मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

CBOI Recruitment: सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये 214 जागांसाठी नोकरीची संधी; या पदांसाठी करा अप्लाय

CBOI Recruitment: सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये 214 जागांसाठी नोकरीची संधी; या पदांसाठी करा अप्लाय

सेंट्रल बँक ऑफ इंडिया मुंबई भरती

सेंट्रल बँक ऑफ इंडिया मुंबई भरती

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीन अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 जानेवारी 2022 असणार आहे.

  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 23 डिसेंबर: सेंट्रल बँक ऑफ इंडिया (Central Bank Of India) इथे लवकरच काही पदांच्या 214 हून अधिक जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Central Bank Of India Recruitment 2021 – 2022) जारी करण्यात आली आहे. लोकपाल या पदांसाठी ही भरती (Bank Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीन अर्ज (Retired person jobs in Maharashtra) करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 जानेवारी 2022 असणार आहे.

या पदांसाठी भरती  

अंतर्गत लोकपाल (Internal Ombudsman) - एकूण जागा 214+

Job Alert: NIFT मुंबई इथे नोकरीची सुवर्णसंधी; 56,000 रुपये मिळणार पगार

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

अंतर्गत लोकपाल (Internal Ombudsman) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये शिक्षण आणि अनुभव घेतला असणं आवश्यक आहे.

उमेदवार हे सेवानिवृत्त (Retired) असावेत किंवा सेवारत अधिकारी, डेप्युटी जनरल या पदांवर काम केलेले असावेत.

किंवा उमेदवारांनी दुसरी बँक/वित्तीय क्षेत्राचा व्यवस्थापक किंवा समतुल्य नियामक संस्था (सेंट्रल बँक ऑफ इंडिया व्यतिरिक्त) मध्ये काम केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांकडे आवश्यक ते सर्व स्किल्स असणं आवश्यक आहे.

तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांकडे संबंधित अनुभव असणं आवश्यक आहे.

बँकिंग, नियमन, पर्यवेक्षण, पेमेंट आणि सेटलमेंट सिस्टम आणि/किंवा ग्राहक संरक्षण या क्षेत्रात काम करताना किमान सात वर्षे अनुभव असणं आवश्यक आहे.

इतका मिळणार पगार

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना अदा करावयाचा मोबदला हा शेवटचं वेतन आणि काढलेल्या भत्त्यापुरता मर्यादित असेल,

वयोमर्यादा

अंतर्गत लोकपाल (Internal Ombudsman) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवाराचं वय हे अधिकतम 70 वर्ष असणं आवश्यक आहे.

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज पाठवण्याचा पत्ता

महाव्यवस्थापक- HRD, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, चंदर मुखी, 17 वा मजला, नरिमन पॉइंट मुंबई- 400 021

गोल्डन चान्स! 10वी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची मोठी संधी; आजच करा अर्ज

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 07 जानेवारी 2022

JOB TITLECentral Bank Of India Recruitment 2021 – 2022
या पदांसाठी भरती  अंतर्गत लोकपाल (Internal Ombudsman) - एकूण जागा 214+
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव अंतर्गत लोकपाल (Internal Ombudsman) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये शिक्षण आणि अनुभव घेतला असणं आवश्यक आहे. उमेदवार हे सेवानिवृत्त (Retired) असावेत किंवा सेवारत अधिकारी, डेप्युटी जनरल या पदांवर काम केलेले असावेत. किंवा उमेदवारांनी दुसरी बँक/वित्तीय क्षेत्राचा व्यवस्थापक किंवा समतुल्य नियामक संस्था (सेंट्रल बँक ऑफ इंडिया व्यतिरिक्त) मध्ये काम केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांकडे आवश्यक ते सर्व स्किल्स असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांकडे संबंधित अनुभव असणं आवश्यक आहे. बँकिंग, नियमन, पर्यवेक्षण, पेमेंट आणि सेटलमेंट सिस्टम आणि/किंवा ग्राहक संरक्षण या क्षेत्रात काम करताना किमान सात वर्षे अनुभव असणं आवश्यक आहे.
इतका मिळणार पगारया पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना अदा करावयाचा मोबदला हा शेवटचं वेतन आणि काढलेल्या भत्त्यापुरता मर्यादित असेल,
वयोमर्यादावय हे अधिकतम 70 वर्ष असणं आवश्यक आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्तामहाव्यवस्थापक- HRD, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, चंदर मुखी, 17 वा मजला, नरिमन पॉइंट मुंबई- 400 021

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.centralbankofindia.co.in/en या लिंकवर क्लिक करा

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

First published:

Tags: Career, जॉब, बँक