नवी दिल्ली, 20 जानेवारी - कोरोना व्हायरसच्या तिसऱ्या लाटेदरम्यान देशातल्या होतकरू आणि नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी सुवर्णसंधी चालून आली आहे. भारतीय रेल्वेच्या (Indian Railway) दक्षिण पूर्व मध्य रेल्वे (SECR) अंतर्गत (Indian Railway Recruitment 2022) क श्रेणी (ग्रुप सी) च्या विविध पदांवर भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. जे Indian Railway Recruitment 2022 साठी अर्ज करू इच्छितात, त्या इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी रेल्वेच्या secr.indianrailways.gov.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करावा. या पदांसाठी आजपासून इंटरव्ह्यू सुरू झाले आहेत. त्याशिवाय उमेदवार थेट https://secr.indianrailways.gov.in/ या वेबसाइटवर क्लिक करून पदांसाठी (Indian Railway Recruitment 2022) अर्ज करू शकतात. तसेच या लिंकच्या माध्यमातून अधिसूचना पाहू शकणार आहात. या भरतीप्रक्रियेंतर्गत एकूण 75 पदे भरली जाणार आहेत. विविध पदांच्या इंटरव्ह्यूसाठी तारखा १ स्टाफ नर्सः 20, 21, जानेवारी 2022 २ फार्मासिस्ट, एक्स-रे टेक्निशियन आणि ड्रेसर : 22 जनवरी, 2022
वाचा- नोकरी बदलण्यात पुरुषांपेक्षा आघाडीवर आहेत महिला, कारणही आहे महत्त्वाचं
३ लॅब सुपरिंटेंडंट, लॅब असिस्टंट, डेंटल हाइजीनिस्ट, फिजियोथेरेपिस्ट, ऑडियो-कम-स्पीच थेरेपिस्ट, रिफ्रैक्शनिस्ट : 24 जनवरी, 25, 2022 भरती प्रक्रियेत पदांची संख्या स्टाफ नर्स : 49 पदे फार्मासिस्ट : 4 पदे ड्रेसर : 6 पदे एक्स-रे टेक्निशियन : 3 पदे डेंटल हाइजिनिस्ट : 1 पद लॅब अधीक्षक : 2 पदे
वाचा राजर्षी शाहू महाराज परदेशी शिक्षण शिष्यवृत्तीच्या नियमात मोठा बदल; विद्यार्थ्यांना मिळणार फायदा
लॅब असिस्टंट : 7 पदे फिजियोथेरेपिस्ट : 1 पद ऑडिओ-कम-स्पीच थेरेपिस्ट : 1 पद अपवर्तक : 1 पद भरती प्रक्रियेची पात्रता आणि निकष अधिकृत अधिसूचनेत देण्यात आलेल्या माहितीनुसार उमेदवारांकडे पात्रता असणं आवश्यक आहे. उमेदवारांची निवड वॉक-इन इंटरव्ह्यूच्या आधारावर करण्यात येईल.