Home /News /career /

CBSE Term1 Result: विद्यार्थ्यांनो, या आठवड्यात निकाल जाहीर होण्याची शक्यता; कसे बघाल मार्क्स? जाणून घ्या

CBSE Term1 Result: विद्यार्थ्यांनो, या आठवड्यात निकाल जाहीर होण्याची शक्यता; कसे बघाल मार्क्स? जाणून घ्या

CBSE च्या पहिल्या टर्मचा निकाल

CBSE च्या पहिल्या टर्मचा निकाल

आता CBSE च्या पहिल्या टर्मचा निकाल लवकरच लावण्यात येणार आहे अशी माहिती मिळाली आहे.

    मुंबई, 08 मार्च: कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता मागील वर्षीच्या CBSE बोर्डाच्या परीक्षा (CBSE Board Exams) रद्द करण्यात आल्या. मात्र यंदा परीक्षा रद्द कराव्या लागू नयेत म्हणूनच CBSE बोर्डाकडून दहावी आणि बारावी बोर्डाची परीक्षा दोन टर्ममध्ये (CBSE Board terms exams) घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार CBSE च्या पहिल्या टर्मच्या परीक्षा (CBSE Board Term 1 Exams) घेण्यात आल्या आहेत. मात्र परीक्षेला तब्बल तीन महिने उलटून गेले तरी अजून निकाल (CBSE Board Term 1 Result) जाहीर करण्यात आला नाही. मात्र आता CBSE च्या पहिल्या टर्मचा निकाल लवकरच लावण्यात येणार आहे अशी माहिती मिळाली आहे. CBSE बोर्डाच्या विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाची स्थिती आहे. बोर्डानं अद्याप टर्म 1 परीक्षेचा निकाल (CBSE Board Term 1 Result date) जाहीर केलेला नाही आणि टर्म 2 परीक्षेचं वेळापत्रक (CBSE Term 2 Exam Time Table) घोषित केलं आहे. CBSE टर्म 1 ची परीक्षा डिसेंबर 2021 मध्ये झाली होती आणि तेव्हापासून विद्यार्थी निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. तुम्हीही मुलांना Online Education देताय? जरा थांबा; होऊ शकतो आर्थिक Fraud CBSE बोर्डाची परीक्षा नवीन शैक्षणिक धोरण 2020 अंतर्गत घेतली जात आहे. त्यामुळेच दहावी आणि बारावीच्या परीक्षा दोन टर्म आणि ऑफलाइन पद्धतीनं घेतल्या जात आहेत. CBSE बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी गेल्या 2 महिन्यांपासून बोर्डाच्या परीक्षेबाबत कोणतीही अधिकृत माहिती जाहीर केलेली नाही. CBSE च्या अधिकृत वेबसाइट cbse.nic.in वर बोर्ड परीक्षा 2022 शी संबंधित सर्व अपडेट्स तपासण्याचं आवाहन करण्यात येत आहे. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, CBSE बोर्डाशी संबंधित एका अधिकाऱ्याने CBSE टर्म 1 च्या निकालाशी संबंधित एक महत्त्वाची माहिती जारी केली आहे. अहवालानुसार, CBSE टर्म 1 चा निकाल या आठवड्यात जाहीर होण्याची अपेक्षा आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना CBSE बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर लक्ष ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. बोर्डाच्या परीक्षेदरम्यान संपूर्ण राज्यात Internet सेवा ठप्प; या राज्याचा निर्णय निकाल तयार या अहवालानुसार, CBSE टर्म 1 चा निकाल तयार करण्यात आला आहे आणि तो 10 मार्च 2022 पर्यंत जारी केला जाऊ शकतो. सीबीएसई बोर्डाचा निकाल अधिकृत वेबसाइटवर जाहीर केला जाईल. वेबसाइट क्रॅश झाल्यास, इयत्ता 10वी आणि 12वीचे विद्यार्थी एसएमएसद्वारे (CBSE Result by SMS) किंवा डिजिलॉकरवर (CBSE Result on Digi Locker) निकाल पाहू शकतील.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Board Exam, Career, CBSE, Exam result, HSC, Ssc board, Tips

    पुढील बातम्या