पाटना, 22 जानेवारी : Inspirational Story: टोक्यो ओलंपिकमध्ये कुस्तीमध्ये कांस्य पदक जिंकणारे कुस्तीपटू बजरंग पूनिया यांनी आपल्या ऑफिशियल ट्विटर अकाउंटवर एक IPS अधिकाऱ्यांचा फोटो शेअर केला आहे. याशिवाय त्यांनी IPS अधिकाऱ्याचं कौतुक केलं आहे. या IPS अधिकाऱ्याचं नाव संतोष मिश्रा आहे. बजरंग पूनियाने फोटो शेअर करीत लिहिलं आहे की, यांना देशसेवेसाठी 50 लाखांची परदेशातील नोकरी सोडली.
बजरंग पूनिया यांनी आपल्या पोस्टसह दोन फोटोही शेअर केले आहेत. ज्यात IPS अधिकारी एका सरकारी शाळेच्या मुलांना शिकवताना दिसत आहे. बजरंग पूनियाच्या पोस्टनुसार, IPS संतोष मिश्रा आपल्या कामानंतर उरलेला वेळ गरीब, निराधार आणि आर्थिक अडचणीचा सामना करणाऱ्या मुलांना शिक्षण देतात. त्यांनी अमेरिकेच्या न्युयॉर्क शहरातील 50 लाखांचा पगार देणारी नोकरी सोडली आणि देशात परतले.
कोण आहेत IPS संतोष मिश्रा..
संतोष मिश्रा सध्या उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यात SP पदावर कार्यरत आहेत. ते ट्विटर खूप प्रसिद्ध आहेत. बिहारमध्ये राहणारे संतोष मिश्रा 2012 बॅचचे IPS अधिकारी आहेत. 2011 मध्ये त्यांनी US मधील सॉफ्टवेयर इंजीनियरची नोकरी सोडली होती. त्यावेळी अमेरिकेत त्यांची सॅलरी 50 लाख रुपये होती. यानंतर त्यांनी सिविल सर्विसची तयारी केली आणि पहिल्याच प्रयत्न देशातील सर्वात मोठी परीक्षा पास करीत IPS अधिकारी झाले.
rispect 🙏🏽❤️ @IPS_SantoshM pic.twitter.com/mKZWaKbSS1
— Bajrang Punia 🇮🇳 (@BajrangPunia) January 20, 2022
IPS संतोष मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते पाटना जिल्ह्यातील निवृत्त आर्मी मॅनचे पूत्र आहेत. 10वी आणि 12वीपर्यंतचं शिक्षण बिहारच्या शाळेत पुर्ण केल्यानंतर त्यांनी पुणे विद्यापीठातून मेकॅनिकल इंजीनियरिंगमध्ये डिग्री मिळवली. यानंतर त्यांचं युरोपमधील कंपनीत सिलेक्शन झालं. 4 वर्षे युरोपमध्ये नोकरी केल्यानंतर ते अमेरिकेत गेले. येथे सात वर्षांपर्यंत नोकरी केल्यानंतर ते भारतात परतले. त्यांना देशसेवा करावयाची होती. यासाठी तेथील 50 लाखांची नोकरी (वार्षिक पॅकेज) सोडून ते भारतात परतले. रिकाम्या वेळेत संतोष मिश्रा सरकारी शाळेतील मुलांना शिकवतात. एकदा ते एका सरकारी शाळेत शिकवत असताना मुलांनी जिलेबी खाण्याची इच्छा व्यक्त केली. यानंतर त्यांनी मुलांना जिलेबी मागवली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ias officer, Pune, Upsc exam