मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

Career After 10th: दहावीनंतर लगेच जॉब हवाय? मग टेन्शन नको; 'हे' कोर्सेस तुमची लाईफ करतील सेट

Career After 10th: दहावीनंतर लगेच जॉब हवाय? मग टेन्शन नको; 'हे' कोर्सेस तुमची लाईफ करतील सेट

दहावीनंतरचे बेस्ट करिअर ऑप्शन्स

दहावीनंतरचे बेस्ट करिअर ऑप्शन्स

तुम्ही दहावी उत्तीर्ण केल्यांनतर काही शॉर्ट टर्म कोर्सेस (Short term courses after 12th) करून नोकरी करू शकता. अशाच काही कोर्सेस बद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 05 सप्टेंबर: आजकाल अनेक विद्यार्थ्यांना पैसे कमवण्याची (How to earn instant Money) इच्छा असते. यासाठी त्यांना अधिक वेळ वाटही बघ्याची नसते. दहावी किंवा बारावी झाल्यानंतर त्यांना लगेच जॉब (Jobs after 10th and 12th) हवा असतो. घरची आर्थिक परिस्थिती यामागचं एक प्रमुख कारण असू शकतं. बारावीनंतर हे शक्य आहे. आता तुम्ही दहावी उत्तीर्ण केल्यांनतर काही शॉर्ट टर्म कोर्सेस (Short term courses after 12th) करून नोकरी करू शकता. अशाच काही कोर्सेस बद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ज्यामुळे तुम्हाला दहावीनंतरही चांगला जॉब लागू शकतो. चला तर मग जाणून घेऊया.

स्टेनोग्राफी आणि टायपिंग

10वी नंतर तुम्ही स्टेनोग्राफी आणि वेगवेगळ्या भाषांच्या टायपिंगमध्ये डिप्लोमा करू शकता. अशा उमेदवारांसाठी न्यायालये आणि इतर अनेक सरकारी खात्यांमध्ये रिक्त पदे येत राहतात. ज्यांच्यासाठी स्टेनो अनिवार्य आहे. मात्र, या नोकऱ्यांसाठी फास्ट टायपिंगचा वेग खूप महत्त्वाचा आहे.

तब्बल 75,000 रुपये पगार आणि कोणतीच परीक्षा नाही; इंडियन सिक्युरिटी प्रेसमध्ये थेट मिळेल नोकरी; असा करा अर्ज

ITI

दहावीनंतर आयटीआयही करता येते. जर तुम्हाला स्वतःचे काही काम करायचे असेल तर हा कोर्स करून तुम्ही सहज चांगले पैसे कमवू शकता. रेल्वेसह अनेक कारखाने आणि प्लांटमध्ये नोकऱ्यांच्या मोठ्या संधी आहेत.

हार्डवेअर आणि नेटवर्किंग

सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात लोक आता अधिकाधिक लॅपटॉप, संगणक, मोबाईल आणि इतर तंत्रज्ञानावर आधारित उपकरणे वापरत आहेत. यासोबतच हार्डवेअर तज्ज्ञांची मागणीही वाढत आहे. अशा परिस्थितीत संगणक हार्डवेअर आणि नेटवर्किंगमध्ये डिप्लोमा करून चांगली नोकरी मिळवू शकता. तसेच तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकता.

धक्कादायक बातमी! पुढच्या 6 महिन्यात तब्बल 65% कर्मचारी देणार नोकरीचा राजीनामा

हॉटेल मॅनेजमेंट

दहावी केलेल्या विद्यार्थ्यांना हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रात करिअर करण्याची चांगली संधी आहे. दीड वर्षाच्या डिप्लोमा कोर्सनंतर हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रात नोकरी मिळू शकते. जर तुम्हाला एकापेक्षा जास्त भाषा आणि परदेशी भाषांचे आकलन आणि ज्ञान असेल तर तुम्हाला ते खूप उपयुक्त आणि फायदेशीर वाटू शकते.

First published:

Tags: Career, Career opportunities, Job, Jobs Exams