मुंबई, 16 मे : नोकरीच्या शोधात असलेल्या उच्चशिक्षित उमेदवारांसाठी पॉवरग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने नोकरीची संधी उपलब्ध करून दिली आहे. पॉवर ग्रीड कॉर्पोरेशनमध्ये अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक हे एक पद रिक्त असून, त्यासाठीची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या पदासाठी अंतिम नियुक्ती इंटरव्ह्यूच्या माध्यमातून केली जाणार आहे. या पदासाठी पॉवरग्रीडने काही निकष निश्चित केले आहेत.पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पदासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. हे पद पाच वर्ष कालावधीसाठी भरले जाणार आहे. या संदर्भात पॉवर ग्रीडने 4 मे 2023 रोजी अधिकृत नोटिफिकेशन जारी केलं आहे. पॉवर ग्रीडने जारी केलेल्या नोटिफिकेशननुसार, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पदासाठी इच्छुक उमेदवाराने मान्यताप्राप्त संस्थेतून पदवीसह एमबीए/इंजिनिअरिंग/ चार्टर्ड अकाउंटंट्स/ कॉस्ट अकाउंटंट्स/पीजीडीआयएम पूर्ण केलेले असावे. तसंच इच्छुक महिला किंवा पुरुष उमेदवाराकडे किमान पाच वर्षांचा अनुभव असावा. तसंच त्याच्याकडे किंवा तिच्याकडे एखाद्या मोठ्या ऑर्गनायझेशनमध्ये फायनान्स/ बिझनेस डेव्हलपमेंट/ प्रॉडक्शन/ ऑपरेशन/ मार्केटिंग/ प्रोजेक्ट मॅनेजमेंट या क्षेत्रात काम केल्याचा किमान 10 वर्षाचा अनुभव असावा. या पदासाठी इच्छुक उमेदवाराचे वय कमाल 45 वर्ष असावे. या पदावर नियुक्त झालेल्या उमेदवाराला दरमहा आयडीए पॅटर्ननुसार 2,00,000 ते 3,70,000 रुपये वेतन दिले जाईल. या पदावरील नियुक्ती पाच वर्षांसाठी असेल. हा कालावधी नेमणुक होण्याच्या तारखेपासून सुरू होईल आणि सेवानिवृत्तीच्या दिवसापर्यंत किंवा पुढील सुचना येईपर्यंत असेल.अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून निवडला गेलेला उमेदवार कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहतील आणि संचालक मंडळ, सरकार तसंच भागधारकांना अहवाल देतील. निवडीबाबत सार्वजनिक उपक्रमाच्या निवड मंडळाकडून केवळ सचिव आणि सार्वजनिक व्यवसाय निवड मंडळाला कोणतंही पत्र प्राप्त होईल. ग्रॅज्युएट उमेदवारांना नोकरीचा गोल्डन चान्स; ‘या’ मंत्रालयात भरतीची प्रक्रिया सुरु; असा करा अर्ज
पॉवर ग्रीडच्या अधिकृत नोटिफिकेशननुसार, पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी त्यांचे विहित नमून्यातील अर्ज फक्त पीईएसबीच्या अधिकृत वेबसाईटद्वारे सबमिट करावेत. या पदाकरिता अर्ज करण्याची अंतिम मुदत 13 जुलै 2023 रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत असेल. सरकारी अधिकारी अधिकारी त्यांचे अर्ज कॅडर कंट्रोलिंग अथॉरिटी, सीएमडी/एमडी/ फंक्शनल डायरेक्टर्ससाठीचे प्रशासकीय मंत्रालय आणि बोर्डाच्या खालच्या स्तरावरील पदांसाठी संबंधित सीपीएसई यांच्या मार्फत सादर करू शकतात. निवडलेल्या उमेदवारांना अंतिम प्रक्रियेचा भाग म्हणून इंटरव्ह्यूसाठी बोलवले जाईल. त्यातून योग्य उमेदवाराची अंतिम निवड केली जाणार आहे.