नवी दिल्ली, 23 एप्रिल : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) 11वी आणि 12वी (CBSE 10th 12th syllabus 2022) साठीच्या इतिहास आणि राज्यशास्त्राच्या अभ्यासक्रमातून अलिप्ततावादी आंदोलन (Non-Aligned Movement), शीतयुद्धाचा काळ ( Cold War era), आफ्रिकी-आशियाई क्षेत्रात इस्लामी साम्राज्याचा उदय, मुगल दरबाराचा (Mughal courts) इतिहास आणि औद्योगिक क्रांतिशी संबंधित धडे काढून टाकले आहेत. त्याचप्रमाणे इयत्ता 10वीच्या अभ्यासक्रमातील ‘अन्न सुरक्षा’ या विषयातून ‘शेतीवरील जागतिकीकरणाचा परिणाम’ हा विषय वगळण्यात आला आहे. यासोबतच ‘धर्म, जातीयवाद आणि राजकारण-सांप्रदायिकता धर्मनिरपेक्ष राज्य’ या विभागातील फैज अहमद फैज यांच्या दोन उर्दू कवितांचा अनुवादित अंशही यंदा वगळण्यात आला आहे. CBSE ने अभ्यासक्रमातून ‘लोकशाही आणि विविधता’ या विषयावरील प्रकरण देखील काढून टाकले आहेत. विषय किंवा संबंधित धडे हटवण्याचे कारण विचारले असता, अधिकाऱ्यांनी सांगितले की हा बदल अभ्यासक्रमाच्या तर्कशुद्धतेचा एक भाग आहे आणि राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (एनसीईआरटी) शिफारशींनुसार करण्यात आला आहे. इयत्ता 11 वीच्या इतिहासाच्या अभ्यासक्रमातून या वर्षी वगळलेला ‘सेंट्रल इस्लामिक लँड्स’ हा अध्याय आफ्रिकन-आशियाई प्रदेशात इस्लामिक साम्राज्याचा उदय आणि त्याचा अर्थव्यवस्थेवर आणि समाजावर होणाऱ्या परिणामांविषयी माहिती देणारा होता. त्याचप्रमाणे, इयत्ता 12 वीच्या इतिहासाच्या अभ्यासक्रमातील ‘द मुगल कोर्ट: रिकन्स्ट्रटिंग हिस्ट्रीज थ्रू क्रॉनिकल्स’ शीर्षक असलेले प्रकरण मुघलांच्या सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक इतिहासाच्या पुनर्रचनेच्या संदर्भात मुघल दरबारातील इतिहासाविषयी माहिती देणारा होता. 2022-23 या शैक्षणिक सत्रासाठी शाळांना देण्यात आलेला अभ्यासक्रम मागील वर्षी केलेल्या एका सत्रातील दोन भागांच्या परीक्षा प्रकारातून पुन्हा एकल-बोर्ड परीक्षेकडे परत जाण्याचा संकेत बोर्डाकडून मिळत आहे. हे वाचा - Transfer ऑर्डर रद्द करण्यासाठी शिक्षिकांचं विद्यार्थिनींसोबत धक्कादायक कृत्य मात्र, कोविड महामारीच्या पार्श्वभूमीवर त्यावेळी परीक्षा दोन भागांमध्ये आयोजित करण्याची प्रणाली विशेष उपाय म्हणून जाहीर करण्यात आली होती. परिस्थिती लक्षात घेऊन त्या-त्या वेळी अंतिम निर्णय घेतला जाईल, असे बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी गेल्या आठवड्यात सांगितले होते. बोर्डाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, “CBSE 9वी ते 12वीच्या वर्गांसाठी वार्षिक अभ्यासक्रम जाहीर करते ज्यात शैक्षणिक साहित्य, परीक्षांचे अभ्यासक्रम आणि आणि मूल्यांकन मार्गदर्शक तत्त्वे यांचा समावेश होतो. हितधारकांनी सूचवलेले उपाय आणि इतर सद्य परिस्थिती लक्षात घेऊन, बोर्ड 2022-23 शैक्षणिक सत्राच्या शेवटी मूल्यांकनाचा वार्षिक आराखडा आयोजित करण्याच्या बाजूने आहे आणि त्यानुसार अभ्यासक्रमाची रचना करण्यात आली आहे.” तथापि, अभ्यासक्रमात बदल करण्याची ही पहिलीच वेळ नाही. अनेक दशकांपासून अभ्यासक्रमाचा भाग असलेली काही प्रकरणे मंडळाने काढून टाकली आहेत. हे वाचा - दुष्ट आत्म्यांच्या भीतीने गावकऱ्यांनी स्वत:ला घरात केले बंद, पुढे काय घडलं? अभ्यासक्रम तर्कसंगत करण्याच्या निर्णयाचा एक भाग म्हणून, CBSE ने 2020 मध्येच जाहीर केले होते की 11 वीच्या राज्यशास्त्राच्या पाठ्यपुस्तकातील संघवाद, नागरिकत्व, राष्ट्रवाद आणि धर्मनिरपेक्षता या विषयांवर विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करताना विचार केला जाणार नाही, ज्यामुळे मोठा वाद निर्माण झाला. त्यानंतर हे विषय 2021-22 शैक्षणिक सत्रात कायम करण्यात आले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







