मुंबई, 10 फेब्रुवारी: जॉब शोधण्यासाठी (Job search) आजकालच्या टेक्नॉलॉजीच्या (Technology) काळात कुठेही बाहेर जाण्याची गरज पडत नाही. टेक्नॉलॉजीमुळे ऑनलाईन (Online jobs) आणि सोशल मीडियावरच जॉब (Job search on Social Media) शोधण्यासाठी आणि जॉब्सबद्दल माहिती देण्यासाठी अनेक वेबसाईट्स (Job searching websites) उपलब्ध असतात. इतकंच बाही तर सोशल मीडियावरील (Earning from social Media) काही साइट्सच्या माध्यमातूनही तुम्ही जॉब मिळवू शकता. आज आम्ही तुम्हाला सहाच काही गोष्टींबद्दल (How to earn money from social Media) सांगणार आहोत ज्यामुळे तुम्ही भरघोस पैसे कमावू शकता. चला तर मग जाणून घेऊया. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत ते सोशल मीडियावर खूप सक्रिय राहू लागले आहेत. आता तुम्ही Facebook आणि Instagram सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ब्रँड एंडोर्समेंट करून (पैसे कमवा) कमवू शकता. मात्र यासाठी तुमच्याकडे फॉलोअर्सचा मजबूत आधार असणे आवश्यक आहे आणि लोकांचा तुमच्यावर विश्वास असणे देखील महत्त्वाचे आहे. तुमचे सोशल मीडिया प्रोफाइल छान बनवण्याचे काही मार्ग जाणून घ्या. तुम्हालाही पर्मनंट Work From Home हवंय? कुठे आणि कशी शोधाल नोकरी; इथे मिळेल संपूर्ण माहिती फोटो आणि कव्हरकडे लक्ष द्या फेसबुक अकाऊंटवर लाईक्स वाढवण्यासाठी कव्हर आणि प्रोफाईल फोटो योग्यरित्या निवडला पाहिजे. तुमच्याकडे बिझनेस पेज असेल तर तुमचा लोगो प्रोफाईल फोटोवर लावा, पण तुम्ही कव्हर फोटोसह क्रिएटिव्हिटी करू शकता. चांगला कन्टेन्ट आवश्यक सोशल मीडियावर लाईक्स वाढवण्यासाठी योग्य कंटेंट पोस्ट करणे महत्त्वाचे आहे. कोणतीही माहिती, विनोद किंवा तुमची स्वतःची मते कन्टेन्टमध्ये समाविष्ट केली जाऊ शकतात. पण पोस्ट करण्याच्या नावाखाली काहीही पोस्ट ठेवू नका हे लक्षात ठेवा. असे केल्याने तुमच्या विश्वासार्हतेवर प्रश्न निर्माण होऊ शकतात. नवनवीन आणि प्रसिद्ध लोकांसोबत कोलॅब्रेट करा आणि पैसे कमवा. Golden chance! सेंट्रल बँक ऑफ इंडिया मुंबईत करणार पदभरती; ही घ्या अर्जाची लिंक विझ्युअल कंटेन्ट महत्त्वाचा लोकांना वाचण्यापेक्षा बघायला आवडते हे अगदी सामान्य आहे. म्हणूनच तुमच्या सोशल मीडिया खात्यांवर व्हिज्युअल सामग्री पोस्ट करत राहणे महत्त्वाचे आहे. केवळ लिखित पोस्टच नाही तर फोटो आणि व्हिडिओ देखील पोस्ट करा. लोक व्हिज्युअल कन्टेन्टसह सहजपणे कनेक्ट करतात आणि लाईक्स देतात. म्हणूनच जास्तीत जास्त व्हिडीओ बनवून तुम्ही चांगले पैसे कमावू शकता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.