मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

कम्प्युटर पदवी धारकांना का आली काँग्रेस मुख्यालयासमोर कोंबडा बनण्याची वेळ? नक्की घडलंय काय? वाचा

कम्प्युटर पदवी धारकांना का आली काँग्रेस मुख्यालयासमोर कोंबडा बनण्याची वेळ? नक्की घडलंय काय? वाचा

संगणक पदवी धारकांना नवी दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयासमोर कोंबडा बनण्याची वेळ आहे.

संगणक पदवी धारकांना नवी दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयासमोर कोंबडा बनण्याची वेळ आहे.

संगणक पदवी धारकांना नवी दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयासमोर कोंबडा बनण्याची वेळ आहे.

  • Published by:  Atharva Mahankal

नवी दिल्ली, 29 जून: सरकारी नोकरी (government Jobs) म्हंटलं की सर्वांचेच डोळे चकाकतात. प्रत्येकाला सरकारी नोकरी हवी असते. त्यात शिक्षक (Government teacher jobs) म्हणून सरकारी नोकरी मिळत असेल तर पर्वणीच.  मात्र राजस्थानमधील (Rajasthan) संगणक पदवी धारकांना (Computer Degree holders) नवी दिल्लीतील (New Delhi) काँग्रेस मुख्यालयासमोर (Congress Head Office) कोंबडा बनण्याची वेळ आली आहे.

राजस्थान सरकारने (Rajasthan Government) 2020-21 च्या अर्थसंकल्पात संगणक शिक्षक (Computer teachers) कॅडर तयार करण्याची घोषणा केली होती. त्यामुळे संगणक पदवी धारकांना आनंद झाला होता. सरकारी नोकरी मिळणार म्हणून अनेकजण यासाठी तयारीला लागले होते. मात्र आता राजस्थान सरकारनं यावर घुमजाव केलं आहे. संगणक शिक्षक या  नियमित (Permanent)  पदासाठी आधी अर्ज मागवण्यात येणार होते. मात्र सरकारच्या नवीन घोषणेनुसार ही पदं कॉन्ट्रॅक्टवर (Contract) असणार आहे. यामुळे संगणक पदवी धारकांमध्ये नाराजीचं वातावरण आहे.

हे वाचा - ज्या शहरात लिंबू पाणी विकलं तिथेच 10 वर्षांनी अधिकारी म्हणून रुजू झाली तरुणी

काही युवा संगणक पदवीधर दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयासमोर आंदोलन करत आहे. कधी शाळेतील शिक्षेप्रमाणे कोंबडा बनत तर कधी दुसऱ्या पद्धतीनं हे आंदोलन सुरु आहे. कॉन्ट्रॅक्टवरील ही पदं नियमित (Permanent) करण्यात यावी मागणीसाठी या पदवी धारकांनी राजस्थान सरकारपासून ते गांधी परिवारापर्यंत सर्वांना मागणी केली आहे.

काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी (Priyanka gandhi) यांनी उत्तर प्रदेशातील अशाच एका मुद्द्यावर टीका केली होती, मात्र आता राजस्थानमध्ये संगणक पदवी धारकांवर अन्याय होत असताना प्रियंका गांधी शांत का आहेत? हा बेरोजगारांचा अपमान आहे असं या संगणक पदवी धारकांचं म्हणणं आहे. मागील काही दिवसांपासून हे पदवीधर इथे आंदोलन करत आहेत, त्यांनी काँग्रेसमधील काही बड्या नेत्यांची भेट घेऊन याबद्दल मागणी केली आहे, मात्र यावर अजून काही स्पष्टता नाही अशीही माहिती या पदवी धारकांनी दिली आहे.

First published:

Tags: Career, Congress, Jobs, Rajasthan