• Home
 • »
 • News
 • »
 • career
 • »
 • टीईटी परीक्षेची तारीख तिसऱ्यांदा बदलली; नवी तारीख 21 नोव्हेंबर, उमेदवारांमध्ये नाराजी

टीईटी परीक्षेची तारीख तिसऱ्यांदा बदलली; नवी तारीख 21 नोव्हेंबर, उमेदवारांमध्ये नाराजी

ऑक्टोबर महिन्यात 10 तारखेला TET Eaxam घेतली जाणार होती. मात्र त्याच दिवशी UPSC परीक्षा आल्याने परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती.

 • Share this:
  मुंबई, 21 ऑक्टोबर : शिक्षक होण्यासाठी पात्रता परीक्षा (Maharashtra Teacher Eligibility Test) देण्यास उत्सुक असणाऱ्या उमेदवरांना तारीख पे तारीख मिळत आहे. कारण शिक्षकांच्या पात्रतेसाठी घेण्यात येणाऱ्या टीईटी परीक्षेची तारीख तिसऱ्यांदा बदलण्यात आली आहे. येत्या 30 ऑक्टोबर रोजी ही टीईटीची परीक्षा पार पडणार होती. मात्र आता उमेदारवारांना यासाठी आणखी महिनाभर वाट वाहावी लागणार आहे. या परीक्षेसाठी आता 21 नोव्हेंबर ही नवी तारीख (New Exam Date) जाहीर करण्यात आली आहे. नवीन सुधारीत वेळापत्रक संकेतस्थळावर जारी करण्यात आले आहे. परीक्षेची तारीख का बदलण्यात आली? महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने हे सुधारित वेळापत्रक जाहीर केले. राज्यात 30 ऑक्टोबर 2021 रोजी टीईटी TET म्हणजेच शिक्षक पात्रता परीक्षा (Teacher Eligibility Test) आयोजित करण्यात आली होती. मात्र, त्यादिवशी देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक आल्याने महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2021 च्या परीक्षेच्या तारखेत पुन्हा बदल करण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पियाडला पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षेशिवाय मिळणार IIT प्रवेश? ऑक्टोबर महिन्यात 10 तारखेला टीईटी परीक्षा घेतली जाणार होती. मात्र त्याच दिवशी केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा (UPSC Exam) आल्याने टीईटी परीक्षा 31 ऑक्टोबर रोजी घेण्याचे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने जाहीर केले होते. 30 ऑक्टोबरच्या दिवशी या आधीच पुढे ढकललेली आरोग्य विभागाची परीक्षा आल्याने 31 ऑक्टोबर ऐवजी टीईटी परीक्षा 30 ऑक्टोबर रोजी घेण्याचे सुधारित वेळापत्रक जारी करण्यात आले. मात्र या परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांनी सतत बदलणाऱ्या तारखांमुळे नाराजी व्यक्त केली आहे. ह Accenture Off Campus Drive: Accenture कंपनीत फ्रेशर्ससाठी नोकरी; लगेच करा अप्लाय TET परीक्षेसाठी बसणाऱ्या उमेदवारांची संख्या टीईटी परीक्षेला राज्यातून 3 लाख 30 हजार 642 उमेदवार बसणार आहेत. 5 हजार परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेण्याचं नियोजन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने केले आहे. राज्यभरात होणारी ही परीक्षा आता 21 नोव्हेंबर रोजी घेण्यात येणार आहे.
  Published by:Pravin Wakchoure
  First published: