मुंबई, 18 मे: राज्यातील दहावी बोर्डाची परीक्षा दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. राज्य शिक्षण संचानालयाकडून अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे.
10 वी आणि 12 वी चा निकाल
लागण्यापूर्वीच ही प्रवेश प्रक्रिया सुरु होणार आहे. परिपत्रक काढून अकरावी प्रवेश प्रक्रियेचं संपूर्ण वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत दोन भाग असणार आहेत. विद्यार्थ्यांनी दिनांक 25 मे 2023 पासून यातील पहिला भाग भरायचा आहे. पहिल्या पार्टमध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या विषयी काही महत्त्वाची माहिती भरावी लागणार आहे. तर दुसरा पार्ट हा निकाल लागल्यानंतर भरावा लागणार आहे.
10वी, 12वीनंतर टॉपला न्यायचंय करिअर? मग निकालाची वाट बघू नका; आताच सुरु करा ‘हे’ कोर्सेस
असा असेल प्रवेशाचा पहिला टप्पा या भागात विद्यार्थ्यांना आपलं संपूर्ण नाव, जिल्हा आणि काही त्यासंबंधीची काही माहिती भरून रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे. त्यानंतर त्यांचं रजिस्ट्रेशन पूर्ण होणार आहे. निकालानंतर लागल्यानंतर दुसरा टप्पा सुरु होणार आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना मार्क्स आणि इतर गोष्टी भराव्या लागणार आहेत. असं असेल वेळापत्रक असा असेल प्रवेशाचा दुसरा टप्पा संबंधित
अकरावीची प्रवेश प्रक्रिया
ही राज्यातील काही प्रमुख शहरांमध्ये होणार आहे. या प्रक्रियेसाठी नोंदणी केल्यानंतर विद्यार्थ्यांना जिथे त्यांना प्रवेश घ्यायचा आहे अशा महाविद्यालयांची प्राधान्य यादी द्यावी लागेल. या प्राधान्य फॉर्ममध्ये किमान एक आणि जास्तीत जास्त 10 महाविद्यालयांची नावे भरता येतील. विद्यार्थ्यांना त्या महाविद्यालयांमध्ये गुणवत्तेनुसार प्रवेश दिला जाणार आहे. तसंच ज्या शहरांमध्ये ही प्रवेश प्रक्रिया घेतली जाणार आहे. त्या शहरांची वेगळी वेबसाईट देण्यात आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.