Home /News /national /

Transfer ऑर्डर रद्द करण्यासाठी शिक्षिकांचं विद्यार्थिनींसोबत धक्कादायक कृत्य; वाचून बसेल धक्का

Transfer ऑर्डर रद्द करण्यासाठी शिक्षिकांचं विद्यार्थिनींसोबत धक्कादायक कृत्य; वाचून बसेल धक्का

बऱ्याचदा शिक्षकांच्या बदल्या दुसऱ्या जिल्ह्यात होतात. जिथे बदली झाली तिथे त्यांना जावं लागतं. शिक्षकांनी ट्रान्स्फर ऑर्डर रद्द करण्यासाठी लाच दिली, अशा बातम्याही आपल्याला ऐकू येतात.

उत्तर प्रदेश, 23 एप्रिल: शिक्षकांची बदली होणं ही अगदी सामान्य गोष्ट आहे. ट्रान्स्फर ऑर्डर (Transfer Order) आली, की शिक्षक त्यांची नियुक्ती असलेल्या दुसऱ्या शाळेत शिकवायला जातात. बऱ्याचदा शिक्षकांच्या बदल्या दुसऱ्या जिल्ह्यात होतात. जिथे बदली झाली तिथे त्यांना जावं लागतं. शिक्षकांनी ट्रान्स्फर ऑर्डर रद्द करण्यासाठी लाच दिली, अशा बातम्याही आपल्याला ऐकू येतात; पण नुकत्याच घडलेल्या एका प्रकरणात दोन शिक्षिकांनी ट्रान्स्फर ऑर्डर रद्द करायला लावण्यासाठी एक-दोन नव्हे तर तब्बत 24 विद्यार्थिनींना ओलीस ठेवल्याचं समोर आलं आहे. ही घटना उत्तर प्रदेशमधल्या लखीमपूर खेरी जिल्ह्यात घडली आहे. 'आज तक'ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे. लखीमपूर खेरी जिल्ह्यातल्या बेहजाम येथे कस्तुरबा गांधी कन्या शाळा आहे. या शाळेतल्या दोन शिक्षिकांनी 24 विद्यार्थिनींना शाळेच्या टेरेसवर ओलीस (Hostage) ठेवलं होतं. बदली आदेश रद्द करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांवर दबाव आणण्यासाठी हे कृत्य केल्याचं शिक्षिकांनी सांगितलं. ही घटना गुरुवारी (21 एप्रिल) रात्री घडली. काही तासांनंतर मुलींची सुटका करून त्यांना त्यांच्या वसतिगृहात परत आणण्यात अधिकारी आणि स्थानिक पोलिसांना यश आलं. "कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातला बदली आदेश रद्द करण्यासाठी शिक्षिकांनी जिल्हाधिकाऱ्यांवर दबाव आणण्यासाठी हे कृत्य केलं," असं लखीमपूर खेरीचे प्राथमिक शिक्षणाधिकारी लक्ष्मीकांत पांडे यांनी शुक्रवारी (22 एप्रिल) सांगितलं. खोऱ्यातल्या दहशतवादी हल्ल्यांमागे शाहबाज कनेक्शन?, 10 दिवसातला भयानक आकडा समोर दरम्यान, विद्यार्थिनींना ओलीस ठेवल्यानंतर वसतिगृहातल्या वॉर्डन ललिता कुमारी यांनी प्राथमिक शिक्षण अधिकारी पांडे आणि जिल्हा कन्या शिक्षण समन्वयक रेणू श्रीवास्तव यांना घटनेची माहिती दिली. माहितीनंतर हे दोन्ही अधिकारी शाळेत पोहोचले आणि अनेक तास आरोपी शिक्षिकांना (Teachers) समजावत राहिले. अखेर स्थानिक पोलिसांच्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांनाही बोलावून प्रकरण मिटवण्यात आल्याचं पांडे यांनी सांगितलं. मनोरमा मिश्रा आणि गोल्डी कटियार या दोन शिक्षिकांविरुद्ध आयपीसीच्या संबंधित कलमांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे, असंही पांडे यांनी सांगितलं. दुसरीकडे, या प्रकरणाच्या विभागीय चौकशीचे आदेशही देण्यात आले आहेत. एक समिती तीन दिवसांत या संदर्भातला अहवाल देईल. तपासात दोषी आढळल्यास सेवा करार रद्द करण्यासह शिक्षिकांवर कठोर कारवाई केली जाईल, असं शिक्षणाधिकारी लक्ष्मीकांत पांडे म्हणाले. बदली रद्द करवून घेण्यासाठी महिला शिक्षकांनी उचललेलं हे पाऊल धक्कादायक आहे. बदली होऊ नये म्हणून या शिक्षिकांनी 24 विद्यार्थिनींना ओलिस (Hostage) ठेवल्याची ही घटना समोर आल्यानंतर पालकांकडूनही संताप व्यक्त केला जात असून परिसरात खळबळ उडाली आहे.
Published by:Pooja Vichare
First published:

Tags: Student, Uttar pradesh

पुढील बातम्या