जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / मोठी बातमी! CBSE बोर्ड परीक्षा पॅटर्नमध्ये महत्त्वाचे बदल; आता विचारले जातील असेही प्रश्न

मोठी बातमी! CBSE बोर्ड परीक्षा पॅटर्नमध्ये महत्त्वाचे बदल; आता विचारले जातील असेही प्रश्न

बोर्ड परीक्षा पॅटर्नमध्ये महत्त्वाचे बदल

बोर्ड परीक्षा पॅटर्नमध्ये महत्त्वाचे बदल

CBSE बोर्ड परीक्षा 2023 मध्ये बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेच्या पॅटर्नमधील काही महत्त्वाचे बदल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 13 डिसेंबर: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या परीक्षांबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सीबीएसई बोर्डाच्या 10वी आणि 12वीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांकडून काही स्पर्धात्मक प्रश्नही विचारले जातील. CBSE बोर्ड परीक्षा 2023 मध्ये बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेच्या पॅटर्नमधील काही महत्त्वाचे बदल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. चसला तर मग जाणून घेऊया. जगात मंदी आणि भारतात सुवर्णसंधी! ‘मॅकडोनाल्ड्स इंडिया’मध्ये लवकरच होणार बंपर पदभरती विविध मीडिया रिपोर्ट्सनुसार, राज्याच्या शिक्षण मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी संसदेत विचारलेल्या प्रश्नाच्या लेखी उत्तरात सांगितले की, नवीन शैक्षणिक धोरण 2020 (NEP 2020) अंतर्गत बोर्ड परीक्षेच्या प्रश्नांच्या पॅटर्नमध्ये बदल करण्यात येत आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण म्हणजेच NEP अंतर्गत CBSE नेही शाळांना शिक्षणाचा पॅटर्न आणि अभ्यासक्रम बदलण्याचा सल्ला दिला होता. CBSE बोर्डाच्या 10वी आणि 12वीच्या परीक्षेत गुणवत्तेवर आधारित अनेक प्रश्न विचारले जातील. एक चूक आणि संपूर्ण करिअर उद्ध्वस्त; पोलीस भरतीसाठी ‘ते’ इंजेक्शन घेण्याचा विचारही करू नका; अन्यथा… असं असेल नवीन पॅटर्न CBSE 10वी बोर्ड परीक्षेत क्षमता आधारित प्रश्नांची संख्या सुमारे 40% असेल आणि 12वी मध्ये 30% असेल. हे प्रश्न असे असतील – वस्तुनिष्ठ प्रकारच्या प्रश्नांमध्ये, तुम्हाला एका शब्दात / 3-4 शब्दांमध्ये उत्तर लिहावे लागेल किंवा तुम्हाला अनेक पर्यायांमधून योग्य प्रश्न निवडावा लागेल. याशिवाय रचनात्मक प्रतिसाद वेळ, प्रतिपादन आणि तर्क आणि केस आधारित प्रश्न विचारले जातील. केस बेस्ड प्रश्नांमध्ये, परिस्थितीशी संबंधित प्रश्न विचारले जातील. Maharashtra Talathi Bharti: सरकारी नोकरी हवीये ना? मग आतापासुनच लागा तयारीला; हा घ्या संपूर्ण Syllabus नवीन शैक्षणिक धोरण 2020 अंतर्गत, शालेय शिक्षणात काही मोठे बदल करण्यात आले आहेत – सक्षमतेवर आधारित शिक्षण, शिकण्याच्या परिणामांचा अवलंब, अध्यापनाच्या प्रयोगात्मक आणि मनोरंजक पद्धतींचा वापर (जसे की कलात्मक मार्ग, क्रीडा-खेळ अध्यापनशास्त्र, कथाकथन इ.),

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात