Home /News /career /

BSNL Jobs: डिप्लोमा धारकांसाठी नोकरीची मोठी संधी; BSNL महाराष्ट्रमध्ये 'या' जागांसाठी होणार भरती; करा अप्लाय

BSNL Jobs: डिप्लोमा धारकांसाठी नोकरीची मोठी संधी; BSNL महाराष्ट्रमध्ये 'या' जागांसाठी होणार भरती; करा अप्लाय

भारत संचार निगम लिमिटेड महाराष्ट्र भरती

भारत संचार निगम लिमिटेड महाराष्ट्र भरती

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 डिसेंबर 2021 असणार आहे.

  मुंबई, 13 डिसेंबर: भारत संचार निगम लिमिटेड महाराष्ट्र (Bharat Sanchar Nigam Ltd Mumbai) इथे काही जागांसाठी लवकरच भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (BSNL Maharashtra Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. डिप्लोमा अपरेंटिस या पदांसाठी ही भरती (Diploma jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 डिसेंबर 2021 असणार आहे. या पदांसाठी भरती   डिप्लोमा अपरेंटिस (Diploma Apprentice) - एकूण जागा 55 शैक्षणिक पात्रता आणि अनुभव डिप्लोमा अपरेंटिस (Diploma Apprentice) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Engineering/Technology या क्षेत्रात डिप्लोमा पूर्ण केला असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी Electronics/E&TC/Computer/IT या ब्रांचेसमध्ये डिप्लोमा पूर्ण केला असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून डिप्लोमा पूर्ण केला असणं आवश्यक आहे. AICTE नं मान्यता दिलेल्या महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. Jobs in Pune: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात तब्बल 80,000 रुपये पगाराची नोकरी इतका मिळणार Stipend डिप्लोमा अपरेंटिस (Diploma Apprentice) - 8000/- वयोमर्यादा डिप्लोमा अपरेंटिस (Diploma Apprentice) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवाराचं वय हे 25 वर्षांपेक्षा कमी असावं. तसंच वयोमर्यादेत प्रवर्गानुसार सूट देण्यात येणार आहे. या जिल्ह्यांमध्ये होणार भरती अमरावती, चंद्रपूर, जळगाव, कोल्हापूर, नाशिक, गोवा, पुणे, सातारा, सोलापूर,नागपूर , अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये ही भरती होणार आहे. अशी होणार निवड निवडीचे निकष उमेदवाराने मिळवलेल्या अंतिम टक्केवारी किंवा गुणांच्या गुणवत्तेवर आधारित असतील. डिप्लोमा आणि वैयक्तिक मुलाखतीत निवडलेल्या उमेदवारांना दस्तऐवज पडताळणीसाठी आणि निवडल्यास सामील होण्यासाठी ईमेलद्वारे सूचित केले जाईल. ज्या जिल्ह्यांमध्ये भरती होणार आहे अशा जिल्ह्यांमधील उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल. ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो काही महत्त्वाच्या सूचना वरील सर्व निकष पूर्ण करणारे उमेदवारच अर्ज करू शकतात. अप्रेन्टिस प्रशिक्षणाचा कालावधी एक वर्षाचा आहे. अप्रेन्टिस कायदा, 1961 नुसार स्टायपेंड दिला जाईल. SC/ST/PWD/OBC/EWS इत्यादी उमेदवारांसाठी आरक्षण नियमानुसार असेल. पुण्यातील 'या' मॅनेजमेंट कॉलेजमध्ये प्राध्यपकांच्या तब्बल 165 जागांसाठी नोकरी अर्ज करण्याची शेवटची तारीख - 29 डिसेंबर 2021
  JOB TITLE BSNL Maharashtra Recruitment 2021
  या पदांसाठी भरती डिप्लोमा अपरेंटिस (Diploma Apprentice) - एकूण जागा 55
  शैक्षणिक पात्रता आणि अनुभव या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Engineering/Technology या क्षेत्रात डिप्लोमा पूर्ण केला असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी Electronics/E&TC/Computer/IT या ब्रांचेसमध्ये डिप्लोमा पूर्ण केला असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून डिप्लोमा पूर्ण केला असणं आवश्यक आहे. AICTE नं मान्यता दिलेल्या महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
  इतका मिळणार Stipend डिप्लोमा अपरेंटिस (Diploma Apprentice) - 8000/-
  या जिल्ह्यांमध्ये होणार भरती अमरावती, चंद्रपूर, जळगाव, कोल्हापूर, नाशिक, गोवा, पुणे, सातारा, सोलापूर,नागपूर , अहमदनगर
  अशी होणार निवड निवडीचे निकष उमेदवाराने मिळवलेल्या अंतिम टक्केवारी किंवा गुणांच्या गुणवत्तेवर आधारित असतील. डिप्लोमा आणि वैयक्तिक मुलाखतीत निवडलेल्या उमेदवारांना दस्तऐवज पडताळणीसाठी आणि निवडल्यास सामील होण्यासाठी ईमेलद्वारे सूचित केले जाईल. ज्या जिल्ह्यांमध्ये भरती होणार आहे अशा जिल्ह्यांमधील उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.
  सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी http://www.mhrdnats.gov.in/ या लिंकवर क्लिक करा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.
  Published by:Atharva Mahankal
  First published:

  Tags: Career opportunities, Jobs, Maharashtra

  पुढील बातम्या