मुंबई, 10 फेब्रुवारी: कोरोनामुळे देशभरातील बहुतांश कर्मचारी वर्क फ्रॉम होम (Work From Home) करत आहेत. यामुळे कर्मचाऱ्यांना कमी करण्यासोबतच आपल्या कुटुंबाला वेळ देण्याची संधी मिळत आहे. ज्यांच्या नोकरीचं ठिकाण हे घरापासून दुर किंवा दुसऱ्या शहरात आहे अशांसाठी वर्क फ्रॉम होम फायदेशीर ठरत आहे. मात्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ लागल्यामुळे सर्वच ऑफिसेस (Offices opening in Maharashtra) पुन्हा सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे वर्क फ्रॉम होम (How to find permanent work from home jobs) हवं असलेल्या कर्मचाऱ्यांची धास्ती वाढली आहे. असे कर्मचारी वर्क फ्रॉम होम असलेल्या कंपन्यांमध्ये (Permanent work from home Jobs) नोकरी शोधत आहेत. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला पर्मनंट वर्क फ्रॉम होम असलेल्या नोकऱ्या कशा शोधणार याबद्दल सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया. ऑफिस, घर किंवा कुठूनही करू शकता काम; ‘या’ कंपनीनं कर्मचाऱ्यांना Gift Freelancing जॉब्स ठरतील फायदेशीर गेल्या दोन वर्षांपासून फ्रीलान्स (Freelancing work from home jobs) नोकऱ्यांचा कल झपाट्याने वाढला आहे. तुम्हीही अशा प्रकारच्या नोकरीच्या शोधात असाल तर तुम्ही Upwork वेबसाइटला भेट देऊ शकता. येथे तुम्हाला चांगल्या कंपन्यांशी संबंधित फ्रीलान्स प्रकल्प मिळू शकतात. वेब-मोबाइल सॉफ्टवेअर डेव्हलपर्स, डिझाइन आणि क्रिएटिव्ह, अॅडमिन सपोर्ट, आयटी आणि नेटवर्किंग, लेखन, ग्राहक सेवा, विक्री आणि विपणन, डेटा सायन्स आणि विश्लेषक, भाषांतर, कायदेशीर, लेखा आणि सल्लागार, अभियांत्रिकी आणि आर्किटेक्चर या क्षेत्रात फ्रीलान्स काम शोधत आहात इत्यादी करू शकतात. साइटच्या वरच्या उजव्या कोपर्यात, फ्रीलान्ससाठी एक टॅब दिलेला आहे, ज्यामध्ये फ्रीलान्स काम आणि पेमेंटशी संबंधित सर्व माहिती मिळेल. सुरुवातीला अकाउंट तयार करून तुम्हाला याचा लाभ घेता येईल. पार्ट टाइम जॉब्स जर तुम्ही क्रिएटिव्ह क्षेत्राशी निगडित असाल आणि पार्ट टाइम जॉबद्वारे (WFH Part time jobs) अतिरिक्त उत्पन्न मिळवू इच्छित असाल, तर ड्रिबल जॉब साइट तुमच्यासाठी एक चांगला पर्याय असू शकते. वेब डिझायनर, ग्राफिक डिझायनर, इलस्ट्रेटर, आयकॉन आर्टिस्ट, टायपोग्राफर, लोगो डिझायनर इत्यादी लोकांची एक मोठी कम्युनिटी आहे. चांगली गोष्ट म्हणजे तुमची सर्जनशीलता दाखवून तुम्ही अर्धवेळ नोकरी मिळवू शकता. यासाठी तुम्हाला या साईटवर अकाउंट तयार करून तुमच्या क्षेत्रातील नोकरी शोधता येईल. वर्क फ्रॉम होम दरम्यान तुमच्या डेस्कवर ठेवा ‘या’ वस्तू; कामात येणार नाही अडथळा स्टार्टअप जॉब्स आजकाल लोकांना स्टार्टअप कंपन्यांमध्ये चांगला पगार (Salary in start up companies) दिला जात आहे. तुम्हीही देशातील मोठ्या शहरांमध्ये स्टार्टअप नोकऱ्यांच्या (Start up Jobs in India) संधी शोधत असाल तर संबंधित साइटला भेट द्या. तिथे तुम्हाला केवळ शीर्ष स्टार्टअप कंपन्यांमधील रिक्त पदांची माहिती मिळणार नाही, तर तुम्ही नोकरीसाठी थेट अर्ज देखील करू शकता.यामुळे तुम्ही वर्क फ्रॉम करत पैसेही कमावू शकता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.