मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

Interview ला निघालात? आधी ही गोष्ट वाचूनच जा, 'त्या' एक्स्ट्रा शर्टमुळे बदलेल भविष्य

Interview ला निघालात? आधी ही गोष्ट वाचूनच जा, 'त्या' एक्स्ट्रा शर्टमुळे बदलेल भविष्य

एक्सट्रा शर्ट नक्की ठेवा सोबत

एक्सट्रा शर्ट नक्की ठेवा सोबत

आज आम्ही तुम्हाला कणत्याही जॉब मुलाखतीला जाताना एक एक्सट्रा शर्ट सोबत ठेवणं का आवश्यक आहे? यामागील एक किस्सा सांगणार आहोत.

  • Published by:  Atharva Mahankal
मुंबई, 16 सप्टेंबर: Interview ला जाताना आपल्या डोक्यात कशाचा अभ्यास करून जाणार, काय बोलणार, कसं वागणार अशा बऱ्याच गोष्टी असतात. मात्र या सर्व गोष्टींमध्ये आपण आपल्या कपड्यांवर किंवा ड्रेसिंगवर लक्ष देत नाही. अनेकदा आपण एखाद्या जॉबसाठी पात्र असतो मात्र केवळ आपल्या कपडे घालण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे आपल्याला तो जॉब मिळू शकत नाही. मात्र यानंतरच्या Interview ला जाताना जर तुमचे कपडे नीटनेटके राहिले तर जॉब तुम्हालाच मिळेल. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला कणत्याही जॉब मुलाखतीला जाताना एक एक्सट्रा शर्ट सोबत ठेवणं का आवश्यक आहे? हे सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया. 12वी पास ते पोस्ट ग्रॅज्युएटना थेट 1,50,000 रुपये पगाराची नोकरी; इथे करा Apply
बरेचदा तुमचा Job Interview हा दुसऱ्या शहरांमध्ये किंवा मोठ्या मेट्रो सिटी असतो. त्या शहराची लोकसंख्या लक्षात घेता गर्दी असणं स्वाभाविक असतं. जर तुम्ही त्या शहरात नवीन असाल तर तुम्हाला ऑफिसपर्यंतचा पत्ताही माहिती नसतो. त्यामुळे तुम्हाला पब्लिक ट्रान्सपोर्टचा उपयोग करावा लागतो. मुंबईसारखाय शहरात लोकलशिवाय तुमच्याकडे पर्याय नसतो.
अशीच एक गोष्ट घडली अक्षयसोबत. अक्षय हा मूळचा बीड जिल्हातील पण तो आज मुंबईत मुलाखतीला आला होता. बीड सारख्या जिल्ह्यातील असल्यामुळे मुंबई अक्षयला नवीनच होती. त्यामुळे त्याला लोकल, ऑटो या सर्वांची सवय नसणं अपेक्षितच होतं. अक्षयला मुलाखतीची वेळ सकाळी 10 वाजता देण्यात आली होती. त्यामुळे त्याने एका लॉजवर बॅग ठेवली आणि फ्रेश होऊन निघाला. मुंबई, सकाळची वेळ आणि प्रचंड गर्दी यांचं समीकरण त्याला ठाऊकच नव्हतं. त्यामुळे गर्दीतून लोकलमध्ये चढताना टीप टॉप बनून गेलेला अक्षय परळला पोहचतपर्यंत अक्षरशः चोळामोळा झाला. लोकलमधून उतरून अक्षयनं स्वतःकडे बघितलं तर त्याचे कपडे मळले होते. शर्ट चुरगळला होता. अक्षयला टेन्शन आलं. त्याने तातडीनं ऑफिस गाठलं. पण या कपड्यांममध्ये मुलाखत द्यायची कशी असा प्रश्न त्याला पडला होता. पण त्याचवेळी अक्षयला एक गोष्ट क्लिक झाली. Interview ला जाताना एक छान इस्त्री केलेला शर्ट तुमच्या बॅगमध्ये ठेवा असं त्याच्या सरांनी त्याला सांगितलं होतं आणि त्याने अचूकपणे शर्ट बॅगमध्ये ठेवला होता. अक्षयच्या चेहऱ्यावर हसू फुललं. त्याने लगेच वॉशरूम गाठत तो शर्ट बॅगमधून काढला आणि घातला. नेहमीच्या सवयीप्रमाणे त्याच्या बॅगमध्ये कंगवा आणि पावडर होतंच. अक्षय फ्रेश होऊन बाहेर आला तोच सर्वांनी त्याच्याकडे कटाक्ष टाकला. कारण बाहेरून आत आलेला मळक्या कपड्यातील अक्षय आता फ्रेश आणि स्वच्छ नीटनेटका दिसू लागला होता. अक्षयमध्येही एक वेगळाच कॉन्फिडन्स आला होता. त्याने ती मुलाखत दिली आणि त्याला चांगल्या पगाराचा जॉब मिळाला.अक्षयने हुशारीने काम घेत स्वतःची ऑलमोस्ट हातातून गेलेली नोकरी एका शर्टमुळे परत मिळवली. याचा फायदा काय? याचा फायदा नक्कीच तुम्हाला होऊ शकतो. यामुळे तुम्ही बाहेरून किती थकून, गर्दीतून आणि अस्वच्छ होऊ आला असाल तरी तुम्ही Interview ला आत जाताना फ्रेश दिसाल. यामुळे तुमचं चांगलं इम्प्रेशन रिक्रुटरवर पडेल आणि तुम्हालाच जॉब मिळेल. फक्त यासाठी तुम्हाला काही काळ आधी घरून निघणं आवश्यक असेल. म्हणूनच तुमच्या पुढच्या मुलाखतीवेळी हे नक्की करा आणि जॉब मिळवा.
First published:

Tags: Career, Career opportunities, Digital prime time, Job

पुढील बातम्या