोर्स (TCS online course) सुरू केला आहे. नुकतंच शिक्षण पूर्ण झालेले फ्रेशर्स, पदवीचं शिक्षण घेणारे विद्यार्थी, पदव्युत्तर शिक्षण घेणारे विद्यार्थी आदींना एम्प्लॉयाबिलिटी स्किल्स (Employability Skills) अर्थात नोकरीसाठी आवश्यक असलेली कौशल्यं विकसित करण्यासाठी हा कोर्स डिझाइन करण्यात आला आहे. त्या कोर्सला प्रवेश घेण्यासाठी कोणतीही अट घालण्यात आलेली नाही, अशी माहिती कंपनीच्या वेबसाइटवर दिली आहे.

कम्युनिकेशन, कोलॅबोरेशन, बिझनेस एटिकेट्स, आर्थिक आणि डिजिटल साक्षरता अशी महत्त्वाची कौशल्यं या कोर्समधून उमेदवारांना विकसित करता येतील. 'करिअर एज यंग प्रोफेशनल' (Career Edge Young Professional Certificate Course) असं या कोर्सचं नाव आहे. iON या टीसीएसच्या बिझनेस युनिटकडून हा कोर्स सादर करण्यात आला आहे. इच्छुक उमेदवार tcsion.com या अधिकृत वेबसाइटवर जाऊन या कोर्ससाठी नोंदणी करू शकतात.

'भविष्यातली आव्हानं पेलण्यासाठी आजच्या तरुणांना महत्त्वाची एम्प्लॉयाबिलिटी स्किल्स अवगत व्हावीत, या दृष्टीने कोर्स डिझाइन करण्यात आला आहे,' असं टीसीएसकडून सांगण्यात आलं आहे.

दोन आठवड्यांच्या या कोर्समध्ये विद्यार्थ्यांनी प्रत्येक आठवड्यात किमान सात ते 10 तासांच्या कोर्सवर्कला उपस्थित राहणं आवश्यक आहे. कोर्समधलं प्रत्येक मोड्युल एक ते दोन तासांच्या कालावधीत पूर्ण करता येऊ शकतं.

10th exam 2022: 10वीच्या परीक्षांसाठी 18 नोव्हेंबरपासून स्वीकारले जाणार अर्ज

ऑफिशियल वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, या कोर्समधून उमेदवार खालील गोष्टी शिकू शकतील.

- कामाच्या ठिकाणी सौहार्दपूर्ण वातावरण तयार होण्यासाठी आवश्यक असलेली वर्तनविषयक कौशल्यं

- प्रभावी सादरीकरण (Presentation) आणि संवाद कौशल्यं.

- स्ट्राँग प्रोफाइल व्हिजिबिलिटी (Strong Profile Visibility) देणारे प्रभावी रिझ्युम (Resume) कसे तयार करायचे?

- कॉर्पोरेट विश्वातले बिझनेस एटिकेट्स (Business Etiquettes)

- अकाउंटिंग आणि माहिती तंत्रज्ञानातल्या मूलभूत गोष्टी

- आर्टिफिशियल इंटेलिजन्सची (Artificial Intelligence) संकल्पना

या मोड्युल्समध्ये व्हिडिओ, प्रेझेंटेशन्स, रीडिंग मटेरियल आणि टीसीएसमधल्या तज्ज्ञांचे रेकॉर्डेड वेबिनार्स असतील. त्याशिवाय प्रशिक्षणार्थींना मॉडरेटेड डिजिटल डिस्कशन रूमचा अॅक्सेस मिळेल. त्यात ते प्रश्न, शंका विचारू शकतात आणि आपल्या सूचना सांगू शकतात.

गेन गायडन्स फ्रॉम करिअर गुरूज, गेन फाउंडेशनल स्किल्स इन आयटी, इंडरस्टँड अकाउंटिंग फंडामेंटल्स, अंडरस्टँड आर्टिफिशियल इंटेलिजन्स (पार्ट 1 आणि 2) या मोड्युल्सचा अपवाद वगळता प्रत्येक मोड्युलच्या अखेरीला ऑनलाइन असेसमेंट केली जाईल. तसंच कोर्सच्या अखेरीलाही एक असेसमेंट केली जाईल आणि ती पूर्ण करावीच लागेल. कोर्स आणि असेसमेंट (Assessment) यशस्वीरीत्या पूर्ण केल्यास टीसीएस या दिग्गज आयटी कंपनीकडून कोर्सचं सर्टिफिकेटही दिलं जाणार आहे. त्याचा करिअरमध्ये अर्थातच चांगला उपयोग होईल, हे वेगळं सांगायला नकोच.

First published:

Tags: Career opportunities, जॉब