जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / Career Tips: करिअरमध्ये सतत पुढे जाण्यासाठी 'हे' सॉफ्ट स्किल्स आवश्यक; तुमच्यामध्ये आहेत ना?

Career Tips: करिअरमध्ये सतत पुढे जाण्यासाठी 'हे' सॉफ्ट स्किल्स आवश्यक; तुमच्यामध्ये आहेत ना?

सॉफ्ट स्किल्स

सॉफ्ट स्किल्स

आज आम्ही तुम्हाला असे काही सॉफ्ट स्किल्स सांगणार आहोत जे तुमच्यात असणं अत्यंत आवश्यक आहे

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 31 मार्च: कुठल्याही करिअरची सुरुवात (How to start career) करताना त्यातील काही बेसिक गोष्टी आपल्याला येणं अत्यंत आवश्यक असतं. जर त्यातील काही गोष्टी किंवा सॉफ्टस्किल्स (Important soft skills for career) आपल्याला येत नसतील तर आपण करिअरमध्ये (career Success tips) समोर जाऊ शकत नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला असे काही सॉफ्ट स्किल्स सांगणार आहोत जे तुमच्यात असणं अत्यंत आवश्यक आहे. (Soft skills for Success in Career) ज्यामुळे तुम्हाला कोणत्याही क्षेत्रात करिअर करण्यासाठी उपयोगी ठरतील. चला तर मग जाणून घेऊया. कम्युनिकेशन स्किल्स कोणत्याही संस्थेत काम करण्यासाठी संवाद कौशल्य हे सर्वात महत्त्वाचे कौशल्य आहे. कामाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा गैरसमज आणि चुकीचा अर्थ लावला जाऊ नये यासाठी तुम्ही तुमच्या सहकाऱ्यांशी तुमच्या वरिष्ठांशी आणि तुमच्या अधीनस्थांशी योग्य संवाद साधला आहे याची खात्री करणे आवश्यक आहे.म्हणूनच जर संवाद चांगला असेल तर तुम्हाला करिअरमध्ये कधीच अडचणी येणार नाहीत. टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात भरघोस पैसे कमवायचे आहेत? मग असं करा Career

 प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल्स

कोणत्याही उमेदवारांकडे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल्स असणे आवश्यक आहे. जर तुम्हाला कोणत्याही कामात अडथळा आला तर तो सोडवण्यासाठी किंवा दूर करण्यासाठी एक सकारात्मक विचार असणं आवश्यक आहे यालाच प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल्स म्हणतात.कोणताही प्रॉब्लेम मोठा नाही असा विचार करण्याची क्षमता तुमच्यात असेल तरच तुम्ही करिअरमध्ये समोर जाऊ शकता. टाईम मॅनेजमेंट स्किल्स कॉर्पोरेट जगतासाठी वेळ अत्यंत महत्वाचा आहे कारण वेळ हा पैसा आहे आणि म्हणून वेळेचे व्यवस्थापन येथे अत्यंत महत्वाचे आहे. जेव्हा तुम्ही एखाद्या संस्थेत काम करत असता तेव्हा तुमच्याकडे वेळ व्यवस्थापन कौशल्ये असणे आवश्यक असते. तुमच्या कामाला प्राधान्य देणे खूप महत्त्वाचे आहे, त्यांचे कर्मचारी त्यांचा वेळ कार्यक्षमतेने वापरतात याची खात्री करण्यासाठी कंपन्यांद्वारे वेळ व्यवस्थापन मूल्यांकन केले जाते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात