मराठी बातम्या /बातम्या /करिअर /Job Alert: कॅन्टोन्मेंट बोर्ड खडकी इथे विविध पदासांठी होणार भरती; हे उमेदवार करू शकतात अर्ज

Job Alert: कॅन्टोन्मेंट बोर्ड खडकी इथे विविध पदासांठी होणार भरती; हे उमेदवार करू शकतात अर्ज

पात्र उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत.

पात्र उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत.

पात्र उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत.

पुणे, 23 ऑगस्ट:  कॅन्टोन्मेंट बोर्ड खडकी (Cantonment Board Khadki Recruitment 2021) इथे विविध पदासांठी लवकरच भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. सहाय्यक शिक्षक, सफाई कर्माचारी, पुरुष वॉर्ड सेवक या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2021 असणार आहे.

या पदांसाठी भरती

सहाय्यक शिक्षक (Assistant Teacher)

सफाई कर्माचारी (Cleaner)

पुरुष वॉर्ड सेवक  (Male Ward Servant)

शैक्षणिक पात्रता

सहाय्यक शिक्षक (Assistant Teacher) - पदव्युत्तर शिक्षण आवश्यक आणि MSCIT परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक. (अधिक माहितीसाठी जाहिरात बघावी).

सफाई कर्माचारी (Cleaner) - इयत्ता चौथी उत्तीर्ण

पुरुष वॉर्ड सेवक  (Male Ward Servant) - दहावी उत्तीर्ण

हे वाचा - MSRTC मध्ये 10वी पास उमेदवारांसाठी भरती; लगेच करा अप्लाय

इतका मिळणार पगार

सहाय्यक शिक्षक (Assistant Teacher) - 29,200/- - 92,300/-  रुपये प्रतिमहिना

सफाई कर्माचारी (Cleaner) -  15, 000/-  -  47,600/- रुपये प्रतिमहिना

पुरुष वॉर्ड सेवक  (Male Ward Servant) - 15, 000/-  -  47,600/- रुपये प्रतिमहिना

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 31 ऑगस्ट 2021

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.canttboardrecruit.org/ या लिंकवर क्लिक करा.

First published:
top videos

    Tags: Career opportunities, Jobs, Pune