जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / धक्कादायक बातमी! पुढच्या 6 महिन्यात तब्बल 65% कर्मचारी देणार नोकरीचा राजीनामा; कारण....

धक्कादायक बातमी! पुढच्या 6 महिन्यात तब्बल 65% कर्मचारी देणार नोकरीचा राजीनामा; कारण....

ऑफिसमधून काम नकोच

ऑफिसमधून काम नकोच

कार्यालयातून काम केल्यामुळे 65% कर्मचारी येत्या 6 महिन्यात नोकरीचा राजीनामा देण्याची शक्यता असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 01 सप्टेंबर: गेल्या दोन वर्षांपासून कोरोनानं संपूर्ण जगभरात हाहाकार माजवला आहे. अनेकांनी यामुळे आपले प्राण गमावले आहेत. भारतातही तिसरी लाट लाट येऊन गेली आहे. मात्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव संपूर्णपणे कमी होऊ लागला आहे. पुन्हा ऑफिस सुरळीतपणे सुरु होईल (When all offices are resume) आणि ऑफिसला जायला मिळेल अशी स्वप्न पाहणाऱ्या कर्मचाऱ्यांना आणि कंपन्यांना यामुळे आनंद झाला आहे. मात्र वर्क फ्रॉम होम (Work from home jobs) मागणाऱ्या कर्मचाऱ्यांची यामुळे निराशा झाली आहे. IT आणि इतर कॉर्पोरेट क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचा परफॉर्मन्स हा वर्क फ्रॉम होमदरम्यान (WFH performance of IT employees) उत्तम होता हे निरनिराळ्या सर्व्हेमधून स्पष्ट झालं आहे. त्यामुळे जीवाची जोखीम घेऊन कर्मचारी पुन्हा ऑफिसमध्ये परतण्यास तयार नाहीत हे दिसून येतंय. मात्र आता एका अभ्यासादरम्यान वर्क फ्रॉम होम करणाऱ्या कर्मचाऱ्यांबाबत (employees wants work from Home) आकडेवारी समोर आली आहे. ऑन रोल आणि ऑफ रोल जॉब म्हणजे नक्की काय? कंपनीत तुम्ही कोणत्या जॉबवर आहात? असा ओळखा फरक कार्यालयातून काम केल्यामुळे 65% कर्मचारी येत्या 6 महिन्यात नोकरीचा राजीनामा देण्याची शक्यता असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अर्थात, uKnowva, एक 360-डिग्री क्लाउड-आधारित आणि मोबाइल-सक्षम व्यवसाय सॉफ्टवेअरने, कामाच्या ट्रेंड आणि प्राधान्यांबद्दल एक सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणात 29% कर्मचाऱ्यांनी सांगितले की, ते घरून काम करून आनंदी आहेत. uKnowva चे CEO विक्की जैन यांच्या मते, ऑफिसमधील सहकाऱ्यांच्या तुलनेत, रिमोट कामगार लक्षणीयरीत्या अधिक उत्पादक आणि आनंदी असतात. अभ्यासाचे परिणाम असे दर्शवतात की विशेषतः महिला WFH प्रणालीवर आनंदी आहेत. या स्थितीत कर्मचाऱ्यांना पुन्हा कार्यालयात बोलावल्यावर ते आपल्या पदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. सर्वेक्षणात असा निष्कर्ष काढण्यात आला आहे की पुढील सहा महिन्यांत नाखूष कर्मचारी नोकरी सोडण्याची शक्यता आहे आणि त्यापैकी 57% विशेषतः महिला आहेत. Ranveer Allahbadia: फिटनेस टिप्स असो वा भन्नाट पॉडकास्ट; हेवा वाटेल असा YouTuber साथीच्या रोगानंतर कर्मचारी त्यांची नोकरी सोडण्यास तयार आहेत आणि कमी पगारावर देखील काम करण्यास तयार आहेत परंतु कार्यालयात जाण्यास तयार नाहीत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात