• Home
 • »
 • News
 • »
 • career
 • »
 • Career Tips : नोकरी सोडून व्यवसाय सुरू करताय? निर्णय घेण्यापूर्वी या गोष्टींचा नक्की करा विचार

Career Tips : नोकरी सोडून व्यवसाय सुरू करताय? निर्णय घेण्यापूर्वी या गोष्टींचा नक्की करा विचार

Career Tips, Job vs Business: जर तुम्ही कॉर्पोरेट लाइफला कंटाळले असाल आणि कोणत्याही स्टार्ट अप कल्पनेवर काम करू इच्छित असाल किंवा कोणता व्यवसाय सुरू करणार असाल तर तुम्हाला त्यातील अडचणी (Business Or Job Which Is Better) देखील माहीत असल्या पाहिजेत.

 • Share this:
  मुंबई, 30 ऑक्टोबर : आजकाल वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात संतुलन राखणं ही सोपी गोष्ट नाही. नोकरी कुठलीही असो, त्यात टेन्शन असणं साहजिक आहे आणि अनेकांना ते सांभाळता येत नाही. जर तुम्ही कॉर्पोरेट लाइफला कंटाळले असाल आणि कोणत्याही स्टार्ट अप कल्पनेवर काम करू इच्छित असाल किंवा कोणता व्यवसाय सुरू करणार असाल तर तुम्हाला त्यातील अडचणी (Business Or Job Which Is Better) देखील माहीत असल्या पाहिजेत. व्यवसायातून मिळणारे जास्त पैसे पाहुन अनेकजण त्याकडे आकृष्ठ होतात. सर्वच व्यवसायांचे आपण बाहेरून चकाचक जग पाहतो, पण त्यासोबत होणाऱ्या त्रासांची आपल्याला कल्पना नसते. समोरच्याचं आयुष्य जितकं सोपं वाटतं, प्रत्यक्षात ते तितकं नसतं. स्टार्ट अप कल्पनेवर काम करण्यापूर्वी, नोकरी आणि व्यवसायातील फरक जाणून घ्या (Business Or Job Which Is Better). वैयक्तिक-व्यावसायिक जीवनाचा समतोल बिघडतो व्यवसायाच्या जगात पाऊल ठेवताच, काम आणि वैयक्तिक जीवनातील फरक नाहीसा होऊ लागतो. सुट्टीचा विषय बंद होतो आणि कामांची लांबलचक यादी सतत मनात धावत राहते. झोपेत असतानाही नेहमी फक्त कामाच्याच गोष्टी मनात फिरत राहतात. (Business Or Job Difference) हे वाचा - T20 World Cup: अफगाणिस्तानच्या पराभवानंतरही राशिद खाननं रचला इतिहास, मलिंगाला टाकलं मागं कार्यालयीन सुविधांची सवय सोडावी लागते कदाचित तुम्हाला तुमच्या नव्या व्यवसाय, कामाची सुरुवात एखाद्या छोट्या खोलीतून किंवा ऑफिसमधून करावी लागेल. तर कंपनीत काम करताना तुमच्याकडे अनेक सुविधा असतात. तुमच्या व्यवसायात (स्टार्ट अप हार्डशिप्स) कॉफी मशीन, हेल्पर, प्रिंटिंग मशीन इत्यादींची व्यवस्था करायला खूप वेळ (Start Up Hardships) लागेल. दरमहा पगाराची हमी नाही व्यवसाय सुरू करण्यासाठी काही महिने ते वर्षे लागू शकतात (पैसे कसे कमवायचे). तुम्ही अनेक वर्षे नोकरी, जॉब करून आला असाल तर तुम्हाला दर महिन्याला ठराविक पगाराची सवय लागलेली असते. स्टार्टअपमध्ये निश्चित कमाई किंवा नफा मिळविण्यासाठी वेळ लागू शकतो. हे वाचा - मैत्रिणीच्या बाळाचं डायपर बदलताना समोर आलं भयंकर सत्य; समजताच महिलेनं पतीला दिला घटस्फोट सर्वांना लगेच यश मिळेलच असे नाही एखाद्या मित्राला किंवा ओळखीच्या व्यक्तीला त्याच्या स्टार्टअपमध्ये झटपट यश मिळाले असले, तरी तुमच्या बाबतीतही असेच घडेल, याबाबत सांगता येत नाही. प्रत्येक व्यवसाय योजना आणि त्यातील गुंतवणुकीचे पर्याय इतरांपेक्षा वेगळे असतात. म्हणून, व्यवसायात पाऊल ठेवल्यानंतर स्वतःची तुलना कोणाशीही करू नका.
  Published by:News18 Desk
  First published: