मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

सावधान! तिशीनंतर जॉब सोडण्याची रिस्क घेऊच नका; वाढत्या वयात नोकरी मिळणं कठीण; कंपन्यांना हवेत तरुण

सावधान! तिशीनंतर जॉब सोडण्याची रिस्क घेऊच नका; वाढत्या वयात नोकरी मिळणं कठीण; कंपन्यांना हवेत तरुण

स्किल्सकडे द्या लक्ष

स्किल्सकडे द्या लक्ष

नोकरीसाठी मुलाखतीला येणाऱ्याचं वय किती असावं, हे विविध कंपन्यांच्या नियुक्ती व्यवस्थापकांनी आधीच स्पष्ट केलेलं असतं. नियुक्ती व्यवस्थापक पन्नाशीतल्यांना नोकरीच्या मुलाखतीसाठी कॉल करणंही टाळतात.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 25 ऑगस्ट:   जास्त वय असलेल्यांना नोकऱ्या (Job) मिळण्यात अडचण येते, ही बाब पाहिली किंवा जाणवली असेल. सरकारी नोकरी करणाऱ्या व्यक्ती वयाच्या 60व्या किंवा 58 व्या वर्षी सेवानिवृत्त होतात. परंतु, खासगी नोकरी करणाऱ्यांना पन्नाशी ओलांडल्यानंतर नोकरी मिळणं कठीण होतं. वरिष्ठ स्तरावर नियुक्ती करताना कंपन्या अनुभवापूर्वी वय (Age) पाहतात. कोरोना महामारीनंतर (Corona Pandemic) हा ट्रेंड वाढला आहे. नोकरीसाठी मुलाखतीला येणाऱ्याचं वय किती असावं, हे विविध कंपन्यांच्या नियुक्ती व्यवस्थापकांनी आधीच स्पष्ट केलेलं असतं. नियुक्ती व्यवस्थापक पन्नाशीतल्यांना नोकरीच्या मुलाखतीसाठी कॉल करणंही टाळतात.

गेल्या चार वर्षांच्या डेटाची तुलना केली तर लक्षात येईल की, 21 ते 28 वयोगटातल्या अनेकांना नोकऱ्या मिळालेल्या आहेत. याचा अर्थ कंपन्यांमध्ये या वयोगटातल्यांची संख्या वाढली आहे. दुसरीकडे मात्र 28 ते 50 वयोगटातल्यांची संख्या कमी झाली आहे. पन्नाशीपेक्षा जास्त वयाच्या व्यक्ती नोकरीच्या कक्षेतून (Job Sector) जवळपास बाहेर फेकल्या गेल्या आहेत.

Career Tips: पर्यावरण आणि ग्रीन सेक्टरमध्ये आहेत करिअरच्या अनेक संधी; कसं घ्याल शिक्षण? इथे मिळेल माहिती

वय जास्त असलेल्यांना अनुभवही (Experience) जास्त असतो, असं म्हटलं तरी तुमचं मन जुन्या विचारांनी भरलेलं आहे आणि नवीन पिढी नवे मार्ग शोधण्यात सक्षम आहे, असं कंपन्यांच्या व्यवस्थापनाला वाटतं. स्टार्टअपमध्ये (Startup) तर वय अधिक महत्त्वाचं मानलं गेलं आहे. हिंदुस्तान वृत्तपत्राच्या एका वृत्तानुसार, एका मॅन्युफॅक्चरिंग कंपनीमध्ये (Manufacturing Company) मॅनेजमेंट स्तरावरच्या वरिष्ठ पदाच्या भरतीत 45 वर्षीय उमेदवाराला नाकारण्यात आलं. या व्यक्तीकडे सेवा देण्यासाठी केवळ 13 वर्षं शिल्लक आहेत, असं कारण यामागे सांगण्यात आलं. त्यामुळे या व्यक्तीला कंपनीत पुढे जाण्यास संधी राहणार नाही.

जवळपास सर्वच क्षेत्रांमध्ये तशीच स्थिती

मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्र सोडलं तर इतर सर्व क्षेत्रांमध्ये, 50 वर्षांच्या आसपास वय असलेल्यांसाठी दरवाजे सतत बंद होत आहेत. एफएमसीजी (FMCG), फार्मा, बॅंकिंग आणि फायनान्स, नॉन बॅंकिंग फायनान्स आणि लाइफ इन्शुरन्स यांसारखी सर्व क्षेत्रं तरुणांना अधिक प्राधान्य देत आहेत. मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात जास्त वय असलेल्यांना प्राधान्य दिलं जातं. कारण त्यांच्याकडे दीर्घ अनुभव असतो. मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात अनुभव आणि परिपक्वता अधिक महत्त्वाची आहे. याशिवाय तरुणांना या क्षेत्रात फारसा रस नाही. तरुणांचा सर्वाधिक कल सेवा क्षेत्राकडे आहे.

काळासोबत राहणं महत्त्वाचं

जास्त वय असलेल्या व्यक्तींना नोकऱ्यांचे दरवाजे बंद होत असल्याचं स्पष्ट चित्र आकडेवारीवरून दिसून येतं. तरीही पन्नाशीतल्या व्यक्तींनी स्वतःला अपग्रेड ठेवणं आवश्यक आहे. सध्याच्या काळात काय सुरू आहे, भविष्यात काय घडू शकतं, याचं आकलन त्यांना असणं गरजेचं आहे. हे आकलन तरुणांसोबत राहिल्यानं किंवा त्यांच्यासोबत काम केल्यावर मिळवता येतं.

1990 च्या दशकात उज्ज्वल ठाकर 40 वर्षांचे होते आणि ते स्टॅंडर्ड चार्टर्ड बॅंकेत एक्झिक्युटिव्ह होते. ते सध्या स्वतःच्या कन्सल्टन्सी कंपनीत काम करतात. सध्या त्यांचं वय 71 वर्षं आहे; पण त्यांनी स्वतःला सतत काळानुरूप ठेवलं आहे. `अनुभव आणि तुमचं नेटवर्क (Network) खूप महत्त्वाचं आहे. त्याची पूर्तता कशी आणि कोणत्या किमतीवर करून घेता येईल, हे सांगता येत नाही. काळासोबत चालावं लागेल. पुन्हा उभं राहावं लागेल. मी माझ्या टीममधल्या नवीन सदस्यांसोबत खूप जवळून काम करून हे केलं आहे. त्यांच्याकडून नवीन कौशल्यं शिकलो आहे,` असं ठाकर यांनी सांगितलं.

तरुणांनो तयार राहा! देशात 'या' सेक्टरमध्ये उपलब्ध होणार तब्बल 10 लाख नोकऱ्या; राज्यातही पडणार जॉब्सचा पाऊस

आपल्या देशात कायदा नाही

हा भेदभाव थांबवण्यासाठी भारतात कोणताही कायदा नाही. काही पाश्चिमात्य देशांमध्ये यावर कायदे करण्यात आले आहेत. 'हिंदुस्तान'च्या वृत्तानुसार, `बऱ्याच पाश्चात्य देशांमध्ये याचा निषेध केला जातो,` असं तज्ज्ञ प्रांशू उपाध्याय यांनी सांगितलं. यासाठी त्यांनी प्रसिद्ध एफएमसीजी कंपनीच्या घटनेचा संदर्भ दिला आहे. ते म्हणाले, `कंपनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याच्या शोधात होती. कंपनीची पसंती कमी वय असलेल्यांना होती; पण कंपनीनं 53 वर्षांच्या व्यक्तीची या पदासाठी निवड केली. अवघ्या दोन वर्षांत या व्यक्तीनं आपल्या अनुभवाच्या जोरावर कंपनीचा कायापालट केला. यावरून अनुभव नेहमीच उपयोगी पडतो, हे सिद्ध होतं.`

First published:

Tags: Career, Job