मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

तुमच्या स्वप्नातील Job! अवघे 14 दिवस करा काम आणि मिळवा तब्बल 9 लाख रुपये पगार; कसा ते वाचा

तुमच्या स्वप्नातील Job! अवघे 14 दिवस करा काम आणि मिळवा तब्बल 9 लाख रुपये पगार; कसा ते वाचा

हे वाचून तुम्हाला जरा धक्का बसला असेल; पण हे खरं आहे.

हे वाचून तुम्हाला जरा धक्का बसला असेल; पण हे खरं आहे.

हे वाचून तुम्हाला जरा धक्का बसला असेल; पण हे खरं आहे.

श्रीमंतांच्या घरी आई-वडिलांकडे वेळ नसल्याने मुलांचा सांभाळ करण्यासाठी ‘आया’ (Nanny) ठेवल्या जातात. या ‘आया’ मुलांची देखभाल करतात. त्यांना लागेल ते देतात. त्यांच्या गरजा पुरवतात. अशीच एक ‘आया’ (Nanny) ब्रिटनमधल्या एका उच्चभ्रू कुटुंबाला हवी आहे. या संदर्भात त्यांनी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. आपल्या मुलांचा सांभाळ करण्यासाठी हे कुटुंब ‘आया’ला भरभक्कम पगारही देणार आहे. हा पगार (Salary) काही थोडाथोडका नसून, दिवसाला 59 हजार रुपये एवढा आहे. हे वाचून तुम्हाला जरा धक्का बसला असेल; पण हे खरं आहे.

ब्रिटनमधल्या (United Kingdom) एडिनबर्ग (Edinburgh) शहरामधल्या एका कुटुंबाला जुळी मुलं आहेत. या जुळ्या (Twins) मुलांचा सांभाळ करण्यासाठी त्यांना एक ‘आया’ हवी आहे. ही मुलं 5 वर्षांची आहेत. ही नोकरी फक्त 14 दिवसांसाठी म्हणजेच 22 डिसेंबर 2021 ते 5 जानेवारी 2022 या कालावधीसाठी असणार आहे. ख्रिसमस असल्याने त्यांना ‘आया’ची गरज भासली आहे. या कामासाठी हे कुटुंब ‘आया’ला दर दिवशी तब्बल 600 युरो म्हणजेच 59 हजार रुपये पगार द्यायला तयार आहे. एकूण 14 दिवसांच्या नोकरीनंतर मुलांचा सांभाळ करणाऱ्या व्यक्तीला तब्बल 9 लाख रुपये (Job opportunity to earn 9 lakh in mere 14 days job) मिळणार आहेत. याबाबतचं वृत्त `टीव्ही 9 हिंदी`ने दिलं आहे.

Career in Numerology: न्यूमरोलॉजीमध्ये घडवा तुमचं करिअर; वाचा संपूर्ण माहिती

या नोकरीत एक गोष्ट स्पष्ट आहे, की येथे फक्त अशाच व्यक्तीची निवड केली जाणार आहे, जी व्यक्ती मुलांची चांगल्या प्रकारे काळजी घेऊ शकेल. या व्यक्तीला 14 दिवस मुलांना हवं-नको ते पाहावं लागेल आणि त्यांच्याकडे लक्ष द्यावं लागेल. विशेष म्हणजे, ख्रिसमसच्या (Christmas) दिवशीदेखील तिला नोकरीवरच थांबावं लागेल. तसंच त्यांना कायम आनंदी ठेवावं लागेल. तसंच 14 दिवसांमध्ये ‘आया’चा सर्व खर्च कुटुंबच करील.

कोरोनाच्या संकटात अनेकांच्या नोकऱ्या (Job) गेल्या. व्यवसाय बंद पडले आहेत. अचानक हातचं काम गेल्यामुळे मोठी आर्थिक अडचण ओढवली आहे. कित्येकांवर उपासमारीची वेळ आली आहे. प्रत्येक जण नोकरीच्या शोधात आहे. काही जण आहे ती नोकरी टिकवण्यासाठी धडपडत आहेत. अशात ही नोकरी करून 14 दिवसांमध्ये 9 लाख रुपये कमावण्याची संधी तिथल्या इच्छुकांना चालून आली आहे. एवढ्या पैशांमध्ये एखाद्या व्यक्तीचं आयुष्य सहज सुखकर होईल. फक्त इतकच आहे की त्यासाठी त्या इच्छुक व्य्तीला मुलांचा योग्य प्रकारे सांभाळ करावा लागेल.

First published: