जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / आता नेहमीच्या स्कोप नसलेल्या ब्रांचेस सोडा; असं करा इंस्ट्रुमेंटेशन कंट्रोल इंजिनीअरिंग; लाखोंमध्ये असते सॅलरी

आता नेहमीच्या स्कोप नसलेल्या ब्रांचेस सोडा; असं करा इंस्ट्रुमेंटेशन कंट्रोल इंजिनीअरिंग; लाखोंमध्ये असते सॅलरी

असं करा इंस्ट्रुमेंटेशन कंट्रोल इंजिनीअरिंग

असं करा इंस्ट्रुमेंटेशन कंट्रोल इंजिनीअरिंग

आज आम्ही तुम्हाला हा कोर्स नेमका काय आहे आणि यामध्ये करिअर करून लाखो रुपये पगाराचा जॉब कसा मिळू शकेल हे सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 18 सप्टेंबर: आजकालच्या काळात मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल अशा ब्रांचेसना अजिबात जॉब असिस्टंस किंवा स्कोप राहिलेला नाही. विद्यार्थ्यांना या ब्रांचेसमधून पास होऊनही जॉब मिळू शकत नाही. म्हणूनच आता विद्यार्थ्यांना इंजीनिअरिंगच्या काही स्कोप असलेल्या ब्रांचेसमध्ये शिशक्षण घ्यायचं असतं. अशीच एक ब्रांच आहे इंस्ट्रुमेंटेशन कंट्रोल इंजिनीअरिंग. आज आम्ही तुम्हाला हा कोर्स नेमका काय आहे आणि यामध्ये करिअर करून लाखो रुपये पगाराचा जॉब कसा मिळू शकेल हे सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया. नक्की काय आहे इंस्ट्रुमेंटेशन कंट्रोल इंजिनीअरिंग? या कोर्समध्ये, विद्यार्थ्यांना सामान्यतः विविध यांत्रिक प्रक्रियांसह वापरल्या जाणार्‍या यंत्रसामग्री आणि प्रणालींचे डिझाइन, विकास आणि ऑपरेशन याबद्दल शिकवले जाते. बदलत्या काळात तंत्रज्ञानाची बाजारपेठ ज्या प्रकारे वाढत आहे, त्याचप्रमाणे या क्षेत्रातील करिअरच्या संधीही वेगाने वाढत आहेत. Mahavitaran Recruitment: 10वी पास आहात ना? मग ‘महावितरण’मध्ये जॉबची सुवर्णसंधी; करा अप्लाय हा अभ्यासक्रम बारावीनंतर करता येतो. बारावीमध्ये उमेदवाराला रसायनशास्त्र, गणित आणि भौतिकशास्त्र हे विषय असणे बंधनकारक आहे. सरकारी संस्थेत या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्याला बारावीत पन्नास टक्के गुण असणे बंधनकारक आहे. मात्र, काही संस्थांमध्ये अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना गुणांमध्ये सूट देण्यात आली आहे. देशातील हे कॉलेजेस आहेत बेस्ट आयआयटी दिल्ली - इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आंबेडकर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, दिल्ली सेंटर फॉर सेन्सर्स, इंस्ट्रुमेंटेशन अँड सायबर फिजिकल सिस्टीम इंजिनियरिंग, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी दिल्ली भारतीय तंत्रज्ञान संस्था, गुवाहाटी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, चेन्नई सीव्ही रमण कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, भुवनेश्वर महात्मा गांधी विद्यापीठ, कोट्टायम इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, चेन्नई इतका मिळेल पगार इंस्ट्रुमेंटेशन कंट्रोल इंजिनिअरिंगची मागणी केवळ सरकारी क्षेत्रातच नाही तर खासगी संस्थांमध्येही वेगाने वाढत आहे. खाजगी क्षेत्रात इंस्ट्रुमेंटेशन कंट्रोल इंजिनिअरिंगचा कोर्स केल्यानंतर वर्षाला 4 ते 5 लाख रुपये कमावता येतात. कोणत्याही क्षेत्रात करिअर सुरू करताना पगार हा वेळ आणि अनुभवाच्या जोरावरच वाढतो. Interview ला निघालात? ही गोष्ट वाचूनच जा, ‘त्या’ एक्स्ट्रा शर्टमुळे बदलेल भविष्य कुठे मिळू शकतो जॉब इन्स्ट्रुमेंटेशन कंट्रोल इंजिनीअरिंगमध्ये करिअरच्या अनेक संधी आहेत. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्याला ऑटोमेशन कंट्रोल, डेव्हलपमेंट, डिझाइन, क्वालिटी कंट्रोल, फॅब्रिकेशन, इन्स्पेक्शन, मेंटेनन्स आणि इंडस्ट्रीमध्ये सेवा अशा अनेक गोष्टींमध्ये काम करण्याची संधी मिळू शकते. एवढेच नाही तर त्यांना पॉवर प्लांट, अन्न प्रक्रिया, कागद, खते आणि रसायने अशा अनेक प्रक्रिया उद्योगांमध्ये काम करण्याची संधी मिळू शकते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात