मुंबई, 17 मे : तुम्ही जर बँकिंग क्षेत्रात जॉब शोधत असाल तर तुमच्यासाठी सेंट्रल बँक ऑफ इंडियाने नोकरीची संधी उपलब्ध करून दिली आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियात काउन्सेलर/ एफएलसीसी इन्चार्ज फॅकल्टी आणि ऑफिस असिस्टंट ही पदं भरली जाणार आहेत. या पदांसाठी अर्ज करण्याकरिता 25 मे 2023 पर्यंत मुदत आहे. या पदांवर नियुक्ती इंटरव्ह्यूच्या माध्यमातून होणार आहे. या पदांसाठी असलेल्या निकषांबाबत सविस्तर जाणून घेऊया. सेंट्रल बँक ऑफ इंडिया काउन्सेलर/ एफएलसीसी इन्चार्ज फॅकल्टी आणि ऑफिस असिस्टंट या पदांसाठी स्केल -II आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँक अथवा एसबीआयमध्ये काम करण्याचा अनुभव असलेल्या सेवानिवृत्त बँक अधिकाऱ्यांची नियुक्ती करणार आहे. या भरती प्रक्रियेसंदर्भात सेंट्रल बँक ऑफ इंडियाने अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. अधिसूचनेनुसार, ही पदं एक वर्षाकरिता कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर भरण्यात येणार आहेत. सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या अधिसूचनेनुसार, काउन्सेलर अर्थात समुपदेशक पदासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवाराने यूजीसी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा पदव्युत्तर पदवी प्राप्त केलेली असावी. तसेच अॅग्रीकल्चर फायनान्स ऑफिसर / रूरल डेव्हलपमेंट ऑफिसर / बँकिंगच्या मुख्य प्रवाहातील अॅग्रीकल्चर ऑफिसर / लीड डिस्ट्रिक्ट मॅनेजर आणि फॅकल्टी लीडर्स / ट्रेनिंग सेंटर्सचे फॅकल्टी मेंबर्स / महाविद्यालयात रुरल डेव्हलपमेंट शिकवण्याचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार आहे. फॅकल्टी या पदासाठी इच्छुक उमेदवाराने पदव्युत्तर पदवी प्राप्त केलेली असावी. रुरल डेव्हलपमेंटमध्ये एमएसडब्लू/एमए, समाजशास्त्र, मानस शास्त्रात एमए किंवा बीएस्सी अॅग्री पदवी मिळवलेली असावी. बीएससी बीएड केलेले उमेदवारही या पदासाठी अर्ज करू शकतात. अधिकारी म्हणून कामाचा अनुभव असलेले सेवानिवृत्त बँक अधिकारी, वर नमूद पात्रता असलेले प्राध्यापक, ग्रामीण विकासात काम करण्याचा अनुभव असलेल्या उमेदवाराला प्राधान्य दिले जाईल. वाचा - उच्चशिक्षित तरुणांना नोकरीची सुवर्णसंधी, पॉवर ग्रीडमध्ये बंपर भरती ऑफिस असिस्टंट या पदासाठी इच्छुक उमेदवार बीएसडब्लू/बीए/बीकॉम झालेला असावा. तसेच त्याला कॉम्प्युटरचं ज्ञान असावं. अकाउंट आणि बुक किपिंगचा अनुभव असलेल्या उमेदवारांना या पदासाठी प्राधान्य दिलं जाईल. सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या अधिसूचनेनुसार, काउन्सेलर आणि फॅकल्टी पदासाठी इच्छुक उमेदवाराचं कमाल वय 65 वर्षं असावं. ऑफिस असिस्टंट पदासाठी इच्छुक उमेदवाराचं कमाल वय 35 वर्षापर्यंत असावं. नियुक्ती एक वर्षाच्या कालावधीसाठी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर केली जाईल. हा कालावधी वाढवला जाऊ शकतो. सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या अधिसूचनेनुसार, काउन्सेलर पदासाठी कॉन्ट्रॅक्टची रक्कम ही उमेदवारांच्या शेवटच्या पगाराच्या समतुल्य, कम्युटेशन आणि रिलीफ आदींच्या पूर्वी निश्चित केलेल्या पेन्शनच्या प्रारंभिक रकमेपेक्षा कमी असेल. त्यावर देय किंवा 15,000 रुपये यापैकी जी कमी असेल ती एकरकमी रक्कम आणि दरमहा 500 रुपये मोबाईलसह इतर भत्ते म्हणून दिले जातील. तथापि, `` अधिकाऱ्याने घेतलेले शेवटचे वेतन आणि भत्ता, कम्युटेशन आणि रिलिफ आदी पूर्वी निश्चित केलेल्या पेन्शनच्या सुरुवातीच्या रकमेपेक्षा कमी असेल``. राष्ट्रीयीकृत बँकेच्या निवृत्तीवेतनधारक बँक अधिकाऱ्याला हा नियम असेल. पेन्शन नसलेल्या उमेदवाराला दरमहा 15,000 रुपये वेतन मिळेल. यासह 500 रुपये मोबाईल बिलासह अन्य भत्ता म्हणून दिले जातील. या शिवाय कोणतेही इतर फायदे किंवा शुल्क देय असणार नाही. वाचा - महिन्याला तब्बल 2,15,900 रुपये सॅलरी; टेलिकम्युनिकेशन्स विभागात होणार भरती फॅकल्टी पदावर नियुक्त झालेल्या उमेदवाराला दरमहा 20,000 रुपये कॉन्ट्रॅक्ट वेतन मिळेल. या शिवाय कोणतेही भत्ते, फायदे, पगार किंवा सुविधा मिळणार नाहीत. ऑफिस असिस्टंट या पदावर नियुक्त झालेल्या उमेदवाराला दरमहा 12,000 रुपये कॉन्ट्रॅक्ट वेतन मिळेल. या शिवाय कोणतेही भत्ते, फायदे, पगार किंवा सुविधा मिळणार नाहीत. या पदांसाठी उमेदवारांची निवड इंटरव्ह्यूच्या आधारे केली जाईल. या संदर्भातील योग्य तपशील योग्यवेळी निवडलेल्या उमेदवारांना कळवला जाईल. या पदांकरिता पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अधिकृत अधिसूचनेमध्ये दिलेला अर्ज भरावा. त्यावर कॉन्ट्रक्टवरील एफएलसीसीचे इन्चार्ज/ काउन्सेलर या पदासाठी भरती अर्ज असे नमूद करावे. त्यानंतर पूर्ण भरलेला अर्ज द रिजनल मॅनेजर, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, रिजनल ऑफिस कटिहार, पहिला मजला, साह काटरा, न्यू मार्केट, जिल्हा-कटिहार, बिहार - 854105 या पत्त्यावर 25 मे 2023 पूर्वी पाठवावा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.