मुंबई, 18 मे: निकाल येत्या काही दिवसातंच जाहीर होणार आहे. त्यामुळे दहावीनंतर नक्की काय करावं? कोणतं शिक्षण घ्यावं याबाबत अनेकजण कन्फ्युज्ड आहेत. मात्र जर तुम्ही दहावीनंतर सैन्यात जाऊ इच्छिता किंवा NDA ची तयारी करू इच्छित आहात तर ही स्टोरी फक्त तुमच्यासाठी आहे. आज आम्ही तुम्हाला अशा एका मिलिटरी कॉलेजबद्दल सांगणार आहोत जिथे प्रवेश घेऊन तुम्ही NDA परीक्षेची संपूर्ण तयारी करू शकता आणि सैन्य शिक्षण घेऊ शकता. भोसला मिलिटरी कॉलेज या कॉलजेचं नाव आहे. दहावी उत्तीर्ण असाल आणि अकरावी विज्ञान शाखेत प्रवेश घेऊ इच्छित असाल तर, महाविद्यालयीन अभ्यासासोबतच तुम्ही NDA ची देखील तयारी करू शकता. अकरावी बारावी अशी दोन वर्षे तुमची तयारी करून घेतली जाईल. फी किती आणि किती विद्यार्थ्यांना प्रवेश? NDA प्रिप्रेशन बॅचची एका वर्षाची फी 1 लाख 95 हजार रुपये आहे. यात तुमची प्रवेश फी आणि होस्टेल फीदेखील समाविष्ट असेल. या फीमध्ये तुम्हाला वर्षभरात लागणाऱ्या सर्व वस्तू कॉलेजकडून दिल्या जातील. यात कोर्ससाठी रिझर्व्हेशन नाही. सर्व प्रवेश हे ओपनमध्ये केले जातात. 120 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेल. NDA प्रिप्रेशन बॅचमध्ये प्रवेश घेण्यासाठी तुम्ही दहावी किती गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत. हे महत्वाचे नसते. भोसला मिलिटरी कॉलेजकडून एक प्रवेश परीक्षा घेतली जाते. यात NDA मध्ये जे प्रश्न विचारले जातात. त्यात किती मार्क्स पडतात, हे बघितले जाते. त्यावरून प्रवेश निश्चित केला जातो.
शारीरिक आणि वैद्यकीय पात्रता प्रवेश परीक्षा यामध्ये विद्यार्थाला सर्व विषयांचे ज्ञान आहे का, त्याची पडताळणी होते. मुलाखतीमध्ये विद्यार्थी बोलतो कसा, स्पष्ट बोलतो का? त्याची NDA मध्ये जाण्याची खरंच इच्छा आहे का? या गोष्टी तपासल्या जातात. शारीरिक चाचणी परीक्षेत विद्यार्थी शारीरिक दृष्टया सक्षम आहे ना, काही व्यंग तर नाही ना, म्हणजे सैन्य भरतीत होणाऱ्या शारीरिक चाचणीसारखी पूर्ण पडताळणी केली जाते. हे सर्व झाल्यानंतर, ज्या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. त्या विद्यार्थ्यांना एक तारीख देऊन भोसला मिलिटरी कॉलेजमध्ये जॉईन होण्यास सांगितलं जाते. ग्रॅज्युएट उमेदवारांनो, सरकारी अधिकारी होण्याची सुवर्णसंधी; MPSC कडून ‘या’ पदांसाठी भरतीची घोषणा अशी आहे प्रवेश प्रक्रिया भोसला मिलिटरी कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी प्रथमत: bmc.bhonsala.in या वेबसाईटवर जाऊन रजिस्ट्रेशन करून मेरिट फॉर्म भरा. त्यानंतर प्रवेश परीक्षेसाठी कॉलेजकडून तुम्हाला संपर्क केला जाईल. विद्यार्थ्यांना राहण्याचीदेखील व्यवस्था विद्यार्थी कॉलेजमध्ये आल्यानंतर त्याला सर्व वस्तू पुरवल्या जातात. त्याला कॉलेजमधील लागणार साहित्य काहीही बाहेरून घ्यावे लागणार नाही. आपण भरलेल्या शुल्कात या सर्व गोष्टींचा समावेश असेल. Success Story: 3 वर्षांच्या वयात झाला ॲसिड अटॅक, दृष्टी गेली; पण तिनं मानली नाही हार; बोर्डात आली मेरिट बॅचमधील विद्यार्थ्यांचा दिनक्रम सकाळी 6 ते 7.30 मिनिटांनी मिलिटरी ट्रेनिंग, त्यामध्ये हॉर्स रायडिंग, स्विमिंग, फायरिंग, योगा, कराटे, मलखांब असे वेगवेगळे विषय शिकवले जातात. या प्रत्येक विषयाचे वेगवेगळे मार्गदर्शक असतात. मिलिटरी ट्रेनिंग झाल्यानंतर विद्यार्थी ब्रेकफास्ट करण्यास जातात. नंतर कॉलेजची तयारी करून सर्व विद्यार्थी होस्टेलमधून कॉलेजमध्ये जातात. लगेच NDA चे क्लास सुरू होतात. ते झाल्यानंतर जेवण करण्यास वेळ दिला जातो. जेवण झाल्यानंतर विद्यार्थी पुन्हा आपल्या महाविद्यालयीन अभ्यासासाठी कॉलेजमध्ये येतात. पुन्हा रेग्युलर क्लास करून, चहा, नाश्ता करण्यासाठी वेळ दिला जातो. नंतर सायंकाळच्या वेळी स्पोर्ट्स खेळण्यास वेळ दिला जातो, असा एकंदरीतच विद्यार्थ्यांचा दिनक्रम असतो. विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! 11वी प्रवेश प्रक्रियेचं ऑनलाईन वेळापत्रक जाहीर; ‘या’ तारखेपासून सुरु होणार प्रोसेस विद्यार्थ्यांना मार्गदर्शन कोण करतं? होस्टेलमधील विद्यार्थ्यांना शिस्त लागण्यासाठी भोसला मिलिटरी कॉलेजमध्ये रिटायर्ड सैनिकांची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच विद्यार्थ्यांचा सैन्यात जाण्याचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी भोसला मिलिटरी कॉलेजचे जे माजी विद्यार्थी सैन्यात अधिकारी पदावर आहेत. त्यांचंही मार्गदर्शन दिलं जात