• Home
 • »
 • News
 • »
 • career
 • »
 • Career in Astrology: तुम्हालाही Astrologer व्हायचंय? मग जाणून घ्या यामधील शिक्षण आणि करिअरच्या संधी

Career in Astrology: तुम्हालाही Astrologer व्हायचंय? मग जाणून घ्या यामधील शिक्षण आणि करिअरच्या संधी

यात अनेक करिअरच्या संधी (career scope in Astrology) आहेत. याचबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

 • Share this:
  मुंबई, 02 नोव्हेंबर: आजकालच्या काळात वर्तमानात जगण्यापेक्षा लोकांना भविष्यात काय घडणार (Future Predictions) हे जाणून घेण्याची अधिक रुची आहे. अनेक लोक यासाठी एखाद्या भविष्य सांगणाऱ्यांकडे जातात. मात्र अनेकदा यात आपली फसवणूक होते. काही भविष्य सांगणारे काहीही शिक्षण न घेता लोकांना मनात येईल ते सांगतात. मात्र Astrology ही तोतयागिरी नाही. यात शिक्षण घेण्यासाठी (Education in Astrology) काही कोर्सेस आहेत. हे कोर्सेस (Astrology courses) केल्यानंतर तुम्हाला खऱ्या अर्थानं ज्योतिषशास्त्र (Career in Astrology) शिकता येतं. तसंच याचा फायदा (How to become Astrologer) आपल्यासोबतच अनेकांना करून देतो येतो. विशेष म्हणजे यात अनेक करिअरच्या संधी (career scope in Astrology) आहेत. याच बद्दल आज आपण जाणून. घेणार आहोत. Astrology किंवा ज्योतिष विज्ञान म्हणजे नक्की काय? पहिला प्रश्न म्हणजे ज्योतिष म्हणजे काय? (What is Astrology?) तर ज्योतिष हे ग्रह -ताऱ्यांचा अभ्यास करण्याची एक प्राचीन पद्धत आहे. ग्रहांचा मानवी जीवनावर होणारा परिणाम, या प्रभावांचे दोष टाळण्याचे मार्ग जाणून घेण्याचे हे तंत्र आहे. पूर्वीच्या काळी ऋषी-मुनी हे तंत्र वापरत. ज्योतिष हे ग्रहांची गणिती गणना करण्याचा एक प्रकार आहे. ज्यामुळे मानवी जीवनावर ग्रहांच्या स्थितीचा अनुकूल-प्रतिकूल प्रभाव कळतो, कोणत्या ग्रहावर चांगला प्रभाव पडेल, कोणाचा प्रभाव वाईट असू शकतो. हे दोष शोधून त्यांचा प्रभाव दूर केला जाऊ शकतो. याला ज्योतिषशास्त्र म्हणतात. ज्योतिष्यशास्त्र शिकण्यासाठी शैक्षणिक पात्रता जर तुम्हाला ज्योतिषाच्या क्षेत्रात करिअर (Eligibility for Astrologer) करायचे असेल तर तुम्ही कोणत्याही शाखेतून बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. याशिवाय ज्योतिष शास्त्रात रुची असणे आवश्यक आहे. आजकाल या क्षेत्रात चांगले करिअर करण्यासाठी संगणक आणि इंटरनेटचे योग्य आणि चांगले ज्ञान असणे आवश्यक झाले आहे. यासाठी तुमचे उद्दिष्ट केवळ पैसे कमवण्याचे नसून सेवेचेही असले पाहिजे. लोकांवर प्रभाव टाकण्याची तुमची क्षमता खूप महत्त्वाची आहे. ज्योतिष विज्ञान अभ्यासक्रमाचे शुल्क इतर अभ्यासक्रमांच्या तुलनेत खूपच कमी आहे. 10 हजार ते 50 हजार रुपये शुल्क देऊन तुम्ही सर्टिफिकेट आणि डिप्लोमा कोर्स करू शकता. सध्या या क्षेत्रात खूप चांगला वाव आहे. नोकरी सोडून व्यवसाय सुरू करताय? निर्णय घेण्यापूर्वी या गोष्टींचा नक्की करा विचार या क्षेत्रातील करिअरच्या संधी भारतीय विद्या भवन (BVB) मधून ज्योतिष आचार्यचा कोर्स केलेले आचार्य अजय वर्मा यांच्या मते, सध्याच्या काळात ज्योतिषशास्त्रात अधिक चांगले करिअर करता येते. त्यांच्या मते, हे असे क्षेत्र आहे, ज्याचा वापर प्रत्येक क्षेत्रात होत आहे. ते म्हणतात की जर एखाद्याला घर बांधायचे असेल तर तो शुभ मुहूर्त जाणून घेण्यासाठी प्रथम ज्योतिषाकडे जातो. विद्यार्थी कोणत्या क्षेत्रात आपले भविष्य घडवायचे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. आयुष्यात कोणतेही मोठे काम करत असाल तर ज्योतिषाची मदत जरूर घ्या. अशा प्रकारे जीवनाच्या प्रत्येक वळणावर ज्योतिषशास्त्राचा वापर केला जातो. या ब्रांचेसमध्ये घडवू शकता करिअर हस्तरेखाशास्त्र रत्न ज्योतिष वास्तु ज्योतिष अंकशास्त्र तारकीय ज्योतिष हे कोर्सेस करून घडेल करिअर आचार्य अजय वर्मा यांच्या मते, सर्व संस्था ज्योतिषशास्त्राचे अभ्यासक्रम देतात. यामध्ये प्रमाणपत्रापासून पदवी अभ्यासक्रमापर्यंतचा समावेश आहे. परंतु हा कोर्स तुम्ही मान्यताप्राप्त संस्थेतूनच करावा. या क्षेत्रात तुम्ही प्रमाणपत्र, पदविका आणि पदवी अभ्यासक्रम करू शकता. यानंतर तुम्हाला प्रमाणित ज्योतिषींच्या हातून किमान एक वर्षाचे प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे जेणेकरून तुम्ही तुमच्या गणनेत परिपूर्ण होऊ शकता.
  Published by:Atharva Mahankal
  First published: