Home /News /career /

राजर्षी शाहू महाराज परदेशी शिक्षण शिष्यवृत्तीच्या नियमात मोठा बदल; विद्यार्थ्यांना मिळणार फायदा

राजर्षी शाहू महाराज परदेशी शिक्षण शिष्यवृत्तीच्या नियमात मोठा बदल; विद्यार्थ्यांना मिळणार फायदा

महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणाची संधी देणारी ही लोकप्रिय शिष्यवृत्ती आहे. 29 जानेवारी 2022 ही यासाठी apply करण्याची शेवटची तारीख आहे.

    मुंबई, 18 जानेवारी: परदेशी शिकायला जाण्याची इच्छा असलेले अनेक विद्यार्थी असतात. पण उच्च शिक्षणाचं (Study abroad scholarship) हे स्वप्न पुरेशा पैशाअभावी राहून जातं. शिष्यवृत्ती मिळाली तरी ती सर्वसमावेशक नसते. महाराष्ट्र सरकारतर्फे कमी आर्थिक उत्पन्न असलेल्या अनुसूचित जातीच्या कुटुंबातल्या विद्यार्थ्यांना राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती (Maharashtra government Rajarshi shahu Maharaj Scholarship) योजनेअंतर्गत मदत दिली जाते. या शिष्यवृत्ती योजनेच्या नियमांत विद्यार्थ्यांच्या फायद्याचे काही बदल नुकतेच करण्यात आले. इतके दिवस ही शिष्यवृत्ती मिळवलेल्या विद्यार्थ्यांना परदेशी जायचा विमानखर्च स्वतःच करावा लागायचा. आता त्यांना विमानभाडं अगोदरच मिळणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची सोय होणार आहे. यासंबंधीचा शासन निर्णय (GR regarding Rajrshi Shahu Scholarship) नुकताच जाहीर करण्यात आला. ज्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 6 लाखांपेक्षा कमी आहे अशाच शिष्यवृत्तीप्राप्त विद्यार्थ्यांना आगाऊ विमानभाड्याचा लाभ मिळणार आहे. अन्य शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना प्रवास खर्च पूर्वीप्रमाणेच आधीच्या नियमानुसार मिळेल. काय आहे अप्लाय करण्याची डेडलाइन? आर्थिकदृष्ट्या मागास कुटुंबातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाल्यानंतर सगळ्या शिक्षणाची सोय झाली, तरी विमानभाड्याचा खर्च जुळवता जुळवता नाकी नऊ येतात. याचा विचार करूनच शिष्यवृत्तीपात्र गरीब विद्यार्थ्यांसाठी शासनाने नियमात बदल केला आहे. Railtel Recruitment 2022: 'रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया'मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! परदेशी शिक्षणाची सोय करणारी राजर्षी शाहू महाराज परदेश शिष्यवृत्ती योजनेचा एक मोठा नियम बदलण्यात आला आहे. या शिष्यवृत्तीचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षणाचा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर, पदवी मिळवल्यानंतर  भारतात परत येणं बंधनकारक होतं. पण काही दिवसांपूर्वी विद्यार्थ्यांच्या VISA मध्ये मुदतवाढ देण्याची मुभा सरकारने दिली. त्यामुळे या शिष्यवृत्तीअंतर्गत उच्चशिक्षणासाठी परदेशी गेलेल्या विद्यार्थ्यांना परदेशातच नोकरी करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. Bank Exam Tips: आता एका Attempt मध्ये क्रॅक होईल बँक PO परीक्षा; वाचा टिप्स अनुसूचित जाती, नवबौद्ध समाजातील होतकरू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातल्या विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणाची संधी मिळाली तर सरकारतर्फे शिक्षण शुल्क आणि इतर खर्चाची मदत दिली जाते. यापूर्वी वार्षिक उत्पन्न 6 लाखापेक्षा कमी असलेल्या कुटुंबातल्या विद्यार्थ्यांचा या शिष्यवृत्तीसाठी विचार केला जात होता. आता ही मर्यादा 8 लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे. पदव्युत्तर पदवीचं शिक्षण घेण्यासाठी परदेशी जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्याची वयोमर्यादा आणि PhD साठी परदेशी जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे.
    First published:

    Tags: Maharashtra News, Scholarship

    पुढील बातम्या