मुंबई, 16 मे: टेलिकम्युनिकेशन्स विभागात प्रतिनियुक्तीवर भरती केली जाणार असल्याची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. एकूण सहा पदांवर ही भरती केली जाणार असून, आठ रिक्त जागा यातून भरल्या जाणार आहेत. अर्ज करण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून तीस दिवसांची मुदत जाहीर करण्यात आली आहे. ‘स्टडीकॅफे’ने याबाबत माहिती देणारं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. एज्युकेशन अँड रिसर्च नेटवर्क अर्थात ERNET India, टेलिकम्युनिकेशन विभाग, कम्युनिकेशन्स मंत्रालय आणि भारत सरकार यांच्यातर्फे सहा पदांवर प्रतिनियुक्तीवर भरती केली जाणार आहे. रजिस्ट्रार अँड सीपीओ, सीनिअर मॅनेजर, ज्युनिअर हिंदी ट्रान्स्लेटर, अकाउंटंट, पर्सनल असिस्टंट आणि ज्युनिअर असिस्टंट या सहा पदांवर एकूण आठ जणांची भरती केली जाणार आहे. याबाबतची अधिसूचना 27 एप्रिल रोजी प्रसिद्ध करण्यात आली असून, एका महिन्याच्या आत अर्ज करायचे आहेत. ही प्रतिनियुक्ती सुरुवातीला एका वर्षाची असून, उमेदवाराची त्या काळातली कामगिरी आणि वर्तन यांचा विचार करून कार्यकाळ वाढवला जाऊ शकतो.
रजिस्ट्रार अँड सीपीओ, ज्युनिअर हिंदी ट्रान्स्लेटर, अकाउंटंट, पर्सनल असिस्टंट या पदांवर प्रत्येकी एक, तर सीनिअर मॅनेजर आणि ज्युनिअर असिस्टंट या पदांवर प्रत्येकी दोन जणांची भरती केली जाणार आहे. रजिस्ट्रार अँड सीपीओ आणि सीनिअर मॅनेजर या पदांवरील उमेदवारांना सातव्या वेतन आयोगानुसार 13व्या पातळीवरचं म्हणजे 1,23,100 रुपये ते 2,15,900 रुपये एवढं वेतन मिळेल. ज्युनिअर हिंदी ट्रान्स्लेटर, अकाउंटंट, पर्सनल असिस्टंट या पदांवरच्या उमेदवारांना सहाव्या पातळीवरचं म्हणजेच 35,400 रुपये ते 1,12,400 रुपये एवढं वेतन मिळेल. ज्युनिअर असिस्टंटला चौथ्या पातळीवरचं म्हणजे 25,500 रुपये ते 81,100 रुपये वेतन मिळेल. हे सर्व मासिक वेतनाचे आकडे आहेत. या सर्व पदांसाठी 56 वर्षं वयाच्या आतले इच्छुक उमेदवार अर्ज करू शकतात. सर्व पदांसाठी आवश्यक असलेल्या शैक्षणिक पात्रतेविषयी माहिती घेऊ या. 10वी, 12वीनंतर टॉपला न्यायचंय करिअर? मग निकालाची वाट बघू नका; आताच सुरु करा ‘हे’ कोर्सेस रजिस्ट्रार अँड सीपीओ : कोणत्याही शाखेतली पदव्युत्तर पदवी, पर्सनल फायनान्स किंवा अन्य निगडित विषयात पीजी डिप्लोमा सीनिअर मॅनेजर : मान्यताप्राप्त संस्थेतून किमान 60 टक्के गुणांसह बीई, बीटेक, एमएस्सी किंवा संबंधित क्षेत्रात किमान 60 टक्के गुणांसह एमई किंवा एमटेक किंवा मान्यताप्राप्त संस्थेतून पीएचडी ज्युनिअर हिंदी ट्रान्स्लेटर : केंद्र सरकारच्या अन्य विभागांमध्ये किंवा स्वायत्त संस्थांमध्ये किंवा सार्वजनिक क्षेत्रात कोणतंही नियमित पद किंवा पाचव्या वेतनपातळीच्या पदावरची किमान सहा वर्षांची सेवा किंवा चौथ्या वेतनपातळीवरची किमान 10 वर्षं सेवा जॉबसाठी एकही परीक्षा नाही थेट होणार मुलाखत, मुंबई विमानतळ इथे तब्बल 480 जागांसाठी भरतीची घोषणा अकाउंटंट : कॉमर्स शाखेतली पदवी आणि किमान तीन वर्षांचा अनुभव, कम्प्युटराइज्ड अकाउंटिंग पॅकेजेसबद्दलचं ज्ञान. याशिवाय, अकाउंट्स, फायनान्स, बजेटिंग वगैरे क्षेत्रात जबाबदार पदावरचा अनुभव असल्यास प्राधान्य. पर्सनल असिस्टंट : पदवीधर, इंग्लिश/हिंorl प्रति मिनिट 120/100 शब्दांचा शॉर्टहँड स्पीड ज्युनिअर असिस्टंट : पदवीधर आणि कम्प्युटरचं ज्ञान आवश्यक. 12वी पास असो वा ग्रॅज्युएट इथे तब्बल 347 जागांसाठी बंपर ओपनिंग्स; अर्जाला अवघे काही दिवस शिल्लक या व्यतिरिक्त प्रत्येक पदासाठी अन्य काही पात्रता आणि निकषही असून, त्याची माहिती अधिकृत अधिसूचनेमध्ये मिळेल. आधीच्या प्रतिनियुक्तीसह कोणत्याही प्रतिनियुक्तीचा कालावधी पाच वर्षांपेक्षा अधिक नसेल, असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. अन्य सविस्तर माहितीसाठी ernet.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी. अर्ज आणि आवश्यक कागदपत्रं मुदतीत संबंधित कार्यालयाकडे पाठवणं आवश्यक आहे.